Kothimbir vadi recipe in marathi in 2024 | कोथिंबीर वडी

Kothimbir vadi recipe in marathi In 2024 | कोथिंबीर वडी

Kothimbir vadi recipe in marathi: कोथिंबिरीच्या वड्या म्हटले की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटते. अगदी जे लोक कोथिंबीर खात नाहीत तेसुद्धा कोथिंबीर वडी मात्र आवडीने खातात. म्हणूनच लहान मुलांच्या पोटात कोथिंबीर जाण्यासाठी त्यांना कोथिंबीर वडी करून द्यावी. ही वडी अतिशय पौष्टिक असते आणि तिची चवही छान असते. आज मी तुम्हाला या लेखातून मुलांसाठी पौष्टिक अशा कोथिंबीर वड्या(Kothimbir vadi recipe in marathi) कशा कराव्यात ते सांगणार आहे.

Kothimbir vadi recipe in marathi
Kothimbir Vadi recipe in Marathi

 

Kothimbir vadi recipe in marathi

कोथिंबीर वड्या थापून

साहित्य :

  • डाळीचे पीठ – २ वाट्या
  • चिरलेली कोथिंबीर – २ वाट्या
  • चिरलेला कांदा – १
  • तिखट-आवडीप्रमाणे (लहान मुले कमी तिखट खात असल्यामुळे तिखट कमी टाकावे.)
  • हळद-१/४ चमचा 
  • मीठ-१ चमचा
  • कोकम-२
  • साखर-३ चमचे 
  • पाणी-२ वाट्या

फोडणीसाठीचे साहित्य:

  • मोहरी – १ चमचा
  • हिंग –  १/४ चमचा 
  • कडीपत्ता – ५ ते ६ पाने
  • तेल – दीड टेबलस्पून

कृती:

प्रथम एका कढईमध्ये तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यात हिंग,मोहरी आणि कडीपत्ता टाकावा. त्यानंतर त्यात २ वाट्या पाणी टाकावे. नंतर त्यात तिखट,मीठ,हळद,साखर,कोकम,कांदा आणि कोथिंबीर टाकावी. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पीठ घालून चांगले मिसळावे. नंतर मंद गॅसवर २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी व गॅस बंद करावा. त्यानंतर एका ताटाला तेल लावून त्यात पीठ घालून हाताने थापावे. पीठ थापताना हाताला थोडेसे पाणी लावून घ्यावे म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. पीठ थंड झाल्यावर वड्या  कापाव्यात व तळून घ्याव्यात. जर तुम्हाला जास्त तेलकट खायचे नसेल तर तुम्ही पॅनवर थोडेसे तेल टाकून शॅलो फ्राय सुद्धा करू शकता.अशाप्रकारे तुमच्या कोथिंबीर वड्या तयार.कोथिंबीर वड्यांप्रमाणेच आपल्याला कोबीच्या वड्यादेखील करता येतात,फक्त कोबीला पाणी सुटत असल्यामुळे या वड्यांमध्ये पाणी थोडे कमी घालावे ही काळजी घ्यावी.

कोथिंबीर वड्या(उकडून)

साहित्य:

  • डाळीचे पीठ-२ वाट्या
  • कोथिंबीर-२ वाट्या
  • हळद-१/४ चमचा
  • तिखट-दीड चमचा
  • धनेजिरे पावडर – १ चमचा
  • साखर-३ चमचे
  • चिंच-सुपारीएवढी
  • मीठ-१ चमचा
  • कांदा – १

कृती:

सर्वात प्रथम कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर त्यात तिखट,मीठ,साखर,धनेजिरे पावडर,चिंचेचा कोळ,हळद,डाळीचे पीठ व थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. नंतर त्याची गोल लांब जाडसर अशी वळकटी करावी. व कुकरमध्ये ठेवून उकडून घ्यावे. त्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यावे. नंतर त्याच्या पातळ वड्या कापून घ्याव्यात आणि एका कढईमध्ये तेल तापत ठेवून कुरकुरीत तळाव्यात. अशाप्रकारे कोथिंबिरीच्या वड्या तयार.

कोथिंबीर वडी (रसातील)

साहित्य:

कांदे-२
भाजलेले सुके खोबरे-दीड टेबलस्पून
तिखट-दीड चमचे
गरम मसाला – १/४ चमचा
कोकम-१
साखर-१ चमचा
मीठ-१/२ चमचा
लसूण पाकळ्या – ५ ते ६
तेल-२ टेबलस्पून

कृती:
सर्वात प्रथम थोडेसे तेल तापण्यासाठी ठेवावे. तेल तापल्यावर त्यात ठेचून लसूण घालावी. लसूण थोडीशी लालसर झाल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा गुलाबी होईपर्यंत भाजावा. त्यानंतर त्यातील अर्धा कांदा वाटणासाठी काढून ठेवावा. नंतर कांद्यात तिखट,मीठ,हळद,गरम मसाला घालून परतावा व त्यात २ वाटी पाणी घालावे. नंतर त्यात कोकम,साखर आणि थोडी कोथिंबीर घालावी.
नंतर भाजलेले सुके खोबरे व भाजलेला कांदा बारीक वाटून त्यात घालावा. हे सर्व पाच मिनिटे उकळावे व त्यात उकडलेल्या वड्या कापून घालाव्यात व लगेचच गॅस बंद करावा. अशाप्रकारे रसातील कोथिंबीर वड्या तयार.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

कोथिंबीर वड्या पौष्टिक आहेत का?

हो नक्कीच जरी त्या आपण तळत असलो तरीही त्या पौष्टिकच आहेत. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे आपलं आरोग्य चांगलं राहातं. ज्याप्रमाणे आपल्या खाण्याला कोथिंबीर स्वाद आणते तशीच आपल्या आरोग्यालासाठीदेखील कोथिंबीर तितकीच गुणकारी आहे.

वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर उपयोगी आहे का?

कोथिंबीर ही मेटाबॉलिजम वाढवण्याचे आणि चरबी जाळण्याचे  काम करत असते . कोथिंबीरच्या पानांमध्ये अथवा धण्यांनी बनलेल्या काढ्यामध्ये रक्तातील लिपीड स्तर कमी करण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

मी केलेली एक छोटीशी कविता

खमंग,कुरकुरीत कोथिंबीर वडी

लहान मुलांना खूपच आवडी

जरी कोथिंबीर खाण्यासाठी मुले करत असतील कटकट

कोथिंबीर वडी मात्र खातील आवडींने  खूपच पटापट

कोथिंबीर वडी आणेल तुमच्या जेवणाला स्वाद

म्हणूनच सर्व कुटुंबानीच घ्या या वडीचा आस्वाद

तर आज मी तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या वेगवेगळ्या प्रकारे कशा करता येतील ते सांगितले Kothimbir vadi recipe in marathi मला खात्री आहे तुमच्या मुलांना या नक्की आवडतील . जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

Balguti Ingredients In marathi In 2022|बाळगुटी कशी द्यावी?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment