Guru Purnima unique information in marathi,गुरुपौर्णिमा विषयावर मराठी निबंध,गुरुपौर्णिमा माहिती मराठीमध्ये,गुरुपौर्णिमेचे महत्व,गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात?
Gurupurnima shlok हा श्लोक तर सर्वांनाच माहित आहे. गुरु म्हणजेच ब्रम्हा,विष्णू,महेश यांचे रूप. या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो. प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुचे खूप महत्व असते. आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात गुरु भेटत असतो. म्हणूनच गुरूला देवासमान मानले जाते.
‘आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी‘, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे आईबरोबरच वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात,त्यामुळे ‘मातृदेवो भव:, पितृदेवो भव:’, असेही म्हटले जाते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिले आई वडिलांना नमस्कार करून करावी असा सल्ला घरातील ज्येष्ठ मंडळी देतात.
आता आपण गुरुपौर्णिमा म्हणजे काय?गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल सविस्तर माहिती बघुया: Speech On Guru Purnima In Marathi
गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूला प्रणाम वंदन करण्याचा दिवस. यादिवशी गुरूंबद्दल मनातील कृतज्ञता व्यक्त केली जाते.साधारणतः वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात,त्यापैंकी आषाढात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात होते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं.
भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आता आपण गुरुपौर्णिमा म्हणजे काय?गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल सविस्तर माहिती बघुया यादिवशी गुरूंबद्दल मनातील कृतज्ञता व्यक्त केली जाते.गुरु हा आपल्याला योग्य मार्ग,दिशा दाखवणारा ,आपले काही चुकत असेल तर त्याची जाणीव करून देणारा असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला प्रचंड महत्व आहे. गुरूंबद्दल बोलताना नेहमीच कृष्ण-अर्जुन ,अर्जुन-द्रोणाचार्य,द्रोणाचार्य-एकलव्य,धौम्यऋषी-अरुणी,रामकृष्ण परमहंस-विवेकानंद,महर्षी व्यास आणि गणेश, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशा नावाजलेल्या जोड्यांचा उल्लेख केला जातो.शाळेप्रमाणेच निरनिराळ्या मठांमध्ये,मंदिरांमध्ये,आश्रमात आणि अशा अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमा २०२4 मध्ये कधी येईल? | When will Guru Purnima come in 2024?
तारीख | 21 जुलै 2024 |
वार | सोमवार |
तिथी |
21 जुलै 2024 रोजी रात्री ८ वाजून २२ मिनीटांपासून 21 जुलै 2024 रोजी संध्याकाळी ५ वाजून ९ मिनीटांपर्यंत |
नक्षत्र | पूर्वाषाढा २३. १८ |
योग | ऐंद्र १२.४४ |
करण | विष्टी १४.०५ |
राष्ट्रीय | २3 |
विद्या घेणे हे खूप महत्वाचे आहे आणि विद्यादान करण्याचे अतिशय पवित्र आणि महान कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री ,सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार असतो. गुरु म्हणजे दयेचा सागर असतो जो केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटत असतो. गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग यशस्वी होऊ शकत नाही. गुरूशिवाय आपल्या जीवनाला कोणताही अर्थ नाही. कारण ज्याप्रमाणे कोकिळेच्या आवाजात जरी गोडवा असला तरी कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतुच यावा लागतो, त्याप्रमाणे मनुष्याजवळ जरी कितीही उपजत ज्ञान असले तरीही ते फळाला येण्यासाठी त्याला गुरूंची गरज असते. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने बनते, त्याचप्रमाणे गुरुमुळे मिळालेल्या ज्ञानाला पूर्णत्व प्राप्त होते.
गुरुपौर्णिमा केव्हा सुरु झाली??When did Guru Purnima start?
भारतात फार पूर्वीपासूनच गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. पूर्वी मुलाची मुंज झाली की शिकण्यासाठी त्याला गुरुकडे रहावयास पाठवले जात होते. ज्ञान मिळवण्यासाठी त्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे.तसेच ज्ञानप्राप्ती नंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे.आता बदलत्या काळाप्रमाणे ही प्रथा बंद झाली आहे. मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवले जाऊ लागले. कोरोनामध्ये तर सर्वजण घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घेत होते. परंतु तरीही गुरुचे महत्व मात्र तेवढेच आहे.
गुरुपौर्णिमेचे अजून काय महत्व आहे?What is the significance of Guru Purnima?
गुरु पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची पद्धत आहे. जर आपल्याला काही दान, धर्म, तप करायचा असेल तर गुरुपौर्णिमेचा दिवस उत्तम मानला जातो. तसेच जर कोणता गुरु मंत्र प्राप्त करायचा असेल तरीही गुरु पौर्णिमा हा दिवस खूप शुभ मानला जातो.गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या जीवनाती यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो. गुरु पौर्णिमा या दिवशी केवळ गुरुंचाच नव्हे तर आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती जसे की आई-वडील,आजी-आजोबा,काका-काकू यांचा देखील सन्मान करावा व त्यांना वंदन करावे.
शिक्षणाचे महत्व सांगताना महात्मा फुले म्हणतात की ,
अशाप्रकारे महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे शिक्षण ही विद्या आपल्याला गुरूंकडूनच मिळते.
महत्वाच्या टीप्स(Important Tips)
- गुरूंचा नेहमी आदर करावा
- गुरूंनी दिलेली शिकवण नेहमी आचरणात आणावी तिचे पालन करावे.
- गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे त्यामुळे आपण त्यांच्यापुढे नम्र होऊन ज्ञान आत्मसात केले पाहिजे,कारण शेवटी आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम गुरूच करत असतो.
- गुरूंप्रमाणेच सर्व जेष्ठ व्यक्तींचादेखील आदर करावा.
- गुरूंचा शिष्यावर खूप प्रभाव असतो आणि आजही गुरु-शिष्याचे नाते हे पवित्र मानले जाते.
महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)
गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे?
गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. ज्यावेळी कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की, ‘ग’ कार म्हणजे सिद्ध होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप.त्यामुळेच गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो.म्हणूनच गुरुचे आपल्या आयुष्यात खूप मानाचे स्थान मानले जाते. संस्कृत भाषेत गुरु म्हणजेच अंधःकार दूर करणारा असा आहे. गुरु हा शिष्याचे अज्ञान दूर करतो आणि शिष्याला त्याच्यामध्ये असलेल्या गुणांची जाणीव करून देतो.
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे का म्हणतात?
गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाभारत रचणारे महर्षी व्यास या ऋषींचा जन्म झाला होता. महर्षी व्यास या ऋषींनी सहा शास्त्र आणि अठरा पुराणांचे लिखाण केले आहे. महर्षी व्यास ऋषींनी महाभारतासोबत रामायण, ब्रह्मसूत्र अशा पुराणांची देखील रचना केली.भगवत गीतेमध्ये विष्णूंच्या 24 अवतारांचे वर्णन देखील महर्षी व्यास ऋषींनी केलेले आहे. याबरोबरच महर्षी व्यास ऋषी यांनी गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या पहिल्या शिष्यांना आणि तपस्वींना पुराणाचे ज्ञान प्रदान केले होते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
अशाप्रकारे आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
गुरुपौर्णिमेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा:
अधिक वाचा:
Poppy seeds Unique Benefits and Side Effects in Marathi In 2022| खसखस खाण्याचे फायदे आणि तोटे