7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child in Marathi | मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?

7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child in Marathi | मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?

Ways To Develop Interest For Studies To Your Child in Marathi: मुलांमध्ये अभ्यासाची गोडी(Interest For Studies) कशी लावावी?यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.

मला अभ्यास आवडतो असे फार कमी मुले म्हणतात. बहुतांशी मुले ही फक्त चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तर काही मुले ही आई-वडील जबरदस्ती करतात म्हणून अभ्यास करतात. परंतु अभ्यास हा फक्त चांगले मार्क्स मिळवण्यासाठी किंवा कोणी सांगितले आहे म्हणून न करता मनापासून आवडीने केला पाहिजे. आपण जे शिकत आहोत त्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापर करता आला पाहिजे.म्हणूनच मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे.

पालकांनी मुलांना अभ्यासाचे महत्व पटवून दिले पाहिजे(Parents should teach their children the importance of study)

मुलांमध्ये अभ्यासाची गोडी(Interest For Studies) लागण्यासाठी पालकांनी मुलांना फक्त अभ्यास कर असे सांगण्यापेक्षा अभ्यास केल्यामुळे त्याला काय फायदा होईल हे पटवून दिले पाहिजे. अभ्यास केल्यामुळे मुलांचे ज्ञान(Knowledge) वाढण्यास मदत होते. ज्ञानामुळे आपण गुणवान बनतो आणि ज्ञानामुळे माणूस समृद्ध होतो. अभ्यास नुसता syllabus पुरता मर्यादित नसतो. फक्त परीक्षेत syllabus पुरता घोकंपट्टी करून अभ्यास केला आणि पहिला नंबर जरी मिळाला तरी त्याचा काही फायदा होत नाही कारण जी मुले फक्त घोकंपट्टी करून पाठांतर करतात आणि चांगले मार्क्स मिळवतात त्यांना पुढे कॉलेज मध्ये किंवा नंतर interview ला गेल्यावर खूप प्रॉब्लेम्स येतात. कारण तिथे सगळे प्रश्न आऊट ऑफ सिलॅबस असतात. त्यामुळेच मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे.कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला तर सखोल अभ्यास होतो.

मुलांवर अभ्यासाचा दबाव आणता कामा नये (Children should not be pressured to study)

बऱ्याच वेळा मुलांवर अभ्यासासाठी शिक्षकांचा किंवा पालकांचा दबाव(pressure) असतो. त्यामुळे मुले अभ्यास तर करतात पण मनापासून नाही असे न करता मुलांना नीट समजून घेतले पाहिजे. त्यांच्या कलाने घेतले पाहिजे. ती मनापासून कसा अभ्यास करतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वेळेला त्यांच्याबरोबर बसून त्यांना अभ्यासात मदत केली पाहिजे. कधीही कोणाबरोबर त्यांना compare करू नये. प्रत्येक मुलाची क्षमता(capacity) ही वेगळी असते हे समजून घेतले पाहिजे.

मुलांच्या मनातील अभ्यासाची भीती घालवली पाहिजे (The fear of studying in the minds of children should be dispelled):

कधी कधी काही मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल एक प्रकारची भीती निर्माण होते आणि मग मुले अभ्यास करण्यास टाळाटाळ करतात. तर त्यासाठी मुलांच्या जवळ बसून त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यांना जो विषय अवघड जातो तो सोप्पा कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.जेव्हा आई किंवा बाबा स्वतः शेजारी बसून एखादी अवघड वाटणारी गोष्ट सोप्पी करून सांगतात तेव्हा मुलांना नक्कीच त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटू लागतो. आणि मुलांमध्ये अभ्यासाची आवड(Interest For Studies) निर्माण होते.

अभ्यासासाठी एक ठराविक वेळ निश्चित केली पाहिजे(A specific time for study should be fixed):

मुलांच्या अभ्यासासाठी एक ठराविक वेळापत्रक बनवले पाहिजे. या वेळापत्रकामध्ये मुलांच्या आवडीच्या गोष्टीदेखील include कराव्यात म्हणजे त्यांना जर खेळायला आवडत असेल तर खेळासाठी २ तास अशाप्रकारे जर त्यांची आवड जपली तर मुले देखील आवडीने अभ्यास करू लागतील.

मुलांना त्यांच्या मित्रांसोबत अभ्यास करू द्यावा(Let the children study with their friends):

काही मुलांना आपल्या मित्रांसोबत अभ्यास करायला आवडते. आणि पालकांना वाटते की मित्रांबरोबर अभ्यास होऊ शकत नाही मुले मित्रांबरोबर गप्पच मारत बसतील त्यामुळे ते मित्रांबरोबर अभ्यास करण्याची परमिशन देत नाहीत. असे न करता मुलांना त्यांच्या मित्रांसोबत अभ्यास करू द्यावा. किंवा काही वेळा मुले आपल्या मित्र-मैत्रिणींना डाउटस विचारतात आणि सहजरित्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. तसेच मित्र बरोबर असल्यामुळे ते आवडीने अभ्यास करतात.सहाध्यायी अध्ययन नेहमीच प्रभावी ठरते.यामुळे मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी(Interest For Studies) निर्माण होईल.

मुलांना कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवू नका(Do not show children any kind of lure):

बऱ्याच वेळा पालक मुलांना सांगतात की जर तू अभ्यास केला तर मी तुला अमुक तमुक वस्तू आणून देईन किंवा तुला फिरायला घेऊन जाईन. आणि मुलेसुद्धा त्या वस्तूसाठी अभ्यास करतात. परंतु असे न करता मुलांना मनापासून अभ्यास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे मुलांना फिरायला देखील नेले पाहिजे किंवा त्यांच्या आवडीच्या वस्तू देखील आणल्या पाहिजेत आणि मुलांनी देखील आवडीने अभ्यास केला पाहिजे. कोणत्याही अमिषाखातर अभ्यास करू नये. जबरदस्ती करून जर अभ्यास केला तर त्याचा काहीही फायदा होत नाही.

इच्छा नसताना मुलांवर अभ्यासासाठी सक्ती करू नये (Children should not be forced to study when they do not want to):

जर कधी मुलांना कंटाळा आला असेल तर त्यांना अभ्यासासाठी सक्ती करू नये. जेव्हा त्यांचा मूड चांगला होईल तेव्हा मुले स्वतःहून अभ्यास करतील. मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. जर इच्छा नसताना अभ्यास केला तर त्यामुळे मुले नाराजीने अभ्यास तर करतात परंतु सर्व त्यांच्या डोक्याच्या बाहेर जाते. याउलट जेव्हा मुले मनापासून अभ्यास करतात तेव्हा त्यांना सर्व पटापट समजते.किती तास अभ्यास केला यापेक्षा अभ्यास किती झाला हे महत्वाचे असते.यासाठी मला ३-idiots movie चे उदाहरण द्यावेसे वाटते. यामध्ये अमीर खानने व्यवस्थित समजावून सांगितले आहे की रट्टा मारून काही होत नाही तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच करा.

अधिक माहितीसाठी हे रेफर करा. पढ़ाई में मन कैसे लगायें | How to focus on studies? By Sandeep Maheshwari

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

Q. १)अभ्यास करताना थोडा वेळ ब्रेक घेणे गरजेचे आहे का?

A. हो नक्कीच , जर प्रत्येक २ तासांमध्ये १० मिनिटांचा ब्रेक घ्यायला काही हरकत नाही. त्यामुळे थोडे माइंड रिफ्रेश होते. आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करू शकतो. याउलट कंटाळा आला असताना अभ्यास केला तर तो properly होत नाही.
 

Q. २)अभ्यास करताना एकाग्रता(concentration) असणे गरजेचे आहे का?

A. हो नक्कीच , जर अभ्यास करताना एकाग्रता(concentration) नसेल तर तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजणार नाही आणि त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून जर मन एकाग्र करूनच अभ्यासाला बसावे.
 

एक छोटीशी कविता

घ्यावा एकच ध्यास

करू निरंतर अभ्यास

घडेल तुमची प्रगती खास

होईल व्यक्तिमत्व विकास

तर मी आज तुम्हाला मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी याबद्दल थोडक्यात माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल | How To Start School Admission Procedure For Your Child in 2022

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

3 thoughts on “7 Strong Ways To Develop Interest For Studies To Your Child in Marathi | मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?”

Leave a Comment