वाचन(Reading) करण्याची सवय मुलांमध्ये कशी लावावी? | How to develop reading skills in child in Marathi

वाचन(Reading) करण्याची सवय मुलांमध्ये कशी लावावी? | How to develop reading skills in child in Marathi

How to develop reading skills in child in Marathi: आपण हल्ली बघतो की मुलांना पुस्तक वाचन करण्यामध्ये किंवा Newspaper वाचण्यामध्ये फारसा interest नसतो. हल्लीच्या मुलांना वाचन करण्यापेक्षा TV, Mobile बघण्यात जास्त interest असतो. पूर्वीच्या काळी मुले ग्रंथालयात(library) मध्ये जाऊन सभासद(members) बनत होते. आणि मग library मध्ये जाऊन आपल्या आवडीची पुस्तके घेऊन वाचत असत. परंतु हल्ली याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.आज मी तुम्हाला मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याची थोडक्यात माहिती सांगणार आहे.

मुलांमध्ये वाचनाची सवय लावणे

मुलांना वाचनाचे(Reading) महत्त्व पटवून द्या:

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी असे जर वाटत असेल तर त्यांना वाचनामुळे काय फायदे होतात ते पटवून दिले पाहिजे. पुस्तकामुळे आपल्याला चांगले Knowledge मिळते आणि त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो. असे म्हणतात की माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल परंतु ज्ञानाने श्रीमंत(समृद्ध) हवा. म्हणजेच त्याच्याकडे Knowledge हवे. तसेच मुलांना रोज पुस्तक वाचण्याबरोबरच Newspaper वाचण्यास देखील प्रवृत्त करा.

मुलांना वाचन(Reading) करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके द्या:

मुलांमध्ये जर वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर सर्वप्रथम त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके द्यायला हवीत. आवडीची पुस्तके वाचल्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड(interest) निर्माण होईल. आणि मग नंतर हळूहळू सर्व प्रकारची पुस्तके मुले वाचू लागतील.

वाचनासाठी(Reading) एक fix वेळ ठरवा:

जर वाचनासाठी एक ठराविक वेळी निश्चित केली तर त्याचा देखील तुम्हाला निश्चित फायदा होईल. मुले स्वतःहूनच त्यावेळेला पुस्तके वाचू लागतील. म्हणजे जर तुम्ही वाचनासाठी संध्याकाळी सहा ते सात ही वेळ निश्चित केली असेल तर मुले रोज न चुकता त्यावेळेला पुस्तके वाचू लागतील. आणि त्यांना वाचनाची सवय लागेल.

वाचन(Reading) करण्यासाठी एक ठराविक जागा ठरवा:

जसे आपण अभ्यास करतांना एक चांगली जागा ठरवतो त्याच प्रमाणे पुस्तके वाचताना देखील एक जागा ठरवली तर त्याचा खूप फायदा होतो. मग ते एक प्रकारचे daily routine होते.

Parents ने देखील मुलांबरोबर वाचन करायला हवे:

जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून द्यायचे असेल तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ती गोष्ट करावी लागते. त्याच प्रमाणे जेव्हा parents ना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असेल तेव्हा त्यांना सर्वप्रथम स्वतःमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी लागेल. म्हणजेच parents जर मुलांसमोर वाचन करत असतील तर त्यांचे बघून मुलेदेखील वाचन करु लागतील. करण मुलेही पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलांच्या आईबाबांना जर वाचनाची आवड असेल तर नक्कीच मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण होईल.

मुलांना एखादे special gift किंवा prize द्या:

जर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर त्यासाठी त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी कराव्या लागतात. जर त्यांनी पुस्तके वाचली तर त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला द्या किंवा एखादे special gift किंवा काही reward द्या. अशा प्रकारे प्रयत्न केल्यास मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.

तर मी आज तुम्हाला मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याची थोडक्यात माहिती सांगितली आहे. . मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

◘ गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत?

मराठी उखाणे, लग्नातील उखाणे

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

4 thoughts on “वाचन(Reading) करण्याची सवय मुलांमध्ये कशी लावावी? | How to develop reading skills in child in Marathi”

Leave a Comment