Balguti Ingredients In marathi In 2022|बाळगुटी कशी द्यावी?

balguti ingredients in marathi,balaji tambe balguti ingredients in marathi,balaji tambe balguti benefits in marathi,balguti balaji tambe in marathi,balguti marathi,santulan balguti in marathi,balaji tambe balguti in marathi,balguti syrup in marathi,बाळगुटी,बाळगुटी कशी द्यावी,बाळाला गुटी कधीपासून द्यावी

Balguti ingredients in marathi| बाळगुटी साहित्य

बाळ गुटी मध्ये वेखंड, बाळहिरडे, हळकुंड, काकडशींगी, बेहडा, मुरूड शेंग, जायफळ, खारीक, बदाम, सागरगोटा, मायफळ , पिंपळी किंवा लेंडीपिंपळी , अशवगंधा, बेहडा , ज्येष्टीमध ,यांसारखे घटक असतात.

Balguti Ingredients In marathi
 • १)सागरगोटा-सागरगोटा बाळाला रोज दिला तरी चालतो किंवा याचा उपयोग जर बाळाचे पोट दुखत  असेल किंवा ताप आला असेल तर करता येतो.
 • २)मुरुडशेंग – मुरुडशेंगचा वापर नावाप्रमाणेच मुरडा  झाला असेल तर होतो. जर बाळाच्या पोटात जंत झाले असतील,जुलाब लागत असतील तर याचा वापर होतो.
 • ३)मायफळ – मायफळ चा वापर जर बाळाला खूप जास्त उलट्या होत असतील किंवा जुलाब होत असतील तेव्हा देता येते. मायफळ रोज देण्याची गरज नाही.
 • ४) हिरडा किंवा बाळहिरडा – हिरड्यामुळे बाळाची भूक वाढण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. तसेच हिरड्यामुळे गॅसेस कमी होण्यास मदत होते. जर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर हिरड्याचा खूप चांगला उपयोग होतो.
 • ५)हळकुंड – आपल्याला माहीतच आहे की हळदीचा उपयोग रक्तशुद्धीसाठी केला जातो. तसेच हळद ही कफशामक आहे. तसेच हळकुंड हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. म्हणून हे आपण नेहमी जरी बाळाला दिले तरी चालू शकते.
 • ६)पिंपळी किंवा लेंडीपिंपळी – जर बाळाला सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर पिंपळी द्यावी. तसेच याचा उपयोग श्वसनसंस्था आणि पचनसंस्थेसाठी होतो.
 • ७)अशवगंधा – अश्वगंधा जर तुम्ही नेहमी दिले तर बाळाचे वजन वाढण्यास मदत होते. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर बाळाला चांगले बाळसे धरते. अश्वगंधामुळे बाळाची एनर्जी आणि इम्म्युनिटी वाढण्यास मदत होते.
 • ८) बेहडा – बाळाला जर सर्दी,खोकला किंवा जुलाब होत असतील तर बेहड्याचा उपयोग होतो.
 • ९) ज्येष्टीमध – ज्येष्टीमधमुळे आवाज गोड होण्यास मदत होते. तसेच ज्येष्टीमध पित्त आणि वात कमी करणारे आहे. त्वचेसाठी सुद्धा ज्येष्टीमध चांगले आहे. जर बाळाच्या छातीत कफ झाला असेल आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ज्येष्टीमध देऊ शकता. तसेच ज्येष्टीमध रोज देण्यास देखील काहीच हरकत नाही.
 • १०)काकडशिंगी – जर बाळाला खोकला येत असेल,ताप येत असेल,उचकी येत असेल तसेच उलटी येत असेल अशा वेळी तुम्ही काकडशिंगीचा उपयोग करू शकता.
 • ११)नागरमोथा – नागरमोथा हे जंतनाशक असून याच्यामुळे बाळाची युरीन साफ होण्यास मदत होते.
 • १२)सुंठ – बाळाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सुंठीचा उपयोग करता येतो. तसेच सुंठीमुळे बाळाचे पचन होण्यास देखील मदत होते. तसेच याचा अजून एक उपयोग म्हणजे बाळाच्या पोटात  दुखत असेल खोकला असेल तरीसुद्धा तुम्ही बाळाला सुंठ देऊ शकता.
 • १३)जायफळ-जायफळ चा महत्वाचा उपयोग म्हणजे याने बाळाला शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच बाळाची बुद्धी वाढण्यासाठी सुद्धा जायफळाचा उपयोग होतो. तसेच बाळाला जास्त प्रमाणात जुलाब होत असतील तरीसुद्धा जायफळ देता येते. परंतु जायफळचा वापर रोज करू नये. कारण त्यामुळे बाळाला पोट साफ होण्यास त्रास होऊ शकतो. तसेच जायफलचे जास्तीत जास्त चार वळसे देता येतात. त्यापेक्षा जास्त देऊ नये आणि सुरुवातीला एक वळस्यापासून सुरुवात करावी.
 • १४)खारीक-बाळाची हाडे बळकट  करण्यासाठी तसेच ताकद वाढवण्यासाठी खारकेचा उपयोग केला जातो.खारकेचा वापर बाळगुटीमध्ये रोज केला जाऊ शकतो तसेच खारीक ही गोड असल्यामुळे बाळगुटीमध्ये खारीक दिल्यास बाळ ती आवडीने घेतो. कारण बाकी सर्व घटकांची चव ही फारशी चांगली नसते त्यामुळे बाळ बाळगुटी घेताना नखरे करू शकतो. म्हणूनच खारकेचा समावेश बाळगुटीमध्ये जरूर करावा. 
 • १५)बदाम- ज्याप्रमाणे आपण रात्री बदाम भिजत टाकून दुसऱ्या दिवशी त्याचे साल काढून खातो. त्याप्रमाणेच गुटीमध्ये सुद्धा बाळाला रात्री भिजवलेला बदाम दुसऱ्यादिवशी त्याचे साल काढून उगाळून द्यावा. बदामाचा वापरसुद्धा बाळगुटीमध्ये रोज करावा आणि बाळ जसजसे मोठे होत जाईल त्याप्रमाणे त्याचे प्रमाण वाढवावे.
 • १६) वेखंड- वेखंडाला एक प्रकारचा उग्र वास असतो,परंतु बाळाची आकलनशक्ती चांगली होण्यासाठी वेखंडाचा उपयोग केला जातो. तसेच वेखंडामुळे बाळाचे उच्चर स्पष्ट होण्यास मदत होते. बाळाला जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर वेखंड मदत करते. परंतु तुम्ही जास्तीत जास्त वेखंडाचे चार ते पाच वेढेच घेऊ शकता .
 • १७)कुडा – बाळाला जुलाब होत असतील किंवा ताप आला असेल तर तुम्ही  गुटीमध्ये करू शकता.
 • १८) अतिविषा-अतिविषा हे वनस्पतीचे एक मूळ आहे. हे बाळाचे चांगले पचन करण्यास मदत करते. तसेच बाळाला जर ताप आला असेल तरीसुद्धा याचा उपयोग केला जातो. परंतु याचा वापर  मर्यादितच करावा.

महत्वाच्या टिप्स

 • १) बाळ जर आजारी असेल तर बाळाला बाळगुटी देऊ नये.
 • २) गुटीच्या जर तुम्हाला वनस्पती मिळत असतील तर ते उगाळून देणे जास्त चांगले असते आणि जर ते मिळत नसेल तर रेडीमेड गुटी जी पावडर स्वरूपात असते ती द्यावी.
 • ३) बाळाला हिरडा,पिंपळी,जायफळ,वेखंड,ज्येष्ठमध,हळकुंड,सुंठ,खारीक,बदाम,अशवगंधा हे रोज देऊ शकता.
 • ४) बाळाला गुटी पचत आहे की नाही हे ऑबझर्व्ह करूनच गुटी द्यावी जर काही कारणाने बाळाला गुटी पचत नसेल तर फक्त खारीक आणि बदामच द्यावेत.
 • ५)बाळगुटी देताना बाळ जेवढ्या महिन्याचे आहे तेवढे घ्यावेत.
 • ६)बाळाला गुटी देताना स्वछता ठेवणे हे खूप महत्वाचे आहे . स्वच्छता ठेवली नाही तर त्याचा बाळाला त्रासही होऊ शकतो.

बाळगुटी:

थोडक्यात सांगायचे झाले तर गुटी म्हणजे बाळाची घरगुती औषधे ज्यामुळे बाळ आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते. तसेच बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी आणि विकासासाठी बाळगुटी खूपच उपयुक्त आहे.

बाळाच्या प्रकृती ला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह. गुटी घेतांना पालकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. बाळाला गुटी देणे खुप फायदेशीर असते.

परंतु ही गुटी उगाळतांना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.

बाळगुटी देताना सहाणेवर उगाळून द्यावी लागते आणि एकदा उगाळल्यावर ती लगेचच द्यावी लागते जास्त उशीर करून चालत नाही.

गुटी ही साधारण पणे बाळ सकाळी उठल्यावर दयावी. यासाठी सर्वप्रथम ५-१० मिनिटे उकळलेल्या पाण्याने सहाण स्वच्छ धूवून घ्यावी. त्यानंतर आईचे स्तनाचे दूध साधारण १०-१२ थेंब त्यावर टाकावेत. नंतर गुटीच्या साहित्यामधून जे काही द्यायचे आहे त्याचे विशिष्ट प्रमाण लक्षात घेऊन एक एक करून उगाळावे आणि त्याच उकळत्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या चमच्या मध्ये ते दूध घेऊन बाळाला गुटी पाजावी.बाळाला गुटी पाजून झाल्यावर त्याला थोडे अंगावरचे दूध द्यावे जेणेकरून बाळाच्या तोंडात कडवटपणा राहणार नाही. कारण गुटीमधले काही घटक हे कडवट असतात.  त्यानंतर साहित्यातील हे घटक परत लगेच धुवून आणि स्वच्छ पुसून airtight डब्यात परत व्यवस्थित ठेवावेत जेणेकरून ते खराब होणार नाहीत. चुकून जरी ते थोडे जरी  ओले राहिले तरी त्याला बुरशी येऊन खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच गुटी देताना बरीच सावधानी बाळगावी लागते.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

बाळाला बाळगुटी कशी द्यावी?

बाळाला गुटी देतांना ती व्यवस्थित सहाणेवर उगाळून द्यावी. यासाठी तुम्हाला जे गुटीचे घटक द्यायचे आहेत ते आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावेत त्यानंतर ते कोरडे करून घ्यावेत नंतर थोडेसे आईचे दूध घेऊन त्यात एक एक घटक उगाळून द्यावा. बाळाला कोणते घटक सूट होत आहेत याचा अंदाज घेऊन तेच घटक त्याला उगाळून द्यावेत.

बाळाला बाळगुटी सिरप देणे योग्य आहे का?

जर काही कारणामुळे आपल्याला सर्व वनस्पती उगाळून देणे शक्य नसेल तर बाळगुटी सिरप दिले तरी चालते. फक्त ते देताना त्यावर लिहिलेल्या सूचनांची कलगी घ्यावी आणि त्याप्रमाणेच द्यावे.

संतुलन बाळगुटी (santulan balguti in marathi)

संतुलन बाळगुटी ही डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी बनवलेली आहे. जेव्हा आपण ही गुटी वापरतो तेव्हा ती ओपन केल्यावर तीन महिन्यांच्या आतच वापरावी लागते. जर तुम्हाला काही कारणामुळे वनस्पती आणून गुटी उगाळून देणे शक्य होत नसेल तर ही संतुलन बाळगुटी अवश्य वापरावी. गुटी हे बाळासाठी उत्तम टॉनिक असते. यामध्ये सुद्धा त्याच वनस्पती आहेत ज्या आपण उगाळून देतो. ही गुटी तुम्ही सुवर्णसिद्ध जलमध्ये किंवा आईच्या दुधात देऊ शकता.

बालाजी तांबे यांच्या बाळगुटीचे फायदे(balaji tambe balguti benefits in marathi)

 • १)रोगप्रतिकारशक्ती वाढते
 • २)बाळाला वरचेवर सर्दी,कफ,खोकला,ताप येत नाही.
 • ३)बाळाच्या वजन वाढीसाठी उपयुक्त आहे.
 • ४)बाळाची कांती उजळते तसेच त्याला त्वचाविकार किंवा एलर्जी होत नाहीत.
 • ५)बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते.
 • ६)बाळाचे पोट साफ होण्यास ,पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
 • ७)बाळाच्या स्मरणशक्तीचा विकास होतो. त्याची बुद्धी,आकलनशक्ती वाढते.
 • ८)बाळ लवकर व स्पष्ट बोलू लागते तसेच त्याचा आवाजही गोड होतो.

तर आज मी तुम्हाला Balguti Ingredients In marathi( बाळगुटी कशी द्यावी)या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

लहान बाळासाठी पौष्टिक असे मेतकूट कसे तयार करावे।How to make a nutritious Metakut for a small baby?

बाळाला गुटी कधीपासून द्यावी | बाळाला गुटी द्यावी का | Balala guti kadhipasun dyavi

Leave a Comment

improve alexa rank