‘पालकत्व’ म्हणजे काय आहे?
पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास (journey) शेअर केला आहे. नव्याने बाळ येण्याची चाहूल लागली की कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सल्ले देऊ लागतात आपण कितीही आपल्या आई-बाबांकडून ,आजी-आजोबांकडून ,मित्र-मैत्रिणींकडून ऐकले असेल तरीही स्वानुभव (self experience) महत्वाचा. मी हाच माझा experience तुमच्याशी share करणार आहे. नव्याने होणाऱ्या आई बाबांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की आवडेल आणि तुम्ही मला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल.
या ब्लॉग मध्ये मी pregnancy stage पासून ते बाळाचा जन्म झाल्यावर बाळाची घ्यायची काळजी त्यानंतर baby stage to toddler stage आणि मग नंतर kids stage अशी सर्व प्रकारची information शेअर करणार आहे. याचबरोबर मी काही Home Remedies आणि काही Recipes सुद्धा share करणार आहे.
या सर्व विषयांची माहिती देताना व्यवस्थित Research करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. नव्याने होणाऱ्या आई बाबांना या माहितीचा नक्की फायदा होईल याची मला खात्री आहे.
मी कोण आहे?
मी केलेली एक छोटीशी कविता
बाळ जन्माला येण्याची जेव्हा लागते चाहूल
आनंदते घर तेव्हा जेव्हा बाळाचे पडते पहिले पाऊल
जरी आई असेल कितीही हुशार आणि असेल कितीही जरी तिचे कितीही कर्तृत्व
परंतु खरे सुख समाधान तेव्हाच प्राप्त होते तिला जेव्हा मिळते तिला मातृत्व
सर्वच होतात खुश आणि होतो सर्वानाच हर्ष
जेव्हा होतो बाळाचा नाजूक आणि कोमल स्पर्श
बाळाच्या नादात विसरावे लागते स्वतःचे अस्तित्व
आणि स्वीकारावे लागते एक जबाबदार पालकत्व
पालकत्वाच्या काही महत्वपूर्ण टिप्स
• पालकांनी फक्त मुलांकडूनच अपेक्षा न ठेवता त्याला घडवण्यासाठीचे कौशल्य(skill) आपल्या अंगी बाळगले पाहिजे.
• पालकांनी मुलांच्या यशापशयात वाटेकरी होण्याची मानासिक तयारी ठेवली पाहिजे.
• मुलांची अभ्यासातील अथवा इतर कोणत्याही गोष्टीतील अडचण ही फक्त त्यांची नसून आपलीही आहे आणि आपण ती मिळून सोडवली पाहिजे,असा approach ठेवला पाहिजे.
• पालकांचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन positive असावा. त्यांनी मुलांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे.
• उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा मुलांना समजूनही घेतले पाहिजे.
• मुलांचा आनंद कशात आहे ते जाणून घेतले पाहिजे.
• पालकांनी आपल्या इच्छा,स्वप्ने मुलांवर लादू नयेत.
• जर मुले चूकत असतील तर त्यांना ओरडण्यापेक्षा,मारण्यापेक्षा प्रेमाने जवळ घेऊन त्यांची चूक समजावून दिली पाहिजे.