आई कुठे काय करते? | Aai kuthe kay karte marathi nibandh
Aai kuthe kay karte marathi nibandh: काय झालं निबंधाच शीर्षक वाचून धक्का बसला का?अहो एक मराठी सिरीयल सुद्धा दाखवली जाते स्टार प्रवाह वर आई कुठे काय करते ?आज मी माझ्या या लेखातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे.
आई कुठे काय करते? | Aai Kuthe Kay Karte Marathi Nibandh
AAI KUTHE KAY KARTE MARATHI NIBANDH: हा प्रश्न घरातील सगळ्यांनाच पडतो. आता अगदी सगळ्यांच्याच घरी असा प्रश्न पडत असेल असे मी म्हणणार नाही परंतु साधारणपणे जर आपण विचार केला तर बहुतेक लोकांना असेच वाटते की आई कुठे काय करते?(AAI KUTHE KAY KARTE?)
सकाळ झाली की लवकर उठायचे आणि दुधवाल्याकडून दूध घ्यायचे ते तापवायचे त्यानंतर कोणी उठले असो व नसो चहा बनवायचा हे अगदी आईचे पहिले काम तिथपासून जी कामाला सुरुवात होते ती अगदी रात्री झोपतांना विरजण लावून झोपायचं. दिवसभर आईला कामे पुरत असतात. परंतु यामध्ये मजेशीर गोष्ट म्हणजे आईची कामे दिसतच नाही. आता मी तुम्हाला बहुतेक लोकांच्या घरी कसे चित्र असते त्याबद्दल थोडे सांगते.
घरातल्या व्यक्तींच्या अपेक्षा
आई असा आवाज दिला की आईने उपस्थित रहायलाच पाहिजे अशी मुलांची अपेक्षा असते आणि हो आई देखील लगेच धावत धावत येते. आई तू काय करतेस ते नंतर कर ना प्लीज आता माझ्या शर्टाचं बटण तुटलंय मला शाळेत जायला उशीर होईल. हो बाळा देते लगेच लावून असे म्हणून आई लगेच मुलाचे शर्टाचे बटण लावून देते ते पूर्ण होतंय ना होतंय तोवर लगेच मुलगी येते आई माझी वेणी घालून दे ना गं….. हो हो देते देते असे म्हणून आई लगेच मुलीची वेणी घालून देते. तोपर्यंत नवरा आवाज देतो काल मी तुला एक महत्वाची फाईल ठेवायला दिली होती ती कुठे गेली मला ताबडतोब हवी आहे, मग ती काय फाईल देईपर्यंत सासरे आवाज लावतात अगं सुनबाई चहा झाला की नाही मग लगेच चहा द्यायला येईपर्यंत दाराची बेल वाजते.
आता दाराची बेल वाजल्यावर दार तरी कोणी उघडावे अशी आईची अपेक्षा असते पण आई एक नजर सर्वांवर टाकते प्रत्येक जण आपापल्या कामात अगदी मग्न झालाय. दाराची बेल वाजलेली देखील कोणालाच समजत नाही मग काय शेवटी आईच दरवाजा उघडते. अहो काकू थोडी साखर मिळेल का आमच्याकडची संपली आहे हो देते ना असे म्हणून आई लगेच साखर देते या सर्व गडबडींमध्ये सर्वांची निघायची वेळ होते मग काय सर्वजण नाश्ता करून आपापला डबा घेऊन बाहेर पडतात. नंतर आईला वाटते की आपण देखील नाश्ता करून घ्यावा पण नाश्ता तर संपलेला असतो मग काय शेवटी आई कालचा उरलेला भातच खाते.
नोकरी करणारी आई
आता काळ बदललाय हल्ली बहुतेक लोकांची आई ही नोकरी करायला घराबाहेर पडते. यामध्ये घरच्या लोकांची साथ नसतेच असे नाही पण घरातला मजबूत पाया मात्र आईच असते. आई जरी नोकरी करत असेल तरी तिला घरातल्या जबाबदाऱ्या झटकून चालत नाही. घरातील सर्व कामे आटपून घराबाहेर पडायचे नंतर ऑफिस मधले सर्व काम करायचे. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायचे म्हणजे तारेवरची कसरतच असते. परंतु आई मात्र कोणतीही तक्रार न करता सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडत असते.
आईची प्रायोरिटी
मुख्य म्हणजे कितीही काही झाले तरी आपले मूल हीच आईसाठी प्रथम प्रायोरिटी असते. जेव्हा एखाद्या स्त्रीला समजते की ती आता आई होणार आहे तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. तिच्या आयुष्यातला तो खूप मोठा turning point असतो. मग ती कितीही आधुनिक विचारांची असली तरी सर्वात प्रथम आपल्या होणाऱ्या बाळाचाच विचार करू लागते. अगदी तिला ठेच जरी लागली तरी तिचा हात पहिल्यांदा आपल्या पोटावर जातो. एकवेळ मला काही झाले तर चालेल पण माझ्या बाळाला काही होता कामा नये अशी भावना तिच्या मनात निर्माण होते आणि जेव्हा ती एका बालकाला जन्म देते तेव्हा तिचा सुद्धा जणू पुनर्जन्मच होतो.
हे असे सर्व काही जरी असले तरीही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की Aai kuthe kay karte? आई ही तर प्रत्येकालाच आपल्या हक्काची वाटत असते. त्यामुळे आईला नेहमीच “take it for granted” धरले जाते.
परंतु असे न करता आईला सर्वांनी समजून घ्यायला हवे. आईचे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे ती नेहमी तुमच्या मताने चालणार नाही याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आईचा आदर करावा. आई ही आपली पहिली गुरु असते. आईचे ऋण कधीच कोणीही विसरता काम नये.
ग.दि.माडगूळकर यांचे एक सुंदर गीत आहे.
आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई
तर मी आज आई कुठे काय करते?(Aai kuthe kay karte?) यावर थोडक्यात निबंध लिहिला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
• जागतिक महिला दिनानिमित्त | On the occasion of World Women’s Day
अधिक वाचा:
7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child |मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?