Garbh sanskar in marathi In 2022 Detailed Description |गर्भावस्थेत गर्भसंस्कार कसे करावेत?

Garbh sanskar in marathi
Garbh sanskar in marathi

garbh samvad,garbh sanskar marathi,balaji tambe garbh sanskar book in marathi,garbh sanskar book marathi,balaji tambe garbh sanskar,garbh sanskar by balaji tambe,garbh sanskar book in marathi,garbh sanskar pustak,ayurvediya garbh sanskar,balaji tambe books in marathi,marathi garbh sanskar,garbhsanskar marathi,garbhsamvad,ayurvedic garbh sanskar marathi

Garbh sanskar in marathi:

आज मी तुम्हाला गर्भावस्थेत गर्भसंवाद कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

गर्भसंस्कार म्हणजे काय?What is Fetal communication

गर्भसंस्कार म्हणजेच बाळ पोटात असल्यापासूनच त्याच्यावर केले जाणारे संस्कार .गर्भावस्थेत आपल्या होणाऱ्या बाळाशी केला जाणारा संवाद. गर्भसंवादामुळे होणाऱ्या बाळाचा मानसिक,बौद्धिक विकास होण्यास मदत होते. गर्भसंवादामुळे आई आणि बाळ यांच्यामध्ये एक चांगले bonding तयार होते. गर्भसंवाद करताना आईला आपल्या बाळाला हे पटवून द्यायचे असते की ती येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहे आणि तिच्या आयुष्यातील हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गर्भसंवाद साधताना आईने पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे:

गर्भसंस्कार करतांना विचार कसे हवे?

गर्भवती स्त्रीचे आचरण,तिचे विचार हे चांगले हवे.ती जसा विचार करेल तसेच वर्तन करेल आणि बाळाची संवाद साधेल त्यामुळे बाळाशी संवाद साधताना तिचे मन प्रसन्न हवे.तिच्या मनात द्वेष मत्सर क्रोध असता कामा नये कारण त्याचा परिणाम बाळावर होत असतो.

बाळाशी गर्भसंस्कार करतांना मनात कशी इच्छा हवी?

गर्भवती स्त्रीला आपले बाळ जसे व्हायला हवे असेल तशी इच्छा तिने मनात बाळगली पाहिजे म्हणजेच उदाहरण दयायचे झाले तर तिला आपल्या बाळाचे केस कुरळे हवे असतील आणि डोळे घारे हवे असतील तर तशी इच्छा मनात धरून बाळाशी त्याप्रमाणे बोलावे तुमची मनापासून जशी इच्छा असेल त्याप्रमाणे घडते हे मी खूप जणांच्या बाबतीत बघितले आहे.

बाळाशी संवाद(garbh samvad) साधताना मनात अहंकार नसावा:

गर्भवती स्त्रीच्या मनात अहंकारी भावना असता कामा नये मीच काय ती श्रेष्ठ आणि बाकी सर्व कनिष्ठ अशी भावना जर तिच्या मनात निर्माण होत असेल असेल तर त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.याउलट गर्भवती स्त्रीने बाळाशी संवाद साधताना त्याला चांगल्या चांगल्या थोर व्यक्तींच्या गोष्टी सांगायला हव्यात जेणेकरून बाळाला आईच्या पोटातच चांगली शिकवण मिळेल.

संगीत:

गर्भसंवाद(garbh samvad) साधताना आई चांगले संगीत ऐकू शकते त्यामुळे तिचे मन रिलॅक्स होते. relaxing म्युझिक मुळे बाळाशी कनेक्ट व्हायला मदत होते आणि बाळाला देखील ते संगीत आवडू लागते.त्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावर बाळ काही कारणाने रडत असेल तेव्हा जेव्हा तो ते संगीत ऐकेल तेव्हा त्याचे रडणे थांबते असे खूप जणांच्या बाबतीत झाले आहे.

डायरी:

गर्भावस्थेत आई जे काही फील करते ते बाळाला समजत असते परंतु जर गर्भवती स्त्री डायरी लिहीत असेल तर लिहिता लिहिता बाळाशी चांगल्याप्रकारे शकतो संवाद साधला जाऊ शकतो.दिवसभरात काय घडले ते ती डायरी मध्ये लिहू शकते.
याशिवाय गर्भवती स्त्री रोज रात्री झोपताना पोटावर हात घेऊन बाळाशी संवाद साधू शकते बाळ येण्याची चाहूल लागल्यापासून तिच्या लाईफ मध्ये काय काय चेंजेस होत आहेत हे ती बाळाशी बोलू शकते तिच्या आयुष्यात बाळ येणार असल्यामुळे तिला एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी मिळत असते एक प्रकारचा उत्साह मिळतो त्यामुळे ती सर्व कामे प्रसन्न मनाने करते बाळ येणार असल्यामुळे तिने तिच्या क्रोधावर कसे नियंत्रण ठेवले आहे हे ती बाळाला सांगू शकते.

बाबांचा रोल:

गर्भसंस्कार साधताना आईबरोबरच बाळाच्या बाबांचा रोल देखीलरोल देखील तेवढाच महत्त्वाचा असतो जेव्हा आईबरोबर बाबाही बाळाशी संवाद साधतात तेव्हा बाळाला एक कम्प्लीट फॅमिली चा feel येतो आणि बाळाचे bonding बाबांशी देखील घट्ट व्हायला मदत होते यासाठी आई व बाबा यांनी घरातील त्यांना प्रसन्न वाटणारी जागा निवडावी एक विशिष्ट वेळ निश्चित करावी त्यानंतर रोज त्या वेळी त्या जागी जाऊन बाळाशी संवाद साधावा याचा सर्वांनाच खूप फायदा होतो एक ठराविक वेळ व ठराविक जागा निश्चित केल्यामुळे बाळाला देखील माहित होते की त्याची आई बाबा आता त्याच्याशी बोलणार आहेत.

बाळाशी संवाद साधताना आई-बाबांनी त्यांना भविष्यात आपले बाळ कसे व्हायला हवे याबद्दल बोलावे याशिवाय आपले बाळ सुदृढ व निरोगी व्हावे ते हुशार व बुद्धिमान असावे आणि अजून आई-बाबांना आपल्या बाळाबद्दल जे काही वाटते ते बाळाबरोबर बोलावे अशाप्रकारे गर्भ संवाद केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.

गर्भसंस्कारासाठी बालाजी तांबे यांची बरीचशी पुस्तके आणि CD उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

गर्भसंस्कार केव्हा पासून सुरु करावेत?

जेव्हापासून आईला समजते की ती आता आहे आई होणार आहे तेव्हापासून ती गर्भसंस्कार करू शकते म्हणजेच आपल्या होणाऱ्या बाळाबरोबर बोलू शकते असे म्हटले जाते की 23व्या आठवड्यापासून आईचा आवाज बाळापर्यंत पोहोचला जातो.

गर्भसंस्कार करण्यामुळे खरेच फायदा होतो का ?

होय,गर्भसंस्काराचा फायदा नक्कीच होतो यासाठी तुम्हाला मनात कोणतीही शंका न घेता पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत कारण आई जे विचार करते त्याचाच परिणाम बाळावर होत असतो.

गर्भसंस्कार करण्याची योग्य वेळ कोणती?

गर्भ संस्कार करण्यासाठी एखादी विशिष्ट वेळ नसते परंतु तुम्हाला जी वेळ अनुकूल वाटत असेल रोज त्याच वेळी गर्भ संवाद साधावा.

गर्भसंवाद कोणी साधावा?

गर्भसंवाद आई आणि बाबा या दोघांनी साधावा त्यामुळे आईबरोबरच बाबांशी देखील बाळाचे नाते built व्हायला सुरुवात होते.

काही टिप्स:


१)गर्भ संवाद करताना तुम्ही एकच जागा,एकच वेळ निश्चित करत असाल तर त्याचा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जास्त फायदा होतो.

२)गर्भसंवाद करताना मन प्रसन्न आणि शांत हवे यासाठी तुम्ही मेडिटेशन ची देखील मदत घेऊ शकता.तुम्हाला तुमच्या बाळा विषयी जे वाटते ते व्यक्त करा.

३)तुम्हाला तुमचे बाळ जसे व्हायला हवे तसेच ते होणार आहे असा positive attitude ठेवावा.

४)गर्भसंवाद करताना आईच्या मनात राग,क्रोध, मत्सर,द्वेष असेल तर त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.

५)चांगल्या गोष्टींचं श्रवण, अध्यात्मिक पठण, शांत वातावरण, ध्यानधारणेसारखं धार्मिक आचरण आत्मसात करणं म्हणजेच गर्भसंस्कार होय.

एक छोटीशी कविता:garbhsanskar in marathi

मायेचा स्पर्श मातेचा, प्रेमाची हाक पित्याची
गर्भाशी होतो सुखसंवाद होते सुरुवात जीवनमिलनाच्या नात्याची
गर्भाशी बोलताना सुसंवाद असावा नित्य
पहिल्या हाकेतच बालकाचे कान होतील स्तुत्य
जन्मल्यानंतर बाळ जेव्हा शिरते आईच्या कुशीत
हाकेस देते दाद तेव्हा बाबा येतील खुशीत

तर मी आज तुम्हाला Garbh sanskar in marathi याविषयाबद्दल माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा :

◘ नवजात शिशूचे पालकत्व कसे स्वीकाराल ?

◘ गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत?

◘ स्तनपान करताना कोणती काळजी घ्याल?

◘Full Garbh Sanskar in Marathi | Garbha Raksha, Kalyana Mantras | Music for Pregnancy

Leave a comment

improve alexa rank