Gokulashtami information in marathi,gokulashtami in marathi,janmashtami information in marathi, janmashtami in marathi,krishna janmashtami wishes in marathi,krishna janmashtami marathi,Janmashtami Katha In Marathi,Shri Krishna Janmashtami Katha In Marathi,Krishna Chi Mahiti,Krishna Janmashtami Marathi,Janmashtami Vishay Mahiti,Happy Janmashtami In Marathi,Janmashtami Nibandh Marathi,श्री कृष्ण माहिती, गोकुळाष्टमी माहिती, गोकुळाष्टमी माहिती मराठी, जन्माष्टमी निबंध मराठी, गोकुळाष्टमी निबंध, गोकुळाष्टमी कधी आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती मराठी :
भारतामध्ये गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.यादिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. तसेच यादिवशी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून प्रत्येक वर्षी साजरी केली जाते.गोकुळाष्टमीला कृष्ण जन्माष्टमी,कृष्णाष्टमी,कृष्ण जन्माष्टमी,श्रीकृष्ण जयंती अशा विविध नावांनी ओळखले जाते. श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा आठवा अवतार असेही मानले जाते.
दहीहंडी साजरी करण्याची पद्धत का आहे?Why Dahihandi Festival Is Celebrated?
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त दही हंडी हा सण मोठ्या आनंदात,उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्णाला लोणी हे अतिशय प्रिय आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्ण लहानपणी दही, दूध, लोणी वगैरे खात असत. यशोदामाई लोणी कृष्णापासून वाचवून उंचावर ठेवत असे परंतु तरीही नटखट कृष्ण उंचावरून लोणी काढून ते खात असे.
यासाठी कृष्णाला त्याचे मित्र, सवंगडी मदत करत असत. या सर्व गोष्टींची एक छोटीशी आठवण म्हणून त्याला कृष्णापासून वाचवण्यासाठी, त्याची आई यशोदा बऱ्याचदा दही उंच ठिकाणी ठेवत असे, पण बाल गोपाल तिथे पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करायचे. म्हणूनच कृष्णाला माखनचोर असेदेखील म्हटले जाते. या घटनेची आठवण म्हणून दही हंडी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.
कृष्ण जन्माची कहाणी: Janmashtami Information In Marathi
कंस हा मथुरेचा राजा होता. त्याला देवकी नावाची एक बहीण होती. काही वर्षांनी देवकीचा विवाह वासुदेव याच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. कंस देवकीची पाठवणी स्वतः करण्याचे ठरवतो. त्यानंतर रथात बसून वासुदेव आणि देवकीला घेऊन कंस घरी जात असतो. तेवढ्यात एक आकाशवाणी होते, हे कंस ज्या देवकीला तू अतिशय प्रेमाने घेऊन जात आहेस तीच तुझ्या काळाचे कारण ठरणार आहे. तिचाच आठवा पुत्र तुझा वध करणार आहे.
ही आकाशवाणी ऐकून कंसाला खूप राग येतो तेव्हा देवकी त्याला वचन देते की ती तिच्या पोटी येणारा प्रत्येक पुत्र कंसाच्या स्वाधीन करेल. त्याप्रमाणेच कंस देवकीच्या पोटी येणाऱ्या सात मुलांना मारून टाकतो. ज्यावेळी देवकीला आठवा पुत्र होतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण वासुदेवाला द्रुष्टांत देऊन म्हणतात की मी देवकीच्या पोटी कंसाचा वध करण्यासाठीच जन्म घेतला आहे. तेव्हा आता वेळ न घालवता मला सुखरूप गोकुळात नंद आणि यशोदेजवळ पोहोचवा आणि यशोदेला जी आत्ताच मुलगी झाली आहे ती कंसाला सोपवा.
त्यानंतर भगवान वासुदेव त्या लहान बाळाला एका टोकरी मध्ये ठेवतात आणि गोकुळात जाण्यासाठी निघतात. देवकी बेशुद्ध अवस्थेत असते.त्यावेळी तुफान पाऊस पडत असतो. यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढत असते. वासुदेव चिंतेत असतात की एवढ्या तान्ह्या बाळाला आपण गोकुळात कसे बरे पोहोचवू आणि देवाची प्रार्थना करू लागतात आणि तेवढ्यात चमत्कार होतो जसाच यमुना नदीला तान्ह्या कृष्ण बाळाचा स्पर्श होतो नदीचे पाणी आटू लागते आणि वासुदेव निश्चिन्त होतात. अशाप्रकारे वासुदेव यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदेजवळ पोहोचतात. आणि ते नंदला म्हणतात की मित्रा मी या तान्ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे. हा मोठा होऊन मथुरा वासियांना कंसाच्या अत्याचारापासून वाचवेल. तेव्हा नंद छोट्या श्रीकृष्णाला
यशोदेच्या शेजारी झोपवतात आणि त्याच्या कन्येला वासुदेवाकडे सोपवतात. वासुदेव नंदचे आभार मानून परत जाण्यासाठी निघतात. अशाप्रकारे तान्हा कृष्ण देवकीपुत्र असून यशोदेकडे वाढू लागतो.
श्रीकृष्ण जयंती | १८ ऑगस्ट २०२२ |
गोपाळकाला | १९ ऑगस्ट २०२२ |
गोकुळाष्टमी शुभ मुहूर्त | १८ ऑगस्ट २०२२ रात्री १२.०३ ते १२.४६ |
महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)
गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते?How Is Gokulastami Celebrated?
गोकुळाष्टमीच्या दिवशी बरेच लोक दिवसभर उपवास करतात. गोकुळाष्टमीच्या व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. त्यानंतर मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर श्रीकृष्णाची पुजा करावी. धूप,दीप,नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णाच्या कथा ऐकाव्यात. बाळकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. यादिवशी काला करण्याची देखील पद्धत आहे.
देशभरात जन्माष्टमीच्या उत्सव कुठे कुठे साजरा केला जातो?Where Is Janmashtami Celebrated Across The Country?
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ,मथुरा,वृंदावन,द्वारका,जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते.
जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत (Janmashtami Wishes In Marathi)
श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती मराठी:गोपाळकाला
गोपाळकाला हा कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. कृष्ण जयंतीच्या दिवशी केलेल्या विशेष प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. जन्माष्टमीच्या दिवशी एका उंच ठिकाणी हंडी लावली जाते आणि गोविंदाची पथके “गोविंदा आला रे आला” असे म्हणत किंवा “गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा” असे म्हणत हंडी फोडतात. यासाठी मोठमोठ्या रकमेची बक्षिसे देखील लावली जातात. यासाठी गोविंदा पथके खूप मेहनत घेऊन महिना ते दोन महिने आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतात.
तर आज मी तुम्हाला Gokulashtami Information In Marathi या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा:
• GudiPadva Essay In Marathi In 2022|Gudi Padva Marathi Nibandh|गुढीपाडवा वर मराठी निबंध