How are twins born|जुळी बाळे कशी जन्माला येतात?

How are twins born:

बऱ्याच जोडप्याना असे वाटत असते की आपल्याला जुळी बाळे(twins) व्हायला हवीत.हल्लीच्या काळात बरेचसे लोक हे जास्तीत जास्त दोनच मुलांचा विचार करतात. त्यामुळे एकाच वेळी जर दोन मुले जन्माला आली तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट असते. महिलांना गरोदरपणात थोडाफार तरी त्रास हा होतच असतो. जर जुळी बाळे जन्माला आली तर हा त्रास एकदाच सहन करावा लागतो. तर आज मी या लेखामध्ये जुळी बाळे का आणि कोणाला होतात याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

How are twins born
Twins Baby
  • फॅमिली हिस्टरी : जर तुमच्या फॅमिली मध्ये कोणाला जुळी मुले असतील तर अनुवंशिकतेमुळे जुळी बाळे होण्याचे चांसेस असतात.म्हणजे जर आजी,मावशी,काका,मामा यापैकी कोणाला जुळी बाळे असल्यास जुळी बाळे होण्याचे चांसेस असतात.
  • Infertility Treatment : हल्ली बरेचसे दाम्पत्य हे आपल्या करियर मध्ये खूप जास्त व्यस्त असतात. त्यामुळे ते मुलाचा विचार करत नाहीत. आणि जेव्हा त्यांना वाटू लागते की आता आपल्याला मूल हवे आहे तेव्हा त्यांना बऱ्याचदा प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. बऱ्याच महिलांची पस्तिशी देखील उलटलेली असते. त्यामुळे कधी कधी त्यांना Infertility Treatment घ्यावी लागते. आणि या ट्रीटमेंट मुळे बऱ्याचदा जुळी मुले जन्माला येतात. IVF मुळे जर conceive केले तर जुळी मुले जन्माला येण्याचे चांसेस जास्त असतात.
  • अतिरिक्त वजन(Overweight):जास्त वजनाच्या किंवा जास्त वयाच्या महिलांना देखील जुळी मुले होण्याचे चांसेस जास्त असतात.
  • ज्या महिलांना ऑलरेडी ट्विन्स आहेत अशा महिलांना परत ट्विन्स होण्याची शक्यता देखील जास्त असते.

जर तुमच्या फॅमिली मध्ये कोणाला जुळी मुले असतील तर अनुवंशिकतेमुळे जुळी मुले होण्याचे चांसेस असतात.म्हणजे जर आजी,मावशी,काका,मामा यापैकी कोणाला जुळी मुले असल्यास जुळी मुले होण्याचे चांसेस असतात.

काही जुळी मुले ही एकदम एकसारखी दिसतात कधी कधी तर आईवडिलांना देखील ओळखणे कठीण जाते,याना आपण identical म्हणतो. तर काही जुळी मुले सारखी दिसत नाहीत. त्यांच्यात थोडा तरी फरक जाणवतो त्यांना आपण non-identical म्हणतो.

एकयुग्मज जुळी मुले [Identical Twins(Monozygotic)]

जेव्हा ओव्हरी(अंडाशय) मधून एग रिलीज होते,त्यानंतर ते फर्टाईल होते. फर्टाईल झाल्यानंतर ते दोन भागामध्ये डिव्हाइड होते. दोन भागांमध्ये डिव्हाइड झाल्यानंतर दोन embryo वेगवेगळे गर्भाशयात इंप्लांट होतात. ज्यांचे DNA आणि जीन्स सारखे असतात. त्यामुळे जन्माला येणारी बाळे ही एकसारखी दिसतात.म्हणून त्यांना एकयुग्मज जुळी मुले म्हणतात. अशी identical twins ओळखणे आपल्याला खूप कठीण जाते. कारण ते अगदी झेरॉक्स कॉपी सारखे दिसतात. मोनो म्हणजेच एकच. जेव्हा एका स्त्रीच्या एकाच अंडबीजात दोन मुले तयार होतात तेव्हा त्यांची नाळ एकच असते. तसेच एकच शुक्राणू आणि स्त्रीबीजापासून तयार झाल्यामुळे हि मुले दिसायला एकदम सारखी असतात. परंतु ही जुळी मुले दिसायला जरी सारखी असली तरी त्यांचे फिंगरप्रिंट्स हे वेगवेगळे असतात. यामध्ये बऱ्याचदा एकतर दोन मुले किंवा दोन मुली होतात. म्हणजेच एकतर X-Chromosome होतो किंवा Y- Chromosome होतो.

NON-Identical Twins(Dizygotic)

NON-Identical Twins मध्ये ओव्हरी मधून एकापेक्षा जास्त अंडी रिलीज होतात. तसेच त्यांना फर्टाईल करणारे दोन स्पर्म देखील वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांची इम्प्लांटेशन वेगवेगळी होते. आणि त्यांचे जीन्स आणि DNA देखील वेगवेगळे असतात. अशा ट्विन्स ला आपण NON-Identical Twins असे म्हणतो. NON-Identical Twins एकदम सारखे दिसत नाहीत. त्यांच्यामध्ये थोडा तरी वेगळेपणा असतो. Di म्हणजे दोन. काही महिलांच्या शरीरात दोन स्त्रीबीज तयार होतात. यांची नाळही वेगळी असते. आणि शुक्राणू ही वेगवेगळे असतात. त्यामुळे या दोन्ही मुलांची वाढ वेगवेगळी होते. तसेच ही मुले वेगवेगळी दिसतात. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे होऊ शकते. किंवा दोन्ही मुले आणि दोन्ही मुली असे होऊ शकते.

ट्विन्स प्रेग्नंसी मध्ये नॉर्मल प्रेग्नंसी पेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. ट्विन्स प्रेग्नंसी मध्ये आहार काय असावा हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असल्यामुळे काही जणांना डॉक्टर बेडरेस्ट चा सल्ला देतात. त्यामुळे व्यायाम करताना किंवा मेडिटेशन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जुळी मुले होण्याचे काय धोके आहेत?(What are the danger factors of having twins?)

१) कमी वजन(Low weight)

जुळी मुले झाल्यामुळे बाळाचे वजन कमी असू शकते.

२)सिझेरिअन ची आवश्यकता(Caesarean section required)

जुळी मुले असल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चांसेस कमी असतात. बऱ्याच वेळी सिझेरिअन डिलिव्हरी होते.

३)अकाली प्रसूती(Premature delivery)

बऱ्याच वेळा लवकर प्रसुती होण्याची शक्यता असते.

जुळ्या बाळांची गर्भधारणा ही थोडीशी आव्हानात्मक(challenging) असते. परंतु तरीही टेन्शन न घेता डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना व्यवस्थित वेळच्या वेळी पाळल्या तर काहीच कठीण नसते,तुम्ही छान दोन निरोगी गोंडस बाळांना जन्म देऊ शकता.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

१)Twins Pregnancy मध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात?

Twins Pregnancy मध्ये नॉर्मल डिलिव्हरी सारखीच लक्षणे दिसतात फक्त त्यांचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच आपण म्हणू शकतो त्याची तीव्रता जास्त असते.

२)Twins Pregnancy मध्ये आहार कसा असावा?

ट्विन्स प्रेग्नंसी मध्ये तुमच्या आहारात liquid intake जास्त असावा. तसेच नॉर्मल प्रेग्नंसी पेक्षा कॅल्शिअम,आयर्न,प्रोटीन यांचे प्रमाण जास्त असावे. तसेच वारंवार चेकअप साठी जाणेदेखील गरजेचे असते.

तर मी आज तुम्हाला जुळी मुले कशी जन्माला येतात (How are twins born)याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

6 Best Tips to control anger when talking to children In Marathi|मुलांशी बोलतांना रागावर कसे नियंत्रण ठेवाल?

जुळी कशी जन्माला येतात ?

Leave a Comment

improve alexa rank