Poppy Seeds Khuskhus In Marathi In 2024 | खसखस खाण्याचे फायदे आणि तोटे

Topics

Poppy Seeds Khuskhus In Marathi | खसखस खाण्याचे फायदे आणि तोटे

खसखस म्हणजे काय? Poppy Seeds meaning in Marathi: – इंग्रजीमध्ये खसखसला Poppy Seeds असे म्हणतात. साधारणतः खसखशीचे तीन प्रकार आहेत.

  • पांढरी
  • निळी
  • ओपियम

साधारणपणे बघितले तर खसखस हा स्वयंपाकघरामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ पदार्थ आहे. जो मुख्यतः सजावटीसाठी वापरला जातो. आणि याने पदार्थाची चवदेखील वाढते. पण या खसखशीचे अनेक फायदे आहेत. आज मी तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Poppy Seeds Khuskhus In Marathi :
Poppy Seeds Khuskhus In Marathi :

खसखस चे सेवन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खसखशीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तसेच याचे सेवन आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते.यामध्ये ओमेगा-6 फॅटी ऍसिडस्, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, थायामिन, कॅल्शियम आणि मॅंगनीज यांसारखे घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच खसखशीचे ​​सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

100 ग्रॅम खसखशीच्या ​​बियांमध्ये खालील पोषक तत्वे आढळतात

प्रथिने(Protein) 21.43 ग्रॅम
फॅट्स(Fats) 39.29 ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स(Carbohydrates) 28.57 ग्रॅम
फायबर(Fiber) 25 ग्रॅम
साखर(Sugar) 3.57 ग्रॅम
कॅल्शियम(Calcium) 1250 मिग्रॅ
लोह(Iron) 9.64 मिग्रॅ
मॅग्नेशियम(Magnesium) 357 मिग्रॅ
झिंक(Zinc) 8.04 मिग्रॅ

खसखस खाण्याचे फायदे| Banefits of khaskhas  in Marathi

मधुमेहाच्या रुग्णांसाठी(Diabetes) उपयुक्त

खसखशीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये फायबर असते, जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

बद्धकोष्ठता(Constipation)

खसखशीच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या तक्रारीपासून आराम मिळतो, कारण यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पोटाशी संबंधित अनेक आजारांवर मात करण्यास मदत करते.

अशक्तपणा आणि थकवा(Weakness and fatigue)

ज्या लोकांना अनेकदा अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, त्यांनी खसखशीचे ​​ सेवन केले पाहिजे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात.ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल(Cholesterol)

खसखशीमध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे त्यांनी खसखसचे सेवन करावे.

रोगप्रतिकारशक्ती (Immunity)

खसखशीमध्ये लोह आणि जस्त सारखे घटक असतात, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

हाडांसाठी(Bones) फायदेशीर

खसखशीचे सेवन हे हाडांसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असते.

निद्रानाशापासून मुक्तता (Insomnia)

खसखशीमध्ये असे अनेक घटक असतात, ज्याचे सेवन केल्याने निद्रानाशाची तक्रार दूर होते. म्हणून ती ​​दुधामध्ये टाकून घ्यावी.

वेदनांपासून मुक्तता (Pain Relief)

खसखशीमध्ये असलेले अल्कलॉइड्स वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

सांधेदुखीसाठी उपयुक्त (Joint pain)

स्नायू दुखणे,दातदुखी, मज्जातंतूचे दुखणे,सांधेदुखी या सर्वांसाठी खसखस अतिशय उपयुक्त आहे.

श्वसनविकारांसाठी उपयुक्त (Respiratory Disorders)

खसखशीचा वापर श्वसनासंबंधी आजारांसाठी केला जातो. तसेच ही खोकला बरे करण्यासाठी तसेच दम्यासारख्या समस्यांपासून दीर्घकाळ आराम देण्यासाठी उपयुक्त आहे.

मुतखड्यावर उपयुक्त (Kidney Stones)

खसखशीमुळे किडनी स्टोन तयार होण्याची प्रक्रिया थांबते. यामध्ये असलेले ऑक्सलेट्स शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम शोषून घेतात ज्यामुळे शरीरात क्रिस्टल्स तयार होत नाहीत.

त्वचेची काळजी (Skin Care)

खसखशीचा वापर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतो. ती मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेची जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करते. तसेच ही एक्झामाच्या उपचारासाठी देखील उपयुक्त आहे.

महिला प्रजनन क्षमता सुधारणे (Improving female fertility)

खसखशीच्या वापराने स्त्रीची प्रजनन क्षमता सुधारू शकते. नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या मते, हिच्या तेलाने फॅलोपियन ट्यूब फ्लश केल्यास प्रजननक्षमतेत मदत होऊ शकते.

थायरॉईडसाठी उपयुक्त (Thyroid)

खसखशीमध्ये सेलेनिमय आढळतात.थायरॉईडच्या समस्येवर मात करण्यासाठी सेलेनियम उपयुक्त असते. त्यामुळे योग्य आयुर्वेदिक चिकित्सकाशी सल्लामसलत करून नियमितपणे वापरल्यास थायरॉईडच्या समस्येवर मात करता येते.

मेंदूचे आरोग्य (Brain health)

मेंदूच्या विकासासाठी देखील खसखशीचचे अनेक फायदे आहेत. तिच्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि तांबे यासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ज्यामुळे मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी मदत होते . यामध्ये असलेले कॅल्शियम न्यूरोनल फंक्शन संतुलित करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती(memory) वाढवण्याचे काम करते.

हृदयाची कार्यक्षमता वाढवते (Improved Heart’s Functions)

खसखशीचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे कार्य सुधारते.तिच्यामध्ये लोहासारख्या खनिजांची उपस्थिती असल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुरेशा प्रमाणात पंप करत राहते.

खसखस खाण्याचे तोटे | Side-Effects of khaskhas in Marathi

उलटी (vomiting)

आपल्या आहारात खसखशीचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे उलटी होण्याची तक्रार होऊ शकते.

पोटाचा त्रास (Stomach upset)

आपल्या आहारात खसखशीचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

ऍलर्जी (Allergy)

काही जणांना खसखशीमुळे ऍलर्जी होऊ शकते.अशा स्थितीत याचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

चक्कर येणे (Dizziness and fainting)

खसखस जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे चक्कर आणि मूर्च्छा येऊ शकते.

मी केलेली एक छोटीशी कविता

 

खसखस खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
आपल्या आहारात तिचा वापर करा
आहे ही अनेक आजारांवर उपयोगी
करून तिचे सेवन रहा निरोगी

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

खसखशीची गुणवत्ता किती काळ टिकते?(How long does the quality of poppy seeds?)

खसखशीला हवाबंद डब्यात बंद करून फ्रिज मध्ये ठेवल्यास त्याची गुणवत्ता ६ महिन्यांपर्यंत टिकून राहते. ते बाहेर ठेवल्याने त्याचे लाइफ कमी होते.

मुले खसखस ​​खाऊ शकतात का?(Can children eat poppy seeds?)

जर खसखस चांगल्या दर्जाची असेल तर ती तुम्ही मुलांना देऊ शकता.पण मुलांना ती देताना कमी प्रमाणात द्यावी.

खसखशीचा परिणाम उष्ण असतो का थंड?(Is poppy seeds hot or cold?)

खसखस ही थंड असते. त्यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

खसखशीचा वापर कुठे केला जातो?(Where is poppy seeds used?)

खसखशीचा वापर भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी केला जातो.तसेचअनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाते.दुधात मिसळून पिण्यासाठी वापरतात.तसेच ती मिठाई मध्ये देखील वापरली जाते.

(टीप- या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तर मी आज तुम्हाला Poppy Seeds Khuskhus In Marathi याची थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

खसखसचे अजून फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी हे वाचा :

खसखशीची भाजी कशी बनवावी हे जाणून घेण्यासाठी हे पहा:

अधिक वाचा:

वाचन(Reading) करण्याची सवय मुलांमध्ये कशी लावावी ?

मुलांची शाळेची ऍडमिशन प्रोसेस कशी सुरू कराल|How To Start School Admission Procedure For Your Child in 2022

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.