ADHD Information In Marathi | अस्थिर व चंचल मुलांसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?

ADHD Information In Marathi ,attention deficit hyperactivity disorder in marathi ,attention deficit hyperactivity disorder meaning in marathi , adhd meaning in marathi

ADHD(Hyperactive Child)

ADHD Information In Marathi | ADHD meaning in Marathi

How To Control Hyperactive Child (ADHD) in Marathi: सर्वात आधी आपण ADHD(Attention Deficit Hyperactivity Disorder)म्हणजे काय ते समजून घेऊया.यामध्ये मुले खूप जास्त प्रमाणात Hyperactive होतात. हि मुले पाच मिनिटांपेक्षा जास्त एका जागी बसू शकत नाहीत. कधी खुर्चीवर चढ तर कधी टेबल वर चढ तर कुठे काही उचापती कर हे असेच चालू असते. त्यामुळे आई-वडिलांची complaint असते की मुलांचे कॉन्सन्ट्रेशन नाही. ही मुले एका जागी बसून शांतपणे अभ्यास किंवा काहीच करत नाहीत. तसेच ही मुले खूप violent असतात.

ADHD हा एक प्रकारचा आजार आहे. जर मुले अस्थिर किंवा चंचल असतील Hyperactive असतील तर हा अति चंचलपणा किंवा अस्थिरपणा कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.

यामध्ये मुले खूप जास्त प्रमाणात Hyperactive होतात. हि मुले पाच मिनिटांपेक्षा जास्त एका जागी बसू शकत नाहीत. कधी खुर्चीवर चढ तर कधी टेबल वर चढ तर कुठे काही उचापती कर हे असेच चालू असते. त्यामुळे आई-वडिलांची complaint असते की मुलांचे कॉन्सन्ट्रेशन नाही. ही मुले एका जागी बसून शांतपणे अभ्यास किंवा काहीच करत नाहीत. तसेच ही मुले खूप violent असतात.

ADHD मध्ये मुलांमध्ये full of energy असते. जर मुले अस्थिर किंवा अतिचंचल असतील Hyperactive असतील तर हा चंचलपणा किंवा अस्थिरपणा कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.

ADHD मुलांची लक्षणे | ADHD Symptoms in Marathi

१) दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये अडथळा आणणे (Interrupt To Others)

म्हणजेच दोन व्यक्ती बोलत असतील तर त्यांच्या मध्ये मध्ये जाऊन बोलणे किंवा कोणी काही सांगत असेल तर त्याचे ऐकून न घेता आपणच मध्ये बोलणे.

२) कोणासाठीही न थांबणे (Not stopping for anyone)

म्हणजेच कधी जर ही मुले रांगेत उभी असतील तर मध्येच रंग सोडून पहिल्या ठिकाणी जाऊन उभे राहणे.

3) हात-पाय सतत हलवणे

म्हणजेच या मुलांना सतत कोणता ना कोणता चाळा असतो अगदीच काही करायला नसेल तर सतत हात-पाय हलवत रहाणे.

४) न थकणे (Not tired)

म्हणजेच हि मुले सहसा थकत नाहीत. म्हणजेच आपण म्हणतो ना की आम्ही सगळे थकलो तरी हा किंवा ही कधी थकतच नाही.

५) खूप जास्त प्रमाणात बोलणे (Too much talking)

ADHD ची मुले खूप जास्त प्रमाणात बोलतात. म्हणजेच शेवटी आपण म्हणतो की हा किंवा ही किती जास्त बोलतो किंवा बोलते आणि थकतसुद्धा नाही.

६) आजूबाजूच्या लोकांशी न पटणे (Not getting along with the people around)

ADHD च्या मुलांचं सहसा कोणाशी पटत नाही. ही मुले नेहमी आपलंच बोलणं खरं करतात त्यामुळे त्यांचे जास्त मित्र-मैत्रिणीदेखील बानू शकत नाहीत.

७) एका जागी शांत न बसणे (Not sitting still in one place)

ADHD ची मुले एका जागी जास्त वेळ बसू शकत नाही थोडा वेळ झाला की लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून जातात.

८) वस्तू टाकणे/फेकणे (Throwing things)

ADHD या डिसऑर्डर मध्ये बहुतांश मुले वस्तू फेकतात. कितीही ओरडले तरी त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.
सामान्यतः ADHD च्या मुलांमध्ये ही लक्षणे आढळून येतात.

अति चंचल मुलांना शांत करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? | attention deficit hyperactivity disorder in marathi

१) फॅमिली सपोर्ट

जर तुमच्या मुलांना ADHD हा आजार असेल ती hyperactive असतील तर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आई-वडील,आजी-आजोबा सर्वानी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

२) वेळ(Time)

हल्ली आईवडिलांकडे अजिबात वेळ नसतो. परंतु या धकाधकीच्या जीवनात मुलांना पुरेसा वेळ देणेदेखील खूप गरजेचे आहे. त्यांना फक्त त्यांच्या आवडीच्या वस्तू देऊन चालत नाही तर त्यांच्याबरोबर बसून थोडे खेळले पाहिजे थोडे बोलले पाहिजे. त्यांना प्रेम दिले पाहिजे. त्यांच्यासाठी थोडा वेळ तरी काढलाच पाहिजे.मुलांसाठी आई-वडिलांचे प्रेम त्यांचा मिळणार वेळ या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यांना हे सांगता येत नाही त्यामुळे आई-वडिलांनी हे समजून घेतले पाहिजे.

३) स्तुती(Praise)

कोणत्याही व्यक्तीला आपली स्तुती केलेली तारीफ केलेली आवडते. हीच गोष्ट ADHD च्या मुलांच्या बाबतीत देखील आढळते. जर त्यांनी एखादे काम चांगले केले तर आवर्जून त्यांची स्तुती करा. त्यामुळे ती चांगली कामे करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

) अन्न(Food)

मुलांना शक्यतो ताजे अन्न द्यावे. मॅग्गी,नूडल्स,पास्ता,पिझ्झा यासारखे पदार्थ देणे टाळावे. दूध,फळे,पालेभाज्या यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश असावा.

५) झोप(sleep)

मन शांत राहण्यासाठी झोप शांत लागणे देखील आवश्यक असते. जर मुलांची पुरेशी झोप झाली असेल तर त्यांची चिडचिड कमी होण्यास मदत होते.

६) शारीरिक हालचाल(Physical Activity)

जर मुले hyperactive असतील तर त्यांच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात energy असते. या energy चा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी त्यांची प्रॉपर Physical Activity झाली पाहिजे. यासाठी तुम्ही त्यांना रोज गार्डन मध्ये घेऊन जाऊ शकता. त्यांच्याबरोबर फुटबॉल,क्रिकेट यासारखे खेळ खेळू शकता.

) योगा/मेडिटेशन

योगा/मेडिटेशन केल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. ADHD च्या मुलांना शांत करण्यासाठी नक्कीच योगा/मेडिटेशन ची मदत घेतली जाऊ शकते.

) श्लोक म्हणणे

संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी या मुलांना तुम्ही श्लोक म्हणायला सांगू शकता. ही मुले सुरुवातीला यासाठी नक्कीच त्रास देतील. परंतु घरातील सर्व लोकांनी मिळून प्रयत्न केले तर मुले नक्कीच तुमचे ऐकतील.

९) मुलांना समजून घेणे(To Understand Children)

मुलाना समजून घेणेदेखील फार महत्वाचे आहे. आपण नेहमी मुलांवर चिडतो त्यांना मारतो. पण असे न करता त्याला थोडे समजून घेतले पाहिजे आणि व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे.

१०) आदर(Respect)

मुले जरी लहान असली तरी त्यांना रिस्पेक्ट देणे हे खूप गरजेचे आहे. जर आई-वडील मुलांचा चारचौघात अपमान करत असतील तर ते मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे असे न करता मुलांना व्यवस्थित समजावून सांगावे. जर तुम्हाला ADHD च्या मुलांना हॅन्डल करायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारे खूप काळजी घ्यावी लागते. तुमचे patience खूप वाढवावे लागतात. घरातील सर्व व्यक्तींचा सपोर्ट देखील खूप महत्वाचा असतो. तुम्हाला चिडचिड,रागराग करून चालत नाही.

जर तुम्हाला ADHD च्या मुलांना हॅन्डल करायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारे खूप काळजी घ्यावी लागते. तुमचे patience खूप वाढवावे लागतात. घरातील सर्व व्यक्तींचा सपोर्ट देखील खूप महत्वाचा असतो. तुम्हाला चिडचिड,रागराग करून चालत नाही. तुम्हाला तुमच्या lifestyle मध्ये बदल करावा लागेल.

अधिक माहितीसाठी हे रेफर करा : What is ADHD?

एक छोटीशी कविता

जरी असेल मुलांमध्ये अतिचंचलपणा
तुम्ही मात्र नेहमी संयमानेच वागा
मुलांना नीट समजून घ्या
त्यांचा रागराग करू नका
मुलांना योग्य ते मार्गदर्शन करा
आणि त्यांना पुरेसा वेळ द्या

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे) 

१)ADHD च्या मुलांचा राग शांत करण्यासाठी काय करावे?

रोज रात्री झोपताना तळपायाला खोबरेल तेल लावले तर शांत झोप लागण्यास मदत होते. आणि शांत झोप लागल्यावर मुलांची चिडचिड देखील थोडी कमी होते.मुलांबरोबरच आई-वडिलांनी देखील तळपायाला खोबरेल तेल लावून झोपावे कारण ADHD च्या मुलांना सांभाळताना मुलांबरोबरच आई-वडिलांची देखील चिडचिड होत असते.

२)ADHD च्या मुलांना सांभाळताना काय काळजी घ्यावी?

जर तुम्ही ADHD च्या मुलांचे पालक असाल तर तुम्हाला positive attitude ठेवणे खूप महत्वाचे असते. हे माझ्याच नशिबाला का आले माझ्या मित्रांची किंवा मैत्रिणींची मुले किती चॅन आहेत असे विचार न करता आहे त्या परिस्थितीला धीराने तोंड देणे गरजेचे असते. आई-वडिलांनी रागराग,चिडचिड करू नये. मुलांना प्रेमाने समजून घ्यावे.

अधिक वाचा:

◘मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल|How To Start School Admission Procedure For Your Child in 2022

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “ADHD Information In Marathi | अस्थिर व चंचल मुलांसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?”

Leave a Comment