How to control anger in marathi In 2024 | मुलांशी बोलतांना रागावर कसे नियंत्रण ठेवाल?

How to control anger in marathi In 2024 | |मुलांशी बोलतांना रागावर कसे नियंत्रण ठेवाल?

रागावर(anger) नियंत्रण

राग म्हणजे काय? | Anger in marathi

How to control anger in marathi: रागाचा समानार्थी शब्द म्हणजे क्रोध. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच जणांचा राग येतो हा राग म्हणजे नककी काय?(anger in marathi) तो कमी करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याबद्दल आज मी तुम्हाला या लेखामधून माहिती सांगणार आहे.

लहान मुले ही थोडीशी खट्याळ,खोडकर असतात. त्यांचे वय हे मजा मस्ती करण्याचे असते. ती बऱ्याच वेळा तुमचे ऐकत नाहीत, हट्ट करतात. त्यांना सांभाळताना त्यांचे पालकत्व पेलताना काही कारणांवरून तुम्हाला त्यांचा खूप राग येतो आणि तुम्हाला मुलांचा राग आला की तुम्ही त्यांच्या अंगावर ओरडायला,मारायला सुरुवात करता.आणि मग नंतर थोड्या वेळाने आपल्यालाच गिल्टी फील होऊ लागते.आणि जरी आपली चूक असली तरी पटकन आपण मुलांना सॉरी देखील म्हणत नाही. या सर्व गोष्टींमुळे मुले तुमच्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत. ती तुम्हाला घाबरू लागतात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Spend Time With Yourself | स्वतःबरोबर वेळ घालवा 

आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला आधी हे समजून घ्यायला हवे की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येत आहे तो कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हे स्वतःचे स्वतःच तपासून पहा. त्यासाठी तुम्हाला स्वतःला थोडा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही मुलांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवू शकाल.

दुर्लक्ष करा | Neglect small mischiefs

जर तुमची मुले थोडासा मिश्कीलपणा करत असतील आणि त्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तसे न करता त्यांच्यावर न रागावता त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा

जर मुले थोडासा मिश्कीलपणा करत असतील त्याकडे दुर्लक्ष करा(Neglect small mischiefs)-लहान मुलांचा स्वभाव हा थोडा खोडकर असतो. त्यांचे वय हे मजा मस्ती करण्याचे असते. जर ते थोडा मिश्कीलपणा करत असतील तर त्यांच्यावर न रागावता त्याकडे थोडे दुर्लक्ष करा.कारण त्यावेळी जर मुलांवर रागावले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि मुले जर खूप जास्त प्रमाणात खोड्या काढत असतील तर त्यांना नंतर जेव्हा त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा समजावून सांगा. याचा नक्कीच फायदा होईल. यासाठी तुम्हाला तुमचे पेशन्स वाढवावे लागतील.

मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा | Remember the good things kids did 

जर तुम्हाला काही कारणावरून मुलांचा राग आला असेल तर लगेच रिऍक्ट न होता मुलांनी केलेली एखादी चांगली कृती आठवा. त्यामुळे तुमचे मन शांत होईल. आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल. आणि मग नंतर तुमचा राग शांत झाल्यावर प्रेमाने मुलांना समजवा. मुलांना समजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु प्रेमाने समजावल्यावर मुले नक्कीच तुमचे ऐकतील. तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात त्यामुळे जर तुम्ही काही कारणांमुळे सतत रागावत असाल तर तीदेखील रागावू लागतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.

जर आपल्याला राग(anger) आला असेल तर थोडे पाणी प्यावे | If you are angry, drink some water 

जर तुम्हाला मुलांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा राग आला असेल तर राग शांत करण्यासाठी थोडे पाणी प्यावे. त्यामुळे डोकं शांत होते.आणि तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येते.

१ ते १०० उलट आकडे मोजा | Count numbers from 1 to 100 inverted numbers

तुम्हाच्या तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचे असेल तर ही एक महत्वाची ट्रिक आहे जेव्हा तुम्ही उलट आकडे म्हणजेच १००,९९ ,९८,९७….. असे मोजायला सुरु करता तेव्हा यासाठी खूप वेळ लागतो आणि त्या वेळामध्ये तुमचा राग शांत झालेला असतो. त्यामुळे मुलांशी बोलताना जर तुम्हाला राग येत असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

मन शांत कसे करावे:

ध्यानधारणा(Meditation) 

आपण जेव्हा ध्यान करतो नामस्मरण करतो तेव्हा नक्कीच आपला राग शांत व्हायला मदत होते. त्यामुळे राग शांत करण्यासाठी ध्यान करा. राग ही एक प्रकारची भावना आहे. कित्येक वेळा राग हा क्षणीक असतो तेव्हा तुम्ही या मार्गांमुळे तुमचा राग शांत करू शकाल. आणि तुमच्या रागावर विजय मिळवू शकता.

यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा तुमचा मुलगा घरी आला आणि त्याने सांगितले की मला परीक्षेत कमी मार्क्स पडले आहेत त्यावर तुम्हाला लगेच राग येतो आणि तुम्ही मुलाला ओरडायला किंवा मारायला सुरुवात करता. पण असे न करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवला पाहिजे. कारण तुम्ही जरी कितीही ओरडलात मुलाला मारलं तरीसुद्धा त्याचे पेपर मधील मार्क्स वाढणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा आहे ती गोष्ट स्वीकारायला हवी. त्यानंतर मुलाला प्रेमाने जवळ घेऊन समजवायला हवे की बाळा यावेळी तुला परीक्षेत कमी मार्क्स पडले ठीक आहे परंतु अशी चूक परत परत करू नकोस.

तुला अभ्यास करताना काही अडचणी येत असतील तर तू मला किंवा तुझ्या टीचर ला शंका विचारू शकतोस. तुम्ही तुमच्या पद्धतीने मुलाला समजावू शकता. प्रेमाने समजावल्यावर तुमच्या मुलाला स्वतःहून त्याची चूक समजेल आणि तो नंतर अशी चूक पुन्हा करणार नाही. याउलट जर तुम्ही त्याला मारले ओरडले तर कदाचित तो तुम्हाला घाबरून अभ्यास करेलही पण तो मनापासून नाही. तुमच्या भीतीपोटी तो अभ्यास करेल त्याच्यावर एक प्रकारचा दबाव(pressure ) राहील. आणि हे आपल्याला होऊ द्यायचे नाहीये. त्याने मनापासून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायला हवेत.

हे देखील वाचा:7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child |मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

मुलांशी प्रेमाने बोलल्यावर काय फायदा होईल?

जर तुम्ही मुलांशी प्रेमाने बोललात त्यांना कोणत्याही गोष्टी नीट समजावून सांगितल्या तर तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये एक चांगले बॉण्डिंग तयार होईल. मुले तुमच्याशी मोकळेपणाने बोलू लागतील. आणि तुमचे म्हणणे देखील ऐकतील.

मुले खूप जास्त वेळ टीव्ही,मोबाइल बघत असतील तर काय करावे?

जर तुम्ही मुलांशी प्रेमाने बोललात त्यांना कोणत्याही गोष्टी नीट समजावून सांगितल्या तर तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये एक चांगले बॉण्डिंग तयार होईल. मुले तुमच्याशी मोकळेपणाने बोलू लागतील. आणि तुमचे म्हणणे देखील ऐकतील.

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “How to control anger in marathi In 2024 | मुलांशी बोलतांना रागावर कसे नियंत्रण ठेवाल?”

Leave a Comment