मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल | How To Start School Admission Procedure in Marathi

मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल | How To Start School Admission Procedure in Marathi

मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरु कराल?

मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल? How To Process Kids School Admission In Marathi

मुलांना शाळेत प्रवेश घ्यायचं म्हणजे आताच्या पालकांसाठी खूप मोठे चॅलेंज झाले आहे. आपल्या मुलासाठी कोणते मध्यम सिलेक्ट करायचे त्यानुसार कोणती शाळा , त्या शाळेची फी, शाळेत एक्सट्रा ऍक्टिव्हिटी घेतात का? हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या मुलाची शाळेचा प्रवेश सुरु करतो.  शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू करावी याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. जसजसे तुमचे बाळ मोठे होऊ लागते आणि बघता बघता दोन वर्षाचे तीन वर्षाचे होते तेव्हा पालकांच्या(parents) मनात येते आता याला किवा हिला शाळेत घातले पाहिजे. हल्लीचे पालक तर मुलांना खूप लवकरच शाळेत घालतात. मुलांना शाळेत घालायचे ठरवल्यावर अजून काही प्रश्न उपस्थित होतात.

1) माध्यम(medium) कोणते निवडावे?
2) बोर्ड कोणते निवडावे?
३) आपल्या मुलासाठी कोणती शाळा बेस्ट असेल ?

यापूर्वीच्या काळात जेव्हा तुम्हाला स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यावी लागत होती तेव्हा बराच research करावा लागत होता. आजूबाजूच्या लोकांना विचारावे लागत होते की जवळपास कोणत्या चांगल्या स्कूल आहेत? किंवा manually प्रत्येक स्कूलच्या website वर जाऊन visit करून माहिती(information)गोळा करावी लागत होती. परंतु आता तुमच्या मुलांना स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर एका website मुळे खूप सोपे झाले आहे.

www.uniapply.com या website मुळे तुम्हाला Across India कोणत्याही स्कूल मध्ये मुलांना ऍडमिशन घ्यायचे असेल तर ती घेता येईल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.uniapply.com या website ला visit करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला city सिलेक्ट करावी लागेल जिथे तुम्ही राहता किंवा जिथे तुमच्या या मुलाची किंवा मुलीची ऍडमिशन करायची आहे.त्यानंतर तुम्हाला बरेच factors लक्षात घ्यावे लागतात.

१) Select The School Board In Marathi  | शाळेचं माध्यम सिलेक्ट करा 

तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या बोर्ड मध्ये घालायचे आहे हे सर्वप्रथम तुम्हाला ठरवावे लागते.
मराठी माध्यमामध्ये घालायचे असल्यास स्टेट बोर्ड(state board) हा एकच option असतो. आणि इंगजी माध्यमामध्ये घालायचे असेल तर बरेच options असतात.

  1.  State Board ( Marathi Medium And English Medium)
  2.  CBSE Board (Central Board of Secondary Education- English Medium )
  3.  ICSE Board (Indian Certificate of Secondary Education – English Medium )
  4.  IB (International Baccalaureate- English Medium)

CBSE vs State Boards In Marathi | आपल्या मुलाचं शालेय प्रवेश कोणत्या शाळेत करावे?

२) Check Location Of School । शाळेचे ठिकाण बघा 

तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या बोर्ड मध्ये घालायचे आहे हे ठरवल्यावर नंतर तुम्हाला हे बघावे लागते की तुम्हाला जवळच्या स्कूलमध्ये घालायचे आहे की दूरच्या.कारण काही वेळा तुम्ही ठरवलेली शाळा खूप चांगली असते परंतु ती तुमच्या घरापासून खूप दूर असते तेव्हा तुम्हाला ठरवावे लागते की दूरच्या शाळेत मुलांना घालायचे का?

बरेचसे पालक नोकरी करत असतात आणि ते आपल्या मुलांना दूरच्या शाळेत घालणे टाळतात. कारण ऐनवेळी कधी काही emergency आली तर धावपळ करावी लागते तेव्हा जवळची शाळा निवडलेली चांगली असते.लहान मुलांना दूरच्या शाळेत घालताना थोडा विचार करावा लागतो.

३) Check School Extra Activities । शाळेत होणाऱ्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी चेक करा  

बऱ्याच पालकांचे असे मत असते की स्कूल मध्ये अभ्यासाबरोबरच बाकी Activities असणे देखील गरजेचे आहे.जसे की sports activity, stage performance, music and instruments   etc. या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य शाळा निवडावी.

४) Fees Structure Of School । शाळेची वार्षिक फी 

मुलांची स्कूल निवडताना शाळेची फी हा देखील एक important फॅक्टर आहे. काही वेळा पालकांना एखादी स्कूल आवडते जिच्यामध्ये सर्व facilities असतात. परंतु त्या स्कूल ची फी खूप जास्त असेल तर त्याचा देखील विचार करावा लागतो.

www.uniapply.com या website मुळे तुम्हाला compare feature नावाचा option मिळतो ज्यामध्ये तुम्ही सर्व स्कूल compare करून तुम्हाला योग्य वाटणाऱ्या स्कूल ची निवड करू शकता. त्यानंतर स्कूल्स ची नावे shortlist करून add to cart करू शकता.

best school board in marathi
best school board in marathi

५) Admission Tracker

www.uniapply.com या website चे हे एक best feature आहे. यामध्ये स्कूल मध्ये जाण्यासाठी Age Criteria काय आहे नर्सरी मध्ये किंवा जुनिअर केजी,सिनियर केजी मध्ये जाण्यासाठी Age Criteria काय आहे याबद्दल detailed information आहे.

६) Documents Required For School Admission । कागदपत्रे 

या website मध्ये तुम्ही documents देखील upload करू शकता. आणि online fees देखील भरता येते. त्यासाठी personally स्कूल मध्ये जाण्याची गरज नसते.

वेबसाईट चे फायदे:

  • ज्या पालकांना मुलांना शाळेत ऍडमिशन घ्यायची आहे त्यांना www.uniapply.com या वेबसाईट चा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
  • www.uniapply.com या वेबसाईट मुळे तुम्हाला प्रत्यक्ष शाळेत जाऊन किंवा आजूबाजूच्या लोकांना विचारुन माहिती गोळा करण्याची गरज नसते फक्त वेबसाईट ला visit केल्यावर सर्व माहिती मिळते. तसेच Reviews देखील वाचता येतात.
  • यामुळे पालकांचे श्रम आणि वेळ दोन्हीही वाचतात.
  • Compare School या feature मुळे schools देखील compare करता येतात. आणि तुम्हाला योग्य वाटणारी शाळा तुम्ही निवडू शकता.
  • My Dashboard या feature मुळे अँप्लिकेशन स्टेटस काय आहे याचे नोटिफिकेशन तुम्हाला email किंवा SMS द्वारे मिळते.
अधिकृत वेबसाईट www.uniapply.com
उद्देश School Admission Procedure सहजरित्या करणे
कोणासाठी आहे ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत घालायचे आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट फायदेशीर आहे.
Board State ,CBSE ,ICSE ,IB
Age Criteria ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत घालायचे आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट फायदेशीर आहे.

FAQ (महत्वाची प्रश्न उत्तरे)

१) School Admission साठी कोणती कागदपत्रे(documents) आवश्यक असतात?

A. प्रत्येक स्कूल साठी वेगवेगळी कागदपत्रे(documents) आवश्यक असतात. मी तुम्हाला सर्वसाधारणपणे जी documents लागतात त्याची list देत आहे.
१)मुलांचा आणि पालकांचा पासपोर्ट साईझ फोटो
२)मुलांचे आणि पालकांचे आधार कार्ड
३)पालकांचे पॅन कार्ड
४)मुलांचे जन्म प्रमाणपत्र(Birth Certificate)
५)राहत्या घराचा पत्ता(Residence Proof)
६)Vaccination Chart (काही शाळांमध्ये आवश्यक असतो.)
७)Admission Form & Fee Receipt
८)Medical History Of Child

२) www.uniapply.com या वेबसाईट मध्ये मराठी माध्यमाच्या शाळा available आहेत का?

A. नाही,या वेबसाईट मध्ये मराठी माध्यमाच्या शाळा available नाहीत. जर तुम्हाला मराठी माध्यमामध्ये प्रवेश घायचा असेल तर स्वतः आजूबाजूच्या लोकांना विचारून तसेच आजूबाजूच्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन research करून मग admission घ्यावी लागेल.

एक छोटीशी कविता

बघता बघता मोठा झाला तुमचा छोटा बाळा
घडवा त्याचे भविष्य निवडून सुंदर शाळा
व्यायाम,आरोग्य,शिक्षण,नवे नवे उपक्रम
पहा किती छान त्याचे सर्वच पराक्रम
दंगा,मस्ती,मौज,मजा बाळ लागला करू
पालक म्हणून आपण त्याला योग्य तेथे सावरू
खूप शिका मोठे व्हा द्या त्यांना मोकळीक
टिकवून ठेवा पालक-बालक नात्यातील जवळीक

तर मी आज तुम्हाला मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस सुरू कराताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल याबद्दल थोडक्यात माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.

ही माहिती मी माझ्या अनुभवावरून दिलेली आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

◘ वाचन(Reading) करण्याची सवय मुलांमध्ये कशी लावावी? 

5 step approach for selecting a school for your children

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

4 thoughts on “मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल | How To Start School Admission Procedure in Marathi”

Leave a Comment