Brest Pump Information In Marathi In 2022|ब्रेस्ट पंप म्हणजे काय?ब्रेस्टपम्पचे फायदे आणि तोटे काय आहेत?

Brest Pump Information In Marathi:

आपल्याला माहीतच आहे की आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. ते बाळासाठी अमृतच असते. डॉक्टरसुद्धा सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचेच दूध द्या असा सल्ला देतात.तसेच सहा महिने झाल्यावरही वरच्या आहाराबरोबरच आईचे दूध हे चालू ठेवायचेच असते. स्तनपान हे बाळासाठी पूर्णान्न मानले जाते. स्तनपानाचे बरेच फायदे आहेत. स्तनपानामुळे बाळाची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. तसेच आईचे देखील बऱ्याच रोगांपासून संरक्षण होते. परंतु हे सर्व जरी असले तरी हल्ली बऱ्याच महिलांना नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते आणि आईच्या दुधाची रिप्लेसमेंट तर होऊच शकत नाही तर अशा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ब्रेस्टपंप हा एक चांगला पर्याय आहे. परंतु बऱ्याच महिलांना ब्रेस्टपम्प कसा वापरावा,त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत याबद्दल फारशी माहिती नसते. आज मी तुम्हाला या लेखातून याविषयी माहिती सांगणार आहे.

Brest Pump Information In Marathi
Brest Pump Information In Marathi

ब्रेस्ट पंप म्हणजे काय?What is Brest Pump

ब्रेस्ट पंप हे एक असे उपकरण आहे की ज्यामध्ये आई तिचे दूध पम्पाच्या सहाय्याने काढून साठवून ठेवू शकते. हे ब्रेस्ट पंप दोन प्रकारचे असतात मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक

  • मॅन्युअल पंप – मॅन्युअल पंप मध्ये हाताने पंप दाबून दूध काढले जाते.
  • इलेक्ट्रिक पंप – इलेक्ट्रिक पम्पामध्ये ऑटोमेटिकली पम्पाच्या साहाय्याने दूध काढले जाते.

ब्रेस्टपम्पचे फायदे आणि तोटे काय आहेत?What are the benefits of brest pump

जर तुम्हाला नोकरीनिमित्त किंवा काही कामामुळे घराबाहेर पडायचे असेल आणि तुम्हाला येण्यास उशीर होणार असेल तरीदेखील तुम्ही बाळाला तुमचे दूध देऊ शकता. ब्रेस्टपंपच्या सहाय्याने तुम्ही बाळासाठी तुमचे दूध काढून साठवून ठेऊ शकता त्यामुळे तुम्ही बाळाजवळ नसलात तरी बाळाला आईचे दूध मिळू शकते.त्यामुळे बाळ आईच्या दुधापासून वंचित राहत नाही. तसेच काही बाळांना आईचे दूध नीट ओढता येत नाही त्यांना खूप त्रास होतो अशा बाळांना देखील ब्रेस्ट पंप च्या सहाय्याने दूध काढून वाटी चमच्याने किंवा बाटली ने देता येते.

परंतु लहान बाळांना शक्यतो बाटली ऐवजी चांदीच्या वाटी चमच्याने दूध पाजावे. अगदीच एखाद्याला शक्य नसेल तरच बाटलीचा वापर करावा. परंतु बाटली वापरताना ती व्यवस्थित उकळून घ्यावी. म्हणजे तिचे निर्जंतुकीकरण होते. तसेच ती चांगल्या quality ची असावी. बाळाच्या बाबतीत कधीच कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये.

ब्रेस्ट पम्पचा वापर किती वेळा करावा?How often should Brest Pump to be used

साधारणपणे दर 2-3 तासांनी ब्रेस्ट पंपचा वापर करू शकतो परंतु आवश्यकता असेल तरच ब्रेस्ट पम्पचा उपयोग करा. असे म्हणतात की बाळाला जेव्हा कडकडून भूक लागते तेव्हा आईच्या स्तनातून दूध वाहू लागते. त्यामुळे आईचे शरीर दुधाची मागणी ओळखते आणि त्याप्रमाणे दूध निर्माण होते,आणि हे व्यवस्थित मॅनेज केले तर दुधाचा प्रवाह खंडित होत नाही. आईला व्यवस्थित दूध येते. तसेच दुधाच्या बाबतीत आईने नेहमी सकारात्मक रहायला हवे.मनात कोणतेही वाईट विचार आणू नये. घरातील वातावरण प्रसन्न हवे. नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात रहावे,चांगला विचार करावा असे केले तर दुधाची मात्रा कमी होणार नाही. तसेच ज्या पदार्थांमुळे दूध वाढते असे पदार्थ खावेत.

कोणता ब्रेस्ट पंप निवडावा?Which Brest pump to choose?

ब्रेस्ट पंप कोणता निवडावा ही प्रत्येकाची आपापली चॉईस असते. मॅन्युअल पम्पामध्ये दूध काढण्यासाठी इलेक्ट्रिक पम्पापेक्षा जास्त वेळ लागतो. मॅन्युअल पम्पमध्ये साधारणपणे १० ते ४० मिनिटे एवढा वेळ लागतो कारण मॅन्युअल पम्पामध्ये दूध स्तनांमधून पिळून काढावे लागते. तर इलेक्ट्रिक पम्पामध्ये १० ते १५ मिनिटात दूध काढले जाते. परंतु इलेक्ट्रिक पम्पाची कॉस्ट ही मॅन्युअल पम्पापेक्षा जास्त आहे. जर एखादी नोकरी करणारी स्त्री असेल आणि तिला रोजच कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक पम्पच सोयीचा आहे.आणि ज्या महिलांना थोड्याच वेळासाठी आणि कधीतरीच बाहेर जायचे आहे अशा महिलांसाठी मॅन्युअल पंप सोयीचा आहे.

जर तुम्हाला रोजच ब्रेस्टपम्प वापरायचा असेल तर सर्वप्रथम तो कसा वापरायचा ते नीट तपासून घ्या आणि त्याचा सराव करा. ब्रेस्टपम्पचा वापर झाल्यावर तो व्यवस्थित स्वच्छ आणि निर्जंतुक करणे खूप गरजेचे आहे.

ब्रेस्टमिल्क कसे साठवून ठेवावे?How to store Brest Milk

ब्रेस्टमिल्क साठवतांना सर्वप्रथम हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावेत.तसेच बाळासाठी ब्रेस्टमिल्क साठवताना ते चांगल्या स्टीलच्या भांड्यात किंवा मिल्क स्टोरेज बॅग्ज मध्ये साठवणे आवश्यक असते.दूध साठवण्यासाठी काचेचे भांडे घेणे टाळा. कारण काचेला दूधातील पेशी चिकटतात व त्यामुळे त्या बाळापर्यंत पोहचू शकत नाहीत.स्तनांमधून दूध काढल्यावर ते सामान्य तापमानामध्ये (normal temperature)ला चार तास एवढे राहू शकते.जर तुम्हाला जास्त वेळ दूध साठवायचे असेल तर तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा जर जास्त वेळ साठवायची गरज असेल तर ते तुम्ही फ्रीजर मध्ये ठेऊ शकता.परंतु जेवढे जास्त जुने दूध होईल तेवढी त्या दुधाची quality कमी होईल.बाळाला दूध देताना ते normal temperature वर असणे आवश्यक आहे.

टीप - जेव्हा तुम्ही स्तनांतून दूध काढता त्यावेळी तुमचे मन प्रसन्न आणि आनंदी असायला हवे.

ब्रेस्ट पंप वापरण्याचे तोटे काय आहेत?What are the disadvantages of using Brest Pump In Marathi?

१)बॉण्ड(Bond) -ब्रेस्टपंपाने काढलेले दूध पाजल्यामुळे बाळ व आईमध्ये बॉण्ड तयार होत नाही.त्यामुळे बाळाशी इमोशनल अटॅचमेंट होत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम बाळाच्या वाढीवर आणि विकासावर होतो.ज्या वेळी आई डायरेक्ट स्तनपान करते तेव्हा बाळाचे आणि आईचे असे एक घट्ट नाते तयार झालेले असते. बाळाच्या आणि आईच्या मनात प्रेमाची,ममतेची भावना निर्माण होते.बाळाला दूध द्यायचे असल्यामुळे आई बाळाला सोडून कुठेही जात नाही त्यामुळे बाळाला आईच्या कुशीत एक प्रकारची सुरक्षितता वाटते. त्यामुळे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होते.

6 Best Brest Feeding Tips In Marathi|स्तनपान करताना कोणती काळजी घ्याल?

२)वेळ(Time) – काही वेळा ब्रेस्ट पम्पच्या सहाय्याने दूध काढण्यास जास्त वेळ लागतो.

३)दुधाची मात्रा(Milk Quantity) – ब्रेस्ट पंप वापरल्यामुळे आईच्या दुधाची मात्र कमी होऊ शकते.

४)वेदना(Pain) – जर ब्रेस्ट पम्पचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला वेदना होऊ शकतात. त्यामुळे ते वापरण्याचे तंत्र व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

५)गुणवत्ता(Quality) – दूध साठवल्यामुळे दुधाची गुणवत्ता थोड्या प्रमाणात तरी कमी होते.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

१)ब्रेस्ट पंप वापरणे चांगले की स्तनपान करणे चांगले आहे?

स्तनपान करणे हे ब्रेस्ट पंप वापरण्यापेक्षा केव्हाही चांगले. परंतु काही वेळा काही अडचणींमुळे आई बाळाला स्तनपान करू शकत नाही यावर ब्रेस्ट पंप हा उत्तम पर्याय आहे.

२)ब्रेस्ट पंप वापरल्यामुळे वेदना होतात का?

होय, ब्रेस्टपम्प वापरल्यामुळे थोड्याफार वेदना होऊ शकतात. पण नंतर तुम्हाला त्याची सवय होते.

तर मी आज तुम्हाला ब्रेस्ट पंप म्हणजे काय त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत(Brest Pump In Marathi) याविषयी माहिती सांगितली. मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल .जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी,आवडते शिक्षक माहिती,my favourite teacher essay in marathi

My mother essay in marathi, माझी आई निबंध मराठी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

Leave a comment

improve alexa rank