Oats recipes in marathi In 2024 | ओट्स रेसिपी | Oats in Marathi

Oats recipes in marathi In 2024 | ओट्स रेसिपी

Oats recipes in marathi: ओट्स हे इतर तृणधान्यांपैकीच एक धान्य आहे. हे धान्य कमी तापमान असणाऱ्या ठिकाणी वाढते. यामुळे याची लागवड मुख्यतः युरोप,अमेरिका,कॅनडा,रशिया,ऑस्ट्रेलिया,फ्रांस,चीन यांसारख्या देशांमध्ये होते. भारतातही पंजाब व हरियाणामध्ये याची लागवड केली जाते. ओट्स मध्ये शरीराला चांगले असे अनेक पोषक घटक आहेत. ओट्स मध्ये फायबर,मॅग्नेशियम,पोटॅशिअम,प्रोटीन,झिंक,आयर्न यांसारखे अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. म्हणूनच आपण आज मुलांसाठी ओट्स च्या वेगवेगळ्या रेसिपीज(oats recipes in marathi) पाहणार आहोत.

oats recipes in marathi
oats recipes

Oats recipes in marathi | ओट्स रेसिपी

ओट्स पोहे

साहित्य:

  • शेंगदाणे-१/२ वाटी
  • तेल-२ चमचे
  • मोहरी-१/२ चमचा
  • जिरे-१/२ चमचा
  • कडिपत्त्ता-७ ते ८ पाने
  • कांदा -१
  • टोमॅटो-१
  • हळद-१/४ चमचा
  • मीठ-१/२ चमचा
  • ओट्स-१ वाटी
  • कोथिंबीर
  • लिंबू रस

कृती:

ओट्स चे पोहे बनवतांना सर्वात प्रथम एका पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यावेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. त्यानंतर त्या पॅनमध्ये थोडेसे तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी,जिरे,कडीपत्ता,हळद टाकून फोडणी तयार करून घ्यावी. त्यानंतर या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून २ मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात १ बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा आणि अजून १ मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेले गाजर टाकून अजून १ मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर यात चवीपुरते मीठ टाकावे आणि भाज्या थोड्या शिजल्यावर यात १ वाटी ओट्स टाकावे.

ओट्स टाकल्यावर सर्व परतून घ्यावे. परतून घेतल्यावर ज्याप्रमाणे आपण पोह्यांवर पाणी शिंपडतो त्याप्रमाणे ओट्सवर पाणी शिंपडून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. एक वाफ आल्यानंतर झाकण उघडून त्यात भाजून घेतलेले शेंगदाणे टाकावे. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे लिंबू पिळून  टाकावे. अशाप्रकारे आपले झटपट बनणारे आणि हेल्दी असे ओट्स चे पोहे तयार. 

ओट्सची इडली | Oats idli recipe in Marathi

साहित्य:

  • ओट्स-१ कप
  • तेल -२ चमचे
  • जिरे-१/२ चमचा
  • मोहरी-१/२ चमचा
  • उडीद डाळ-१ टेबलस्पून
  • चणाडाळ-१ चमचा
  • काजू-२ टेबलस्पून
  • सुजी -१/२ कप
  • दही-१/२ कप
  • गाजर-१/४ कप
  • मटार-१/४ कप
  • कोथिंबीर
  • आले-१ इंच
  • मीठ-चवीपुरते
  • पाणी-आवश्यकतेनुसार
  • काळी मिरी-१/४ चमचा
  • इनो-एक छोटे पॅकेट               

कृती:

सर्वात प्रथम एका बाउलमध्ये १ कप ओट्स घ्यावे. नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. एकदम जास्त फाईन  पावडर बनवू नये, थोडेसे जाडसर वाटावे. त्यानंतर आपण फोडणी करून घ्यावी. फोडणी करण्यासाठी एका कढईत २ चमचे तेल तापण्यासाठी ठेवावे. तेल चांगले तापल्यावर त्यात १/२ चमचा जिरे,१/२ चमचा मोहरी,१ टेबलस्पून उडीद डाळ,१ चमचा चणाडाळ हे सर्व घालावे. नंतर त्यात काजूचे तुकडे घालावेत. नंतर अर्धा कप सुजी टाकावी आणि हे सर्व परतून घ्यावे.

सुजी बारीक गॅसवर पाच मिनिटे परतून घ्यावी नंतर त्यात ओट्सची पावडर टाकावी आणि १ मिनिटांपर्यंत परतून घ्यावे. नंतर गॅस बंद करून हे सर्व एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. हे आपले ओट्स इडलीचे प्रिमिक्स आहे हे आपण १ महिन्यांपर्यंत स्टोर करून फ्रिजमधे ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला इन्स्टंट इडली बनवायची असेल तेव्हा त्यात भाज्या आणि दही घालून इडली बनवता येते.

नंतर गॅसवर एका इडलीपॉटमध्ये थोडेसे पाणी घालून पॉट दहा मिनिटे गरम करण्यासाठी ठेवावा आणि दुसरीकडे इडलीच्या बॅटरची तयारी करून घ्यावी. आपल्या मिश्रणामध्ये आपण सर्वात प्रथम आपण १/२ कप आंबट दही घालावे. नंतर त्यात बारीक चिरलेले गाजर,मटार,कोथिंबीर,किसलेले आले हे सर्व टाकावे आणि मिक्स करून घ्यावे.त्यानंतर त्यात १/२ कप पाणी घालावे आणि सर्व मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर यात पाव चमचा काळी मिरी पावडर घालावी आणि हे मिश्रण दहा मिनिटे ठेवून द्यावे. नंतर दहा मिनिटे होईपर्यंत इडली पॉटला थोडेसे तेल लावून घ्यावे. नंतर तयार मिश्रणात एक छोटेसे पाकीट इनो घालावे आणि सर्व बॅटर मिक्स करून घ्यावे. नंतर इडल्या लावून घ्याव्यात आणि १० ते १५ मिनिटे बारीक गॅसवर वाफवून घ्याव्यात. अशाप्रकारे आपल्या ओट्सच्या इडल्या तयार. 

ओट्स मूग-डोसा | Oats Mug Dosa recipe in Marathi

साहित्य:

  • भिजवलेले हिरवे मूग-१ कप
  • आल्याचा तुकडा-१ इंच
  • ओट्स-१/२ कप
  • मीठ-१/४ चमचा
  • पाणी-आवश्यकतेनुसार
  • तेल
  • तिखट-आवश्यकतेनुसार

कृती:

सर्वात प्रथम एका मिक्सरमध्ये भिजवलेले हिरवे मूग आणि आल्याचा तुकडा टाकावा. मूग कमीत कमी चार तास भिजवावे. भिजवल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. त्यानंतर मिक्सरमधून मूग आणि आले वाटून घ्यावे. त्यानंतर १/२ कप ओट्ससुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे आणि त्याची बारीक पावडर बनवावी. नंतर मुगाच्या वाटणामध्ये ओट्सची पावडर टाकावी. नंतर ते मिक्स करून घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकावे. लहान मुले तिखट खात नसल्यामुळे किंचितच तिखट टाकावे.

तुम्ही जर ही रेसिपी मोठ्यांसाठी बनवत असाल तर मूग आणि आल्याबरोबरच मिरचीसुद्धा टाकावी. नंतर हे मिश्रण झाकण ठेवून थोडा वेळ ठेवावे त्यात कोणत्याही प्रकारचा सोडा घालू नये. थोड्यावेळाने हे बॅटर डोसे  बनवण्यासाठी तयार होईल. एक-एक करून डोसे बनवावे. लहान मुलांना डोसे आवडत असल्यामुळे हे डोसे तुमच्या मुलांना नक्की आवडतील. 

ओट्स पुरी | 

साहित्य:

  • ओट्स-१ कप
  • गव्हाचे पीठ -१ कप
  • मीठ-१/२ चमचा
  • पाणी-आवश्यकतेनुसार
  • तेल

कृती:

सर्वात प्रथम एका मिक्सरमध्ये १ कप ओट्स  वाटून घ्यावे आणि त्याची बारीक पावडर बनवावी.त्यानंतर एका परातीत १ कप गव्हाचे पीठ घेऊन त्यात ही ओट्सची पावडर टाकावी.नंतर त्यात चवीपुरते मीठ आणि २ चमचे तेल टाकावे आणि हातानेच मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यावे. नंतर दहा मिनिटे ही कणिक भिजू द्यावी. दहा मिनिटांनी एका कढईत तेल तापण्यासाठी ठेवावे.तेल तापल्यावर एक-एक करून गरम पुऱ्या तळून घ्याव्यात. या पुऱ्या आपण कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकतो. अशाप्रकारे ओट्सच्या पुऱ्या तयार.

टीप-

पाणी टाकताना साधेच पाणी टाकावे खूप थंड किंवा गरम पाणी टाकू नये.

पुऱ्या करतांना तेल गरम झाल्यावरच टाळाव्यात. जर तेल कमी गरम असेल तर त्या खूप जास्त तेल पितात. 

ओट्सचा चिला | Oats Chilla recipe in Marathi

साहित्य:

  • ओट्स-१/२ कप
  • बेसन-२ ते ३ चमचे
  • सिमला मिरची-१/२ वाटी
  • गाजर-१/२ वाटी
  • कांदा -१/२ वाटी
  • फरसबी-१/२ वाटी
  • मीठ-१ चमचा
  • कोथिंबीर-बारीक चिरलेली
  • पाणी-आवश्यकतेनुसार
  • तेल-आवश्यकतेनुसार
  • हळद-१/४ चमचा
  • तिखट-चवीपुरते

कृती:

सर्वात प्रथम एका बाउलमध्ये १ कप ओट्स घ्यावे. नंतर त्यात २ ते ३ चमचे बेसन टाकावे. नंतर बारीक चिरलेला कांडा,बारीक चिरलेली सिमला मिरची बारीक चिरलेले गाजर,बारीक चिरलेली फरसबी,बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ सर्व क्रमाक्रमाने टाकावे. त्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून त्याचे एक बॅटर  बनवून घ्यावे. नंतर हे सर्व बॅटर झाकण ठेवून १० मिनिटांसाठी ठेवावे. नंतर झाकण उघडून बघावे. 

जर ते बॅटर जास्त घट्ट झाले असेल तर त्यात अजून थोडेसे पाणी टाकावे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात थोडीशी हळद आणि थोडेसे तिखट घालावे. नंतर एका तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे ओट्स चे चिले बनवून घ्यावेत. अशाप्रकारे या चाळ्यांमुळे मुलांच्या पोटात सर्व भाज्याही जातील आणि मुले हा चिला आवडीने खातील.

टीप- या सर्व रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे जास्त तिखट घालू नये. जर मोठ्या माणसांसाठी बनवायचे असेल तर आवडीप्रमाणे तिखट घालावे.

ओट्स रेसिपी बनविण्यासाठी लागणारा वेळ

पदार्थ बनविण्यासाठी लागणारा वेळ
ओट्स पोहे 25 मिनिटे
ओट्सची इडली 30 मिनिटे
ओट्स मूग-डोसा 20 मिनिटे
ओट्सची पुरी 25 मिनिटे
ओट्सचा चिला  25 मिनिटे

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

ओट्स खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत?

ओट्स हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी,हाडांच्या आरोग्यासाठी,केसांच्या आरोग्यासाठी,त्वचेसाठी तसेच वजन कमी करण्यासाठी सर्वच दृष्टीने चांगले आहे.

ओट्स खाण्याचे तोटे काय आहेत?

ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर आपल्याला त्याच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच ओट्स जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याचे अतिसेवन करणे टाळावे.

मी केलेली एक छोटीशी कविता

स्वादिष्ट आणि हेल्दी अशा ओट्सच्या रेसिपी
एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही नक्की

ओट्सचे पोहे असो वा ओट्स ची इडली
सर्वच पदार्थ आहेत खूपच टेस्टी

कधी डब्याला द्या डोसे ओट्सचे
मुले खातील हा डबा आवडीने

कधी घ्या मजा या ओट्सच्या पुरीची
तुम्हा आम्हा सर्वांच्याच ती आवडीची

ओट्सचा चिला तर सोपा बनवायला
सर्वजण येतील तुमच्याकडे खायला

तर आज मी तुम्हाला ओट्सच्या(oats recipes in marathi) वेगवेगळ्या रेसिपीज सांगितल्या. मला खात्री आहे तुमच्या मुलांना या नक्की आवडतील .

जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

Makhana recipe in marathi In 2022|मखाणा रेसिपी

रोज ३० ग्रॅम ओट्स खा ; मिळवा हे जबरदस्त फायदे

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment