लहान बाळासाठी पौष्टिक असे मेतकूट कसे तयार करावे । How to make a nutritious Metakut in Marathi

लहान बाळासाठी पौष्टिक असे मेतकूट कसे तयार करावे । How to make a nutritious Metkut in Marathi

How to make a nutritious Metakut in Marathi
How to make a nutritious Metakut in Marathi

 

How to make a nutritious Metakut in Marathi: जर घरात लहान बाळ असेल तर आपल्याला त्याला काय जेवायला द्यावे असा प्रश्न पडत असतो. बाळ बऱ्याचदा खाता-पिताना खूप नखरे करते. आज मी तुम्हाला मेतकूट कसे तयार करावे याची रेसिपी सांगणार आहे. जी अगदी बाळांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. छानसा मऊसर भात त्यावर थोडेसे तूप आणि मेतकूट घातले कि बाळ अगदी बोटं चाटत मटामटा जेवतो.मेतकूट हा पारंपरिक पदार्थ असून मुख्यतः महाराष्ट्रात बनवला जातो.

मेतकूट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी तांदूळ
  • १ वाटी चणाडाळ
  • १/२ वाटी मुगडाळ
  • १/४ वाटी उडीद डाळ
  • १ चमचा जिरं
  • १ चमचा हळद
  • १ चमचा हळद
  • १/२ चमचा हिंग
  • चवीनुसार मीठ
  • (जर मोठ्या माणसांसाठी बनवायचे असेल तर १ चमचा लाल तिखट घालावे)

कृती:

सर्वात प्रथम तांदूळ,डाळ हे सर्व एक एक करून मंद आचेवर भाजून घ्यावे. नंतर ते थोडे ब्राउनिश झाल्यावर एक खमंग असा वास येतो. नंतर त्यात हळद आणि जिरं हलकेच गरम करून टाकावे. त्यानंतर थोडासा हिंग घालावा नंतर हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर सर्व व्यवस्थित मिक्स करून मिक्सर ला बारीक करून घ्यावे. अशा पद्धतीने आपले मेतकूट तयार.

मी तयार केलेली एक छोटीशी कविता

रुचकर खमंग बनवा मेतकूट स्वादिष्ट
आहे खूपच ताकदीचे आणि चविष्ट

बाळ जेऊ लागेल भात मटामट
जेवणही होऊ लागेल मग पटापट

सर्वांच्याच आवडीचे मेतकूट,तूप,मीठ,भात
खात राहतील सर्वच चाटूनपुसून हात

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

१)मेतकूट बाळाला कोणत्या महिन्यांपासून देऊ शकतो?

मेतकूट हे पचायला हलके असल्यामुळे बाळ सहा महिन्यांचा झाल्यावर जेव्हा आपण त्याला वरचे पदार्थ द्यायला सुरुवात करतो तेव्हा देऊ शकतो. परंतु सुरुवातीला अगदी थोड्या थोड्या प्रमाणात द्यावे. मग हळू हळू बाळ जसा मोठा होत जाईल तसे प्रमाण वाढवावे.

२)डाळ किंवा तांदूळ भाजताना मोठ्या गॅसवर भाजले तर चालेल का?

नाही,जर मोठ्या गॅस वर डाळ तांदूळ भाजले तर ते जळतील आणि पूर्णपणे भाजले जाणार नाही आणि त्याला खमंगपणा येणार नाही. त्यामुळे चवही बिघडेल.

अधिक वाचा:

• स्टार अनिसची संपूर्ण माहिती Star Anise in Marathi

• Poppy seeds Benefits and Side Effects in Marathi In 2022| खसखस खाण्याचे फायदे आणि तोटे

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

3 thoughts on “लहान बाळासाठी पौष्टिक असे मेतकूट कसे तयार करावे । How to make a nutritious Metakut in Marathi”

Leave a Comment