GudiPadva Essay In Marathi In 2024 | Gudi Padva Marathi Nibandh | गुढीपाडवा वर मराठी निबंध

गुढीपाडवा(Gudipadva)

आज मी तुम्हाला गुढीपाडवा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.
आपण जर हिंदू पंचांग बघितले तर नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा(Gudipadva) म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा हा हिंदू लोकांचा अतिशय महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे,उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते.गुढीपाडवा हा सण साडे तीन मुहूर्तातील एक म्हणून ओळखला जातो.त्यामुळे बहुतांश लोक सोन्याची किंवा कोणती नवीन वस्तू विकत घ्यायची असेल तर गुढीपाडयाच्या दिवशी घेतात. यादिवशी घरोघरी गुढी उभारली जाते.


गुढी का उभारतात?(Why raise Gudi?)

प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळी रावणाचा पराभव केला आणि वनवास संपून त्यांनी अयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला. तेव्हा सर्वत्र आनंदाचे,उत्साहाचे वातावरण होते.अयोध्येतील प्रजा प्रभू श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी खूप आतुर होती. आणि त्याच आनंदात प्रजेने सर्वत्र तोरणे,गुढ्या उभारल्या. म्हणूनच गुढी उभारण्याची पद्धत आहे. जर कोणाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर तीदेखील गुढीपाडव्याच्या दिवसापासून केली जाते. गुढीला विजयाचे प्रतीक असे मानले जाते.
असे म्हणतात की ब्रम्हदेवानी गुढीपाडयाच्याच दिवशी विश्व् निर्माण केले म्हणूनच गुढीला ब्रम्हध्वज आणि इंद्रध्वज असेही म्हटले जाते. तसेच गुढीला धर्म ध्वजा असेही म्हटले जाते.
गुढी पाडवा म्हणजे आपले शरीर यामध्ये उलट वर्ण हे डोके दर्शवते तसेच काठी मणक्याचे प्रतिनिधित्व करते.

गुढीपाडव्याच्या दिवशी काय केले जाते?(What is done on the day of Gudipadva?)गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?(How is Gudipadva celebrated?)

गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. दाराला सुंदर तोरणाने सजवले जाते. त्यानंतर गुढी उभारली जाते.

गुढी कशी उभारली जाते?(How is Gudi erected?)

गुढी उभारताना ज्या ठिकाणी गुढी उभारायची असेल ती जागा स्वच्छ करून त्या जागी रांगोळी काढावी.त्यानंतर एक मध्यम उंचीची लाकडाची काठी घेऊन या काठीच्या टोकाला लाल,पिवळा किंवा नारिंगी रंगाचे कापड किंवा साडी बांधावी. यासाठी काळ्या रंगाचे कापड वापरू नये. गुढीला कडुनिबांची पाने,आंब्याच्या टहाळ्या बांधाव्यात. साखरेची माळ घालावी.त्यांनतर त्यावर कलश ठेवून गुढी उभारावी. नंतर हळद,कुंकू,फुले वाहून गुढीची पुजा करावी. त्यानंतर गुढीला नेवैद्य दाखवला जातो. त्यानंतर सायंकाळी हळद कुंकू वाहून गुढी पुन्हा उतरवली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते पदार्थ केले जातात?What foods are served on the day of Gudipadva?

गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपारिक पदार्थ बनवले जातात.सर्वसाधारणपणे वरण,भात,बटाट्याची भाजी,पोळी किंवा पुरी,श्रीखंड हे पदार्थ असतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे पान खाण्याची पद्धत का आहे?Why is there a practice of eating neem leaves on the day of Gudipadva?

गुढी उभारून झाली की आपल्याला प्रसाद म्हणून धने,गुळ आणि कडुनिंबाचा पाला दिला जातो. तर आपल्याला कडू कडू असणारा कडुलिंब खावा लागतो याचे एक शास्त्रीय कारण आहे आणि ते म्हणजे कडुलिंबामध्ये अनेक दुर्धर व्याधी नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे कडुलिंबाचे पान खाण्याची पद्धत आहे.कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

अधिक माहितीसाठी हे रेफर करा :

गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात ?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण(An important festival for farmers)

गुढीपाडवा हा शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. यादिवशी शेतकरी शेतात चांगले पीक यावे या उद्देशाने नांगरणी करतात.

गुढीपाडवा हा सण सार्वजनिक पद्धतीने कसा साजरा केला जातो?(How Is Gudipadva Celebrated In Public?)

गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ठिकाणी शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आजी आजोबांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक या शोभायात्रेत सहभागी होतात. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते. सर्वजण पारंपरिक पोषाख घालतात. स्त्रिया प्रामुख्याने नऊवारी साडी नेसतात. आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात आनंदात करतात.

अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदात,जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.

 

मी केलेली एक छोटीशी कविता

वसंताचे आगमन कोकिळेचे ऐकून गान

नवीन वर्षाच्या स्वागता गुढीपाडव्याचा मान

लांब काठी साखरेची गाठी

कडुलिंबाचा पाला घालू पोटी

तांब्याची लोटी सोनेरी स्पर्श

गुढीपाडयाचा सर्वांना हर्ष

गुढीपाडवा आरती

गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती

विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती

माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध अन पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती

साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती

पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती

गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती

अधिक वाचा:

7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child |मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “GudiPadva Essay In Marathi In 2024 | Gudi Padva Marathi Nibandh | गुढीपाडवा वर मराठी निबंध”

Leave a Comment