गर्भवती महिलांसाठी प्रसूती विमा | Maternity Insurance Information in Marathi 2024

Maternity Insurance Information in Marathi For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी प्रसूती विमा

Maternity Insurance Information in Marathi
Maternity Insurance Information in Marathi

Maternity Insurance Information in Marathi: मातृत्व हा महिलांसाठी एक खूपच सुंदर अनुभव असतो. परंतु मातृत्वाच्या या प्रवासामध्ये कधी कधी काही अडथळे (complications) देखील येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक(mentally) आणि आर्थिकदृष्ट्या(financially) दोन्ही प्रकारे तयार व्हावे लागते. मातृत्वाचा हा प्रवास सुकर होण्यासाठी तुम्हाला प्रसूती विमा(Maternity Insurance) घेणे गरजेचे आहे. Maternity Insurance तुम्हाला बाळंतपणाचा आणि गर्भधारणेशी संबंधित खर्चाची काळजी घेण्यास मदत करतो. आपण सध्या बघतो की hospitalization charges, doctor fees,औषधे यांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हे खर्च नवीन पालकांसाठी खूप आर्थिक अडचणी निर्माण करतात.काही प्रसूती (Deliveries) मध्ये खूप वेळा complications येतात. आणि औषधे आणि इतर अनेक खर्च वगळता ५०००० ते १००००० पर्यंत देखील डिलिव्हरी चा खर्च होऊ शकतो. अशावेळी maternity insurance नसेल तर आर्थिक ताण येऊ शकतो. यासाठी Maternity Insurance घेणे गरजेचे आहे.

गर्भवती महिलांसाठी प्रसूती विम्याचे फायदे । Benefits Of Maternity Insurance For Pregnant Women

Benefits Of Maternity Insurance For Pregnant Women
Benefits Of Maternity Insurance For Pregnant Women
  1. काही प्रसूती (Deliveries) मध्ये खूप वेळा complications येतात. आणि औषधे आणि इतर अनेक खर्च वगळता ५०००० ते १००००० पर्यंत देखील डिलिव्हरी चा खर्च होऊ शकतो. अशावेळी maternity insurance नसेल तर आर्थिक ताण येऊ शकतो. यासाठी Maternity Insurance घेणे गरजेचे आहे.
  2. Maternity Insurance मुळे तुमचे हॉस्पिटल चे खर्च कमी प्रमाणात होतात. मातृत्व विमा हा फक्त medical expense च नाही, तर नवजात मुलाच्या(New Born Baby) संबंधित खर्चदेखील कव्हर करतो.
  3. Maternity Insurance घेण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कोणकोणत्या गोष्टी कव्हर केल्या जाईल. सर्वसाधारणपणे Maternity Insurance मध्ये खालील गोष्टींसाठी संरक्षण प्रदान केले जाते.
  4. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि दाखल झाल्यानंतरचा खर्च (Pre & Post Hospitalization)
  5. Normal आणि सिझेरिअन (C- section) delivery expenses.
  6. नर्सिंग, खोलीचे भाडे(room rent), ऑपरेशन थिएटरचे शुल्क(Operation Theatre charges), भूलतज्ज्ञ शुल्क(anesthetist fees) आणि डॉक्टरांच्या शुल्काशी संबंधित हॉस्पिटलायझेशन खर्च.
  7. नवजात मुलाच्या वैद्यकीय उपचाराशी संबंधित खर्च(Expenses related to medical treatment of a New born child)
  8. डे केअर उपचार(Day care treatment)
  9. नवजात मुलांसाठी लसीकरण खर्च विमा(Immunization cost insurance for newborns)
  10. प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा खर्च(Ambulance expenses for commuting the insured)
  11. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार(Cashless treatment in network hospitals)
  12. Maternity Insurance कंपन्यांचा प्रतिक्षा कालावधी(waiting period) हा सर्वसाधारणपणे 9 ते 36 महिन्यांचा असतो, म्हणूनच Maternity Insurance घेण्यापूर्वी या गोष्टीचा विचार जरूर करावा.

यासाठी पुढील Maternity insurance policy चा विचार करावा.

1. Religare Joy Maternity Plan –

हा एक खूप चांगला प्लॅन आहे जो आईबरोबरच new born baby च्या देखील सर्व treatments कव्हर करतो.
ही योजना Joy Today आणि Joy Tomorrow या दोन प्रकारांमध्ये येते आणि दोन्ही प्रकारांमध्ये इन्शुरन्स ची रक्कम रु. 3 लाख किंवा रु. 5 लाख, यापैकी पॉलिसीधारक लाभ घेण्यासाठी निवडतो. ही योजना वैयक्तिक किंवा कौटुंबिक फ्लोटर आधारावर घेतली जाऊ शकते.

फॅमिली फ्लोटर बेसिस अंतर्गत, जास्तीत जास्त चार सदस्यांना यामध्ये दोन adults आणि दोन dependent मुलांचा समावेश केला जाऊ शकतो. 18 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते.हा प्लॅन pregnancy दरम्यान होणाऱ्या Hospital Expenses ना देखील कव्हर करतो,तसेच post maternity expenses देखील कव्हर करतो.

New Born Baby Cover- या Health Insurance मध्ये बाळाच्या जन्मापासून ते ९० दिवसांपर्यंतची मेडिकल बिल्स देखील कव्हर होतात. या Maternity Health Insurance चा waiting period देखील सर्वात कमी असतो. Joy Today मध्ये ९ महिने आणि Joy Tomorrow मध्ये २४ months एवढा असतो.

वैशिष्ट्ये | Features of Maternity Insurance in Marathi

  1. मॅटर्निटी कव्हर – Maternity Coverage हा वयाच्या ४५ वर्षांपर्यंत ऑफर केला जातो
  2. Day Care Treatment-जेव्हा तुम्ही हॉस्पिटल मध्ये २४ तासांपेक्षा जास्त वेळ ऍडमिट असाल तेव्हा रूम रेंट, ICU चार्जेस, नर्सिंग चार्जेस, सर्जन फी, डॉक्टर फी, Anesthesia चार्जेस, operation Theater चार्जेस हे कव्हर केले जाते.
  3. No claim bonanza – Religare Joy Maternity Plan मध्ये जर पोलिसी धारकाने ३ वर्षाच्या कालावधीत दावा केला नाही तर त्याच्या insurance च्या रकमेपैकी १००% बोनस मिळू शकतो.
  4. Single private room with AC – या पॉलिसी मध्ये तुम्ही एक single private room ज्यामध्ये AC असेल ती घेऊ शकता.
  5. हॉस्पिटल मध्ये जाण्याआधीचा आणि नंतरचा खर्च(Pre & Post Hospitalization) -या पॉलिसी मध्ये हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वीचा ३० दिवसांचा आणि हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर पुढील ६० दिवसांचा खर्च कव्हर केला जातो.
  6. Cashless Hospitalization – नेटवर्क हॉस्पिटल्स मध्ये तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी मिळू शकते. ऐन डिलिव्हरी च्या वेळी कॅश साठी चिंता करण्याची गरज नसते.
  7. Direct insurance claim facility म्हणजेच नेटवर्क हॉस्पिटल मध्ये health card दाखवून कॅशलेस सर्व्हिसेस घेऊ शकता.
  8. Long Term Policy – या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला 3 वर्षांची दीर्घ मुदतीची पॉलिसी मिळेल आणि पॉलिसीच्या renewalची काळजी करण्याची गरज नाही.
  9. प्रगत तंत्रज्ञान पद्धती(Advance Technology Methods)– प्रगत तंत्रज्ञान पद्धती मुळे तुम्हाला चांगले उपचार आणि चांगली ट्रीटमेंट मिळते.
  10. Free Look Period – जर काही कारणामुळे तुम्हाला पॉलिसी कॅन्सल करायची असेल तर १५ दिवसांमध्ये फ्री लुक पिरियड मध्ये पॉलिसी कॅन्सल करू शकता. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीत.
  11. Discount – तुम्ही जास्त वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल तर १०% पर्यंत premium discount मिळतो.

Reference link: Religare Joy Maternity Plan

2. Max Bupa (now Niva Bupa) Health Insurance: Health Insurance for Maternity

  • Maternity benefit – या Maternity Health Insurance मध्ये २ डिलिव्हरी पर्यंत Maternity benefit मिळतो.
  • Coverage – या पॉलिसी मध्ये जर दोन्ही पार्टनर्स पॉलिसिमध्ये सलग दोन वर्षे संरक्षित असतील तरच Coverage प्रदान केले जाते.
  • Newborn baby cover – या पॉलिसी मध्ये नवजात बाळाला पुढचे renewal होईपर्यंत अतिरिक्त प्रीमियम शिवाय कव्हर केले जाते.
  • Discount – जर तुम्ही सतत दोन वर्षांचा कव्हर निवडला असेल तर तर तुम्ही दुसऱ्या वर्षी ७.५% एवढा डिस्काउंट मिळवू शकता.
  • Cashless hospitalisation – तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल मध्ये कॅशलेस ट्रीटमेंट घेऊ शकता.
  • Enrollment Age – या पॉलिसी मध्ये नाव नोंदणीसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.
  • Policy Term – या पॉलिसी मध्ये दोन वर्षांचा पॉलिसी टर्म चा पर्याय उपलब्ध असतो.

Scope of Coverage

  1. यामध्ये patient च्या medical expenses चा कव्हर मिळतो.
  2. Pre and post hospitalisation – या पॉलिसी मध्ये Pre hospitalization म्हणजेच हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वीचा ६० दिवसांचा आणि post hospitalization म्हणजेच हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतरचा ९० दिवसांचा खर्च कव्हर केला जातो.
    Coverage – या पॉलिसी मध्ये नवजात बाळाचा लसीकरणाचा(vaccination) चा खर्च अतिरिक्त प्रीमियम शिवाय कव्हर केला जातो.
  3. जर हॉस्पिटल मध्ये बेड्स ची कमतरता असेल तर घरीच उपचार केले जातात त्याचे सुद्धा coverage या पॉलिसी मध्ये include असते.
  4.  जर काही विशिष्ट रोगासाठी(disease) भारताबाहेर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काही विमा रक्कम मिळते.
  5. Prosthetic implants – प्रोस्थेटिक इम्प्लांट्स विमा रकमेपर्यंत संरक्षित केले जातात.
  6. Operation Theater आणि ICU चे चार्जेस देखील कव्हर होतात.
  7. Ambulance – Emergency Ambulance चा खर्च देखील कव्हर केला जातो.
  8. Age – या पॉलिसी मध्ये entry आणि exit करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते.
  9. Max Bupa (now Niva Bupa) – या पॉलिसी मध्ये तीन variants येतात – १)Silver २)Gold ३)Platinum

Reference link : Max Bupa (now Niva Bupa) Health Insurance

3. Myhealth medisure classic by hdfc ergo

  1. या पॉलिसी मध्ये नॉर्मल डिलिव्हरी साठी २०००० किंवा विम्याच्या रकमेच्या १०% यामध्ये जी amount कमी आहे तेवढी रक्कम मिळते.
  2. सिझेरिअन डिलिव्हरी मध्ये ४०००० किंवा विम्याच्या रकमेच्या २०% यामध्ये जी amount कमी आहे तेवढी रक्कम मिळते.
  3. या पॉलिसी चा waiting period हा ४८ महिने एवढा असतो.
  4. Coverage – दोन डिलिव्हरी किंवा दोन टर्मिनेशन ना coverage मिळतो.
  5. Newborn baby ला जन्मापासून ९० दिवसांपर्यंत कव्हर केले जाते त्यानंतर जर बाळाला कव्हर करायचे असेल extra premium चार्ज केला जातो.

Reference link : Myhealth medisure classic by hdfc ergo

आवश्यक कागदपत्रे | Documents for Maternity Insurance in Marathi

प्रत्येक कंपनी साठी वेगवेगळी कागदपत्रे(documents) आवश्यक असतात. मी तुम्हाला सर्वसामान्यपणे जी कागदपत्रे(documents) लागतात त्याची लिस्ट देत आहे.

  1. वयाचा पुरावा(Age Proof)-आधार कार्ड,जन्म प्रमाणपत्र(Birth Certificate),passport, school/college passing certificate
  2. ID Proof – आधार कार्ड,passport,driving license etc.
  3. Address Proof-Ration card, electricity bill, driving license etc.
  4. जर अर्जदार(Applicant) ४५ वर्षांपेक्षा मोठा असेल तर त्याचे मेडिकल रिपोर्ट्स
  5. पासपोर्ट साइज फोटो

एक छोटीशी कविता

लवकरच खरेदी करा प्रसूती विमा

अतिरिक्त खर्चापासून संरक्षण मिळवा

कमी होईल मनावरचा ताण

सुकर होईल मातृत्वाचा प्रवास

महत्वाची प्रश्नोत्तरे (Frequently Asked Questions)

Q. 1) प्रसूती Insurance कधी खरेदी करावा | When to purchase a Maternity Insurance in Marathi?

सर्व प्रसूती विमा(maternity insurance) मध्ये एक ठराविक waiting period असतो.हा waiting period नऊ महिने ते चार वर्षांपर्यंत असतो.जर तुम्ही ऑलरेडी pregnant असाल तर maternity cover चा benefit तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे या गोष्टींचा विचार करूनच मॅटर्निटी इन्शुरन्स घ्यावा.

Q. 2) भारतातील प्रसूती विम्यासाठी प्रीमियम rate कसे आहेत | What are the premiums rate for maternity insurance in Marthi?

Maternity insurance चे प्रीमियम rate हे सामान्य इन्शुरन्स च्या प्रीमियम rate पेक्षा जास्त प्रमाणात असतात.

IMP Note

ही information मी माझ्या रिसर्चद्वारे दिली आहे माझा उद्देश हा कंपनी चे प्रमोशन करण्याचा नसून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा आहे. तरी तुम्ही कोणतीही पॉलीसी घेताना आपल्या पद्धतींने जरूर रिसर्च करावा. आणि योग्य ती खात्री करून घेऊनच आपल्याला योग्य वाटणारी पॉलीसी निवडावी.कंपनीचे प्लॅन्स देखील सतत बदलत असतात त्यामुळे कोणतीही पॉलिसी घेण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच या तीन पॉलीसी व्यतिरिक्त देखील पॉलीसी उपलब्ध आहेत तुम्हाला जर त्यातील एखादी पॉलीसी योग्य वाटत असेल तर त्यातील पॉलीसी निवडावी.

तर मी आज तुम्हाला Maternity Insurance बद्दल थोडक्यात माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

गर्भसंवाद गर्भावस्थेत कसा साधावा? | How to talk with your baby in womb?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “गर्भवती महिलांसाठी प्रसूती विमा | Maternity Insurance Information in Marathi 2024”

Leave a Comment