Education Loan Information In Marathi In 2024 | शैक्षणिक कर्जाची माहिती

Topics

Education Loan Information In Marathi In 2024 | शैक्षणिक कर्जाची माहिती

मला अभ्यास आवडतो असे म्हणणारी मुले तशी कमीच असतात. फार कमी लोकांना अभ्यासाची आवड असते. परंतु काही मुलांना मात्र इच्छा असून देखील पैशाअभावी शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा मुलांसाठी शैक्षणिक कर्ज(Education Loan) हा एक उत्तम पर्याय आहे. शैक्षणिक कर्जामुळे जर मुलांना शिक्षणाची आवड आणि इच्छा असेल तर ते आपली स्वप्न पूर्ण करू शकतात. आज मी या लेखामध्ये शैक्षणिक कर्जाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Education Loan Information In Marathi
Education Loan Information In Marathi:

बँकांद्वारे कोणकोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळू शकते?(What loans can be obtained from banks?)

  • शाळा (School)
  • महाविद्यालय (College)
  • वसतिगृह फीस (Hostel Fees)
  • वाचनालय फीस (Library Fees)
  • प्रयोगशाळा फीस (Lab Fees)
  • परीक्षा फीस (Exam Fees)
  • गणवेश(Uniform)


या सर्व गोष्टींसाठी कर्ज मिळू शकते.

शिक्षणासाठीचे कर्ज कोणाला मिळू शकेल? (Who can get an educational loan?)

१) ज्या व्यक्तीला शिक्षणासाठी कर्ज हवे आहे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
२)तिचे वय १८ पेक्षा जास्त असावे.
३)कर्ज देण्याआधी बँकेला गेरेण्टर(guarantor)ची आवश्यकता असते.
४)लोन घेणाऱ्या व्यक्तीचे बँकेत खाते असायला हवे.

शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents Required For taking Education Loan)

१)अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटो (Passport size photograph)
२)अर्जदाराचा रहिवासी पुरावा(Resident proof of the applicant)
३)फोटो ID (Photo identity proof)
४)शैक्षणिक कागदपत्रे(Academic documents)
५)जामीनदारांचा उत्पन्नाचा पुरावा( Income proof of the guarantor)
६)अर्जदाराला प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र(Certificate of admission to the applicant)
७)बँकेचा अर्ज(Bank application)
८)परदेशात जात असल्यास युनिव्हर्सिटीचे पत्र (University letter if going abroad)


एज्युकेशन लोनचे कोणकोणते फायदे आहेत?(What are the benefits of education loan?)

१)एज्यूकेशन लोनमुळे विदयार्थ्यांना आपल्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः उचलून आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनता येते.
२)आईवडिलांवर आपल्या शिक्षणाचा खर्चाचा जो अधिक लोड येत असतो तो आपण एज्युकेशन लोन घेऊन कमी करू शकतो आणि चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो.
३)जर आपण एज्युकेशन लोन घेऊन ते वेळेवर फेडले तर बँकेकडुन आपल्याला अधिकाधिक सुविधा प्रदान केल्या जातात.
४)ज्यांची शिक्षणासाठी खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना एज्युकेशन लोनमुळे शैक्षणिक साहाय्य प्रदान होत असते.
५)एज्युकेशन लोनमुळे आपल्याला टॅक्स बेनिफिट देखील मिळत असतो.

शिक्षणासाठीच्या कर्जाचे किती आणि कोणकोणते प्रकार आहेत?(How much and what are the types of educational loans?)
शैक्षणिक कर्जाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.

1) स्थान आधारीत शिक्षणासाठीचे कर्ज (Location Based Education Loan) :
स्थान आधारीत शिक्षणासाठीचे कर्ज म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला कर्ज हवे आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

a)देशांतर्गत शिक्षणासाठीचे कर्ज(Domestic education loan) : ज्यावेळी आपल्याला भारतातच शिक्षण घ्यायचे असेल तेव्हा आपण देशांतर्गत शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो. हे कर्ज आपल्याला तेव्हाच दिले जाते जेव्हा आपण एखाद्या संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश घेत असतो.

b)परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज(Educational loan for study abroad)
ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे ते या कर्जासाठी अप्लाय करतात. यासाठी विद्यार्थ्यांचे लोन अप्रूव्ह व्हावे लागते.

2) कोर्स तसेच अभ्यासक्रमावर आधारीत शिक्षणासाठीचे कर्ज(Course Based Education Loan)
कोर्सवर आधारीत शिक्षणासाठीच्या कर्जाचे तीन प्रकार आहेत.

१)शाळेच्या शिक्षणासाठी कर्ज(school education loan)
आपण शाळेच्या शिक्षणासाठी कर्ज हे बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी घेऊ शकतो.हे लोन प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतले जाते.

२)महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज(College education loan)
जे विद्यार्थी graduate आहेत किंवा undergraduate आहेत त्यांना त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठीचे कर्ज दिले जाते.

३)करिअरसाठी कर्ज( Career education loan)
विद्यार्थ्यांना आपले करियर घडवायचे असते आणि त्यासाठी वेगवेगळे करियर ओरिएंटेड कोर्स प्रोग्रॅम असतात त्यासाठी शिक्षणासाठी कर्ज घेतले जाते. अशा करिअर कोर्सेसमध्ये कॉम्पुटर सर्टिफिकिट कोर्स,डिप्लोमा कोर्स,आयटी कोर्स,नर्सिंग कोर्स ,जॉब देणारा एखादा स्कील बेसड सर्टिफिकिट कोर्स अशा वेगवेगळ्या कोर्सेसचा समावेश होत असतो.

3) कोलॅटरल बेसड शिक्षणासाठी कर्ज (Collateral Based Educational Loan) :

या प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बहुतेक बँक या लोन देण्यासाठी तारण म्हणुन काहीतरी तारण मागत असतात.यामध्ये प्रॉपर्टी ,ठेवी,सिक्युरीटी आणि थर्ड पार्टी गॅरंटी याचा समावेश होतो.

शिक्षणासाठी कर्ज देत असलेल्या भारतातील काही बँक(Some banks in India that provide educational loans)

१)एच डी एफ सी (HDFC)
२)एस बी आय (SBI)
३)कॅनरा बँक (Canara Bank )
४)विजया बँक (Vijaya Bank)
५)एक्सिस बँक (Axis Bank)
६)पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
७)आय डी बी आय बँक (IDBI Bank)

याव्यतिरिक्त अजूनदेखील बँक आहेत ज्या शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या बँकांचा व्याजदर वेगवेगळा असतो. कर्ज घेताना व्यवस्थित चौकशी करून आपल्याला योग्य वाटणारी बँक निवडावी.

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

आपल्याला बँकेकडून जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते?(What is the maximum loan you can get from a bank?)

सर्वसाधारणता तुम्ही उच्च शिक्षणासाठी 4 लाखांपर्यंतचे शिक्षणासाठीचे कर्ज कोणत्याही प्रकारचे तारण न घेता मिळवू शकता. तसेच शैक्षणिक कर्जाच्या योजनेअंतर्गत भारतातील अभ्यासासाठी जास्तीत जास्त 15 लाख आणि परदेशातील अभ्यासासाठी 25 लाखांपेक्षा जास्त कर्ज मिळू शकते.

कर्जाची परतफेड कधी करावी लागते?(When does a loan have to be repaid?)

साधारणपणे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर म्हणजेच शिक्षण संपल्यावर परतफेड सुरू होते. काही बँका नोकरी मिळवल्यानंतर 6 महिन्यांचा किंवा एक वर्षाचा विश्रांती कालावधी देखील देतात.परतफेडीचा कालावधी साधारणपणे 5 ते 7 वर्षांच्या दरम्यान असतो, परंतु त्यापुढेही वाढवता येतो.अभ्यासक्रमाच्या कालावधीत, बँक कर्जावर साधे व्याज दर आकारते. अभ्यासक्रमाच्या कालावधीत साध्या व्याजाचे पेमेंट केल्यास भविष्यातील परतफेडीसाठी विद्यार्थ्यावरील समान मासिक हप्ता (EMI) भार कमी होतो.

शैक्षणिक कर्ज बुडवल्यावर काय होते?(What happens when an education loan is sunk?)

जर काही कारणाने कर्ज फेडता आले नाही तर विद्यार्थी आणि त्याचबरोबर सहकर्जदार अशा दोगांचाही क्रेडिट स्कोर खराब होतो. त्यामुळे नवीन कर्ज मिल्ने खूपच कठीण होते. तसेच जी काही संपत्ती तारण म्हणून ठेवली असेल तीदेखील जप्त होते. जर शैक्षणिक कर्जाची परतफेड केली नाही तर सर्वच बाजूनी खूप नुकसान होते.

तर मी आज तुम्हाला Education Loan Information In Marathi(शैक्षणिक कर्जाची माहिती) याविषयी माहिती सांगितली. मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.ही सर्व माहिती मी माझ्या रिसर्चद्वारे दिली आहे तरी तुम्ही शैक्षणिक कर्ज घेताना व्यवस्थित चौकशी जरूर करून घ्यावी.

जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

जर तुम्हाला Education Loan बद्दल अजून इन्फॉरमेशन हवी असेल तर हे वाचा:

IBPS Clerk Recruitment 2022

SBI Mudra Yojana

आणखी वाचा:

◘ लहान बाळासाठी पौष्टिक असे मेतकूट कसे तयार करावे।How to make a nutritious Metakut for a small baby?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment