9 Must Have Best Medicine Names For A Baby In Marathi
आपल्या घरात बाळ आले की एक प्रकारचा उत्साह येतो.सर्वजण खूप खुश आणि आनंदी असतात.पण हे पालकत्व स्वीकारताना एक जबाबदारी देखील येते . रोज एक नवीन चॅलेंज फेस करावे लागते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपल्याला अधिक अलर्ट राहावे लागते. मी आज तुम्हाला अशी काही medicines सांगणार आहे जी बाळ वर्ष किंव्हा दीड वर्षाचे होईपर्यंत आपल्या घरात असायलाच हवीत. तसेच जेव्हा तुम्ही बाळाला घेऊन ट्रॅव्हल करत असाल तेव्हा हा तुमच्या बरोबर बाळाचा First-AID Box असणे आवश्यक असते. जेणेकरून ऐन वेळी धावपळ करावी लागणार नाही.
१) Nasoclear Saline Nasal Spray
- बाळ जर जास्त वेळ AC मध्ये राहिले असेल किंवा जर climate थंड असेल तर बाळाला सर्दी होऊ शकते.
- आणि सर्दीमुळे बाळाचे नाक बंद होते, आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
- त्यामुळे बाळाला खूप irritate होते. बाळ खूप चिडचिड करू लागते.
- यासाठी Nasoclear Saline Nasal Spray खूप उपयोगी आहे.
- याचे 1-1 drop जरी बाळाच्या नाकात घातले तरी नाकातील घाण बाहेर येण्यास मदत होते आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होत नाही.
- हे drop दोन्ही नाकात पाच मिनिटांच्या अंतराने घालावेत.
- आणि अजून एक काळजी घ्यायची ती म्हणजे बाळाला फीड करायच्या पंधरा मिनिटे आधी हे ड्रॉप्स घालावेत.
- त्याचप्रमाणे ड्रॉप्स घालण्यापूर्वी किंवा कोणतेही medicines देण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
2) Vitamin D3 Drops
- फार पूर्वीपासून लोकांना माहित आहे की Vitamin-D हे सूर्यापासूनच मिळते त्यामुळे बाळाला थोडा वेळ तरी सूर्याच्या कोवळ्या उन्हात ठेवले जाते.
- परंतु आता असे सिद्ध झाले आहे की sunlight मुळे body ला हव्या त्या प्रमाणात Vitamin-D मिळत नाही.
- आणि सध्याच्या कोरोना काळात तर बरेच लोक बाहेर जाणे सुद्धा टाळतात.
- म्हणूनच Vitamin-D ची deficiency टाळण्यासाठी डॉक्टर पहिल्या दिवसापासूनच Vitamin D3 Drops देण्याचा सल्ला देतात.
- त्यामुळे बाळाला रोज निदान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत तरी 0.5ml Drops किंवा डॉक्टरांनी जी quantity सांगितली आहे त्याप्रमाणे देणे आवश्यक असते.
3) Calpol Pediatric Drops(Paracetamol for newborn baby in marathi)
- जेव्हा बाळाला 100°C पेक्षा जास्त temperature असते तेव्हा हे drops देण्याचा सल्ला दिला जातो.
- हे किती quantity मध्ये द्यायचे ते बाळाचे वय आणि वजन याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.
- तसेच vaccination नंतर सुद्धा बाळाला ताप येऊ शकतो तेव्हा सुद्धा डॉक्टर हे Drops देण्याचा सल्ला देतात.
4) Colic aid Drops ( Gas Relief Drops For Baby In Marathi)
- जर तुम्हाला असे वाटत असेल की बाळाचे पोट फुगलेले आहे आणि त्याला खूप जास्त प्रमाणात गॅसेस झाले असतील तर हे Colic aid Drops दिले जातात.
- परंतु हे ड्रॉप्स रोज देऊ नयेत.
- जेव्हा तुम्हाला वाटत असेल की बाळ खूप अस्वस्थ आहे आहे आणि त्यामुळे त्याची शांत झोपही होत नसेल ते खूप चिडचिड (irritate) करत असेल तेव्हाच बाळाला हे Drops द्यावेत.
- आणि याचे dosage कोणत्या महिन्यात किती द्यावे याबद्दल एकदा डॉक्टरांशी जरूर consult करावे.
- बाळाची digestive system ही पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते.
- त्यामुळे बाळाला पोटासंबंधी तक्रारी होऊ शकतात.
- बाळाला गॅसेस झाले असतील तर अजून एक उपाय म्हणजे बाळाच्या पोटाला हिंग लावावा.
- यासाठी कोमट पाण्यात थोडा हिंग घेऊन तो बाळाच्या बेंबीजवळ अलगद हाताने लावावा. याने देखील बाळाला आराम मिळू शकतो.
५) Sterilized Cotton Balls
- Cotton Balls हे नेहमीच आपल्याला उपयोगी पडतात जसे की बाळाच्या पोटाला हिंग लावायचा असेल किंवा बाळाच्या डोळ्यात घाण गेली असेल आणि त्याचे डोळे साफ करायचे असतील तर असे Cotton Balls घ्यावेत जे already Sterilized आहेत.
- ते कोमट पाण्यात(lukewarm water) मध्ये बुडवून घेऊन लावावेत.
६) Diaper Rash Cream
- जर बाळाला Diaper मुळे किंवा अन्य काही कारणांमुळे rashes झाले असतील तर बाळाला Diaper Rash Cream use करावे.
७) ORS-Oral Rehydration Solutions
- जर बाळाला वारंवार उलट्या(vomiting) किंवा जुलाब होत असतील तर बाळाला ORS द्यावे.
- कारण ORS शरीरामधील पाण्याचे प्रमाण maintain करते.
- त्यामुळे शरीरामध्ये energy maintain राहण्यासाठी बाळाला ORS जरूर द्यावे.
- ORS देताना ते किती प्रमाणात द्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
८) Bonnissan – As a general tonic
- बोनिसन पचनाच्या सामान्य तक्रारींपासून आराम देते, पोटशूळ कमी करते, भूक सुधारते आणि पचनास समर्थन देते, ज्यामुळे निरोगी वाढीस चालना मिळते.
- अर्भकं आणि मुलांमध्ये सामान्य पचनाच्या तक्रारींवर उपचार करण्यासाठी निरोगी वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अर्भक आणि मुलांसाठी दररोज आरोग्य पूरक म्हणून तुमच्या अर्भकांना किंवा मुलासाठी सर्वात योग्य
- डोस लिहून देण्यासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
९) मच्छरदाणी
- बाळाचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी बाळाला रोज मच्छरदाणीतच झोपवावे.
- पण जर तुम्ही कुठे बाहेर गेला असाल आणि मच्छरदाणी available नसेल तर Odomos Mosquito Repellent Cream लावावे.
- कारण त्याने डासांपासून बाळाचे रक्षण करता येते.
- जर बाळाला डास चावले तर अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो.
१०) Vicks Baby Rub
- जर बाळ कोणत्याही कारणाने अस्वस्थ झाले असेल तर बाळाला थोडासा Baby Rub चा मसाज करावा.
- हलक्या हाताने बाळाच्या छातीवर मसाज केल्यामुळे बाळाला relax वाटू लागते.
- Vicks Baby Rub चा वापर रोज करू नये आणि जेव्हा कराल तेव्हा थोड्या प्रमाणातच करावा.
११) Thermometer
- प्रत्येकाच्या घरी Thermometer असणे खूप आवश्यक आहे.
- जेणेकरून बाळाला किंवा घरातील कोणत्या अन्य व्यक्तीला ताप आला असेल तर त्याचे temperature चेक करता येते,आणि वेळीच औषधोपचार देता येतात.
१२) SBL Bio Combination 21
- बाळाला दात येताना काही त्रास होऊ नये किंवा झालाच तरी कमी प्रमाणात व्हावा यासाठी SBL Bio Combination 21 (25g) या medicine चा उपयोग केला जातो.
एक छोटीशी कविता
घरात नेहमी ठेवा औषधे
मग पळून जातील रोगही सारे
दूर होईल सारी चिंता
मनात नका ठेवू कोणतीही शंका
उपचारही करता येतील त्वरित
बाळही होईल तुमचे ठणठणीत
महत्त्वाची प्रश्न उत्तरे ( Frequently Asked Questions )
Q. बाळाच्या कानात रोज मालिश करण्याच्या वेळी तेल घालावे का?
A. नाही, बाळाच्या कानात रोज तेल घालू नये.
Q. बाळाला colic aid drops रोज द्यावे का?
A. नाही,बाळाला जेव्हा गॅसेसचा खूपच त्रास होत असेल तेव्हाच बाळाला colic aid drops द्यावे.
ही माहिती(information) मी माझ्या अनुभवावरून दिली आहे. तरी तुम्ही कोणतीही medicines देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच कोणतीही medicines देण्यापूर्वी ती sanitize करून मगच द्यावीत. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा:
1 thought on “9 Must Have Best Medicine For a Baby In Marathi | एक वर्षाच्या बाळासाठी आवश्यक असणारी औषधे”