स्तनपान करताना कोणती काळजी घ्याल? | Best Brest Feeding Tips In Marathi
6 Best Brest Feeding Tips In Marathi: जेव्हा एका बाळाचा जन्म होतो तेव्हा आईला मातृत्व प्राप्त होते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जेव्हा पहिल्यांदा Brest Feeding करते तेव्हा तिला पूर्णत्व मिळाल्याचे समाधान मिळते. आज मी तुम्हाला Brest Feeding करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे.
Brest Feeding करणे हे बाळ आणि आई अशा दोघांसाठी फायद्याचे असते. ब्रेस्ट फीडिंग मुळे डिलिव्हरी नंतर होणारे ब्लीडिंग कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे ब्रेस्टफीडिंग मुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. याशिवाय Brest Feeding मुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. आज मी तुम्हाला Brest Feeding करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे.
Brest Feeding करतांना कशी position हवी? | How to hold a baby while breastfeeding
Brest Feeding करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागते ती म्हणजे बाळाला पकडण्याची स्थिती म्हणजेच पोझिशन. बऱ्याच वेळा ही पोझीशन चुकीची असते आणि त्याचा त्रास बाळ आणि आई अशा दोघांनाही होतो. Brest Feeding करताना आईने स्ट्रेट बसावे त्यामुळे Back Pain चा त्रास होत नाही.बाळाकडे वाकून बसले तर पाठ दुखू शकते. तसेच बाळाचे पूर्ण शरीर आई कडे तोंड करून असले पाहिजे.जर बाळाची मान वाकडी झाली तर बाळाला त्रास होतो आणि बाळ दूध पीत नाही.त्याचबरोबर बाळाचे पोट आणि आईचे पोट एकमेकांना टच(touch) झाले पाहिजे,त्यामुळे प्रेमभावना निर्माण होते आणि आईला दूध येण्यास सुरुवात होते. आईने बाळाच्या मानेला आणि पूर्ण शरीराला आधार(support) दिला पाहिजे. त्यामुळे बाळाला दूध पिताना त्रास होत नाही. याच बरोबर आईने देखील तिला कम्फर्टेबल वाटेल असेच बसले पाहिजे. यासाठी Feeding Pillow चा देखील वापर करू शकता.Newborn Baby ला दोन-दोन तासांनी दूध पाजावे. त्यानंतर जसजसे बाळ मोठे होईल तसतशी ही gap वाढू लागते. त्याचप्रमाणे बाळाची जर इच्छा नसेल तर त्याला बळजबरीने दूध पाजू नये. त्यामुळे बाळ चिडचिड करू लागते. तसेच बाय दूध पीत असेल आणि दूध पिता पिता झोपले असेल तरीदेखील थोडा वेळ तरी त्याच्या तोंडातून nipple काढू नये. कारण काही वेळा आपण थकलेले असतो आणि लगेच बाळाला खाली ठेवतो त्यामुळे बाळाची झोप disturb होऊ शकते.
Brest Feeding करतांना बाळंतिणीचा आहार कसा असावा?
स्तनपान करणाऱ्या स्तनदा मातांचा आहार हा पौष्टिक आणि सात्विक असावा. यामध्ये बाळंतिणीला असे पदार्थ खायला हवेत ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळंतिणीने दुधात शतावरी कल्प टाकून दूध प्यायला हवे. तसेच भरपूर पाणी प्यायला हवे. त्याचप्रमाणे पोळी खाताना ती कुस्करून खायला हवी. बाळ दूध पिण्याच्या आधी एक ग्लास पाणी आणि दूध पिऊन झाल्यानंतर एक ग्लास पाणी compulsory प्यायला हवे. त्याच प्रमाणे आवडत असेल तर ज्यूसेस देखील पिऊ शकता. याशिवाय बाळंतिणीला पौष्टिक असे डिंकाचे,मेथीचे,अळीवाचे लाडू दिले जातात. याशिवाय आईने मूग डाळीचे वरण सूप घेतले पाहिजे. तसेच खसखशीची खीर,अळीवाची खीर असे पदार्थ खाल्ले पाहिजेत.त्याचप्रमाणे बाळंतिणीने तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. याशिवाय gases होणारे पदार्थ देखील टाळावेत.चहा,कॉफी यांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. तसेच व्यसन करणे टाळावे. गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत.कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
आईचे दूध:
आईचे दूध हे बाळासाठी अतिशय महत्त्वाचे असते.ते जरी पांढरे , पिवळे कसेही असेल तरीही या दुधामुळे बाळाची immunity वाढण्यास मदत होते.यामध्ये Exception म्हणजे काही बाळांना आईचे दूध पचत नाही. त्या बाळांना डॉक्टर Formula Milk किंवा alternative देण्याचा सल्ला देतात. बाकी नॉर्मली बाळाला आईचे दूधच द्यावे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या 48 तासाच्या आत बाळाला आईचे दूध द्यावे. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आई लगेचच बाळाला दूध देऊ शकते. सिझेरियन डिलिव्हरी ला थोडा वेळ लागतो. बाळाच्या जन्मानंतर आईला जे दूध येते ते पिवळ्या चीकासारखे असते त्याला(colostrum) The First Milk असे म्हणतात. यामध्ये जास्त प्रमाणात Proteins असतात. या colostrum मध्ये antibodies असतात ज्यामुळे बाळाची immunity वाढण्यास मदत होते.
वातावरण:
Brest feeding करणाऱ्या स्तनदा मातांनी नेहमी आनंदी वातावरणात रहायला हवे. त्यामुळे दूधदेखील पुरेशा प्रमाणात येते.जर आईला कोणत्याही प्रकारचे tension असेल तर दुधाची मात्रा कमी होते. म्हणून आईचे मन नेहमी प्रसन्न आणि शांत असायला हवे.
कपडे:
स्तनपान करताना ना आई नेहमी कम्फर्टेबल असणारे कपडे घालावेत. त्याचप्रमाणे शक्यतो सुती आणि मुलायम कपडे घालावेत जे बाळाला टोचणार नाहीत . त्याचप्रमाणे काही अलंकार घातले असतील तर त्याचा बाळाला काही त्रास होत नाही ना ते एकदा check करावे.
बाळाचे रडणे:
बाळ जर सारखे रडत असेल तर त्याला भूक लागली असेल हे एकच कारण नाही हे समजून घेतले पाहिजे. कधीकधी बाळाला गॅसेस होत असतील किंवा काही कारणामुळे इरिटेशन होत असेल त्यामुळे आईने समजून घ्यायला पाहिजे की बाळ कशामुळे रडत आहे.
Brest Feeding संबंधी काही गैरसमज:
स्तनपान करतांना एक साईड ने दूध येते आणि दुसऱ्या साईडने पाणी असे मानले जाते. त्यामुळे थोडावेळ एक साईड ने आणि नंतर दुसऱ्या साईडने दूध पाजण्याचा सल्ला दिला जातो. परंतु पहिले पहिले जे दूध येते ते पातळ असते त्याला Foremilk असे म्हणतात. आणि जेव्हा घट्ट दूध यायला सुरुवात होते त्याला Hindmilk असे म्हणतात. तेव्हा बाळाला दुसऱ्या साईटला घेतले जाते. त्यामुळे बाळाचे पुरेसे पोषण होत नाही. कारण Hindmilk मध्ये nutrients असतात. त्यामुळे हे असे न करता जेव्हा तुम्ही बाळाला दुध पाजता तेव्हा एका साईडने दूध पाजावे. आणि नंतर थोड्यावेळाने जेव्हा बाळाला परत भूक लागेल तेव्हा दुसऱ्या साईडने दूध पाजावे.
FAQ(Brest Feeding संबंधी काही महत्वाची प्रश्न उत्तरे)
१) बाळ किंवा आई आजारी असेल तर बाळाला Brest Milk द्यावे का?
A. होय,बाळ किंवा आई या दोघांपैकी कोणीही जरी आजारी असेल तरी आपण बाळाला Brest Milk देऊ शकतो. जेव्हा बाळ आजारी असते तेव्हा Formula Milk पेक्षा आईचे दूध हे बाळासाठी चांगले असते. आईच्या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती(immunity) वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे Research मध्ये असे दिसून आले आहे की जी मुले Brest Milk घेतात ती कमी आजारी पडतात. त्यामुळे जरी बाळ आजारी असेल आणि त्याला दूध पिताना त्रास होत असेल तर Brest pump ने दूध काढावे आणि चमच्याने दूध पाजावे.
त्याचप्रमाणे आई जरी आजारी असेल तरीसुद्धा बाळाला Brest Milk द्यावे. यामध्ये Exception म्हणजे जर आईला काही गंभीर आजार असेल आणि डॉक्टरांनी काही कारणांनी Permission दिली नसेल तरच बाळाला आईचे दूध देऊ नये. नाहीतर बाळाला आईचे दूध देऊ शकतो. कारण जेव्हा आईला सर्दी,खोकला यासारखे किरकोळ आजार होतात तेव्हा आईच्या शरीरात त्या आजाराविरोधात लढण्यासाठी antibodies तयार होतात. आणि त्यातून आईला एक प्रकारची energy मिळते. आणि जेव्हा बाळ दूध पिते तेव्हा आईच्या शरीरात तयार झालेल्या antibodies ,wbc’s यादेखील बाळाला मिळतात. म्हणजेच जरी बाळ आजारी नसेल तरी देखील बाळाला या antibodies मिळतात. त्यामुळे बाळाला फायदाच होतो.
2) Newborn babies ना दिवसातून किती वेळा दूध पाजावे?
A. Newborn babies ना साधारणतः दिवसातून ८ ते १२ वेळा दूध पाजावे. त्यानंतर जसजसे बाळ मोठे होऊ लागते तसतसे ७ ते ९ वेळा आणि नंतर हे प्रमाण अजून कमी होऊ लागते.
3) बाळाचे पोट भरले आहे की नाही ते कसे ओळखावे?
A. जेव्हा बाळ स्वतःहून दूध पिणे थांबवतो तेव्हा आईने एकदा चेक करावे दूध व्यवस्थित येत आहे की नाही याशिवाय बाळ दिवसातून ७ ते ८ वेळा शु आणि शी व्हावस्थित करत असेल तर बाळाचे पोट भरले आहे असे समजावे. तसेच दर महिन्याला बाळाचे वजन अर्धा किलो तरी वाढत असेल तर बाळाचे routine बरोबर आहे असे समजावे.
काही टिप्स | Stanpan tips in marathi | Breastfeeding tips in Marathi
- आईने नेहमी positive राहायला हवे. कारण आईची positive energy बाळाकडे transfer होत असते.
- Brest Feeding करताना टीव्ही,मोबाइल बघणे टाळावे.
- Brest Feeding करताना कोणतीही गरम वस्तू खाऊ किंवा पिऊ नये. कारण चुकून धक्का लागला तर बाळाच्या अंगावर सांडू शकते. आणि बाळाला इजा पोहोचू शकते.
- Brest feeding करतांना शक्यतो आईने झोपून दूध पाजू नये.
- जर आईने कोणतेही अलंकार घातले असतील तर ते बाळाला टोचत तर नाहीत ना ते एकदा check करावे.
तर मी आज तुम्हाला Best Brest Feeding Tips In Marathi वर आमचा हा लेख आवडला असेल आणि स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडक्यात माहितीआवडली असेल तर हा लेख तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा:
How to develop reading skills in child in Marathi
4 thoughts on “6 Best Brest Feeding Tips In Marathi | स्तनपान करताना कोणती काळजी घ्याल?”