Appropriate and Complete Nagpanchami Information In Marathi In 2022|नागपंचमी विषयावर मराठी निबंध

Nagpanchami Information In Marathi,नागपंचमीची माहिती मराठीमध्ये ,नागपंचमी विषयावर मराठी निबंध,नागपंचमीचे महत्व काय आहे?,नागपंचमी साजरी करण्याची पद्धत

श्रावण महिना सुरु झाल्यावर येणार पहिला सण म्हणजे नागपंचमी(Nagpanchami). जरी हा पहिला सण असला तरी या सणाचे खूप महत्व आहे. नागपंचमी हा एक पारंपारिक सण आहे आणि हा हिंदू लोकांमध्ये साजरा केला जातो. नाग या प्राण्याला एरवी आपण खूप घाबरतो पण या दिवशी मात्र सर्वजण नागाची पूजा करतात. या दिवशी घरोघरी नागदेवतेचे पूजन केले जाते.

Nagpanchami Information In Marathi
Nagpanchami Information In Marathi

नागपंचमीची माहिती मराठी:

नागदेवतेची पूजा करण्याची पद्धत:

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करून घ्यावे अशी सर्वांची भावना असते. यादिवशी स्त्रिया छान नटून थटून नवीन अलंकार,वस्त्रे घालून नागदेवतेची पूजा करतात. यासाठी स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढतात. नंतर त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून मनोभावे पूजा करतात. श्रावण महिन्यात निसर्ग खूप छान दिसतो कारण सर्वत्र पाने,फुले आणि हिरवळ दाटलेली असते. त्यामुळे आघाडा,दुर्वा यासारख्या वनस्पती अगदी सहजच उपलब्ध होतात.

नैवेद्य:

पूजा करून झाल्यावर नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. नागाला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

उपवास:

नागपंचमीला बरेच जण उपवास देखील करतात.यासंबंधीची एक कथा आहे. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो‘ ही उपवास करणयामागची धारणा आहे.

नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा अनेक रूढी आहेत. त्यापेकी एक कथा म्हणजेच सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.म्हणजेच हा उपवास हा भावासाठी केला जातो.

नागपंचमीचे महत्व काय आहे?नागाची पूजा करण्यामागील शास्त्र:

ज्याप्रमाणे सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला,तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.आणि स्त्रिया यादिवशी भावासाठी उपवास देखील करतात.

नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण:

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे यादिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.

कालिया नाग:

ज्यावेळी ‘कालिया’ नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले,तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यामुळेच या दिवसापासून नागपूजा प्रचलित आली असे मानले जाते. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करावयास जातात.

नागपंचमी साजरी करण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे नाग हा शिव शंकराच्या गळ्यातील दागिना आहे. तसेच शेतामध्ये शेतकरी काम करत असताना ते नागाच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून नागापासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी शेतकरी त्यांची पूजा, अर्चना करत असतात. असे म्हणतात की, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिले मृत्युमुखी पडली त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला.तेव्हापासूनच नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. यादिवशी गोडधोड पदार्थ करतात. या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाही. तसेच चुलीवर तवा आणि कोणत्याही प्रकारच्या भाज्या चिरल्या जात नाहीत. अशा गोष्टींचे पालन आजही केले जाते. श्रद्धाळू लोक नागदेवतेला लाह्या व दुधाचा प्रसाद अर्पण करतात.

सापांची नावे:

 • शेषनाग
 • वासुकी
 • पद्मनाभ
 • कम्बल
 • शंखपाल
 • धृतराष्ट्र
 • तक्षक
 • कालिया
 • मणिभद्रक
 • ऐरावत
 • कार्कोटक
 • धनंजय

या सर्वांची पूजा नागपंचमीला केली जाते.

एकदा एक शेतकरी जमीन नांगरत होता. ती जमीन नांगरताना नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला आणि बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. त्यानंतर बाहेर अन्नाच्या शोधात गेलेली नागिण परत आल्यानंतर आपली पिल्ले मेल्याचे तिला कळले आणि तिने रागाच्या भरात त्या शेतकऱ्याला,त्याच्या बायको-मुलांना आपला दंश करून मारले. शेतकऱ्यावर बदला घेण्यासाठी नागिणीने शेतकऱ्याच्या लग्न झालेल्या मुलीलाही मारण्याची शपथ घेतली.

शेवटी शेतकऱ्याच्या मुलीला दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात मग्न होती. मनोभावे पूजा करून तिने दूध, लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवत होती. तिची मनोभावे भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली आणि तिने त्या मुलीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिचे आईवडिल आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.म्हणूनच यादिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत आहे.

कालसर्प आणि सर्प दोष:

कालसर्प आणि सर्प दोष असणाऱ्यां व्यक्तींनी जर नागदेवतेची पूजा केली तर त्याचा प्रभाव दूर होतो. यादिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबात सर्पभय राहत नाही. पंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणापासून नागाची मूर्ती तयार करून त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावत चिटकावे. यामुळे सर्पभय राहत नाही. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये किंवा भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

पुराणांमधील एक कथा:

एकदा तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल त्याला सजा म्हणून राजा जनमेजय याने सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजय याने मग ‘इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजय याने अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजय याला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजय याने आस्तिकऋषींनावर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

कालांतराने यादिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने यादिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

वारुळात जाऊया नागोबाला पुजायला

आला सण नागपंचमीचा

नागपंचमीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा

सदैव आनंदी रहा हीच आमची सदिच्छा

नागपंचमी २०२२

तारीख२ ऑगस्ट २०२२
वारमंगळवार
तिथीशु.पंचमी २९.४१
नक्षत्रउत्तर १७. २७
योगशिव १८. ३५
करणबव १७. ३०
राष्ट्रीय११

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

`

नागपंचमीला काय करू नये?

यादिवशी जमीन खणणे, नांगरणे, भाज्या चिरणे,कापणे या गोष्टी करू नयेत.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया काय करतात?

यादिवशी स्त्रिया छान नटून थटून नवीन अलंकार,वस्त्रे घालून नागदेवतेची पूजा करतात.गाणी गाणे, फेर धरणे, झोपाळे बांधून झोके घेणे, विविध खेळ खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात.

तर मी आज तुम्हाला Nagpanchami Information In Marathi या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 2022|Surya Ugavla Nahi Tar Latest beautiful Marathi Essay

Sorry status marathi || Sorry message-sms Marathi || सॉरी स्टेटस मराठी | Sorry quotes in Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

2 thoughts on “Appropriate and Complete Nagpanchami Information In Marathi In 2022|नागपंचमी विषयावर मराठी निबंध”

Leave a Comment