Pregnancy In Marathi In 2024 | निरोगी गर्भधारणेसाठी काय प्रयत्न कराल?

Pregnancy In Marathi,pregnant in marathi,about pregnancy in marathi,गरोदरपणातील काळजी,गरोदरपण

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते,तिला जेव्हा समजते की आता ती आई होणार आहे,तेव्हा तिच्या आयुष्याला एक कलाटणी(turning point)मिळते. मग ती चालताना,बोलताना,उठताना,बसताना झोपतांना सर्वात आधी आपल्या बाळाचा विचार करू लागते. आई होताना बऱ्याच गोष्टींचा त्यागही(Sacrifice)करावा लागतो. पण त्यातही एक प्रकारचा आनंद दडलेला असतो. आज मी तुम्हाला Pregnancy In Marathi याविषयी माहिती सांगणार आहे.

Healthy Pregnancy साठी तुम्हाला तुमच्या आहारात तसेच तुमच्या lifestyle मध्ये काही बदल करावे लागतील यासाठी पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे:

Pregnancy in Marathi

पौष्टिक आहार (Healthy Food ):

Healthy Pregnancy साठी पौष्टिक आहार हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे.तुम्हाला जर तुमच्या प्रेग्नेंसी मध्ये काही problems face करायचे नसतील तर पौष्टिक आहार आहार घेतला पाहिजे. जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तिचे होणारे बाळ हे त्याच्या परिपूर्ण पोषणासाठी पूर्णपणे त्याच्या आईवर अवलंबून(depend) असते. त्यामुळे गर्भवती स्त्रीने तिच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

तिच्या आहारात सर्व प्रकारची जीवनसत्वे,प्रथिने(Proteins), कडधान्य, हिरव्या पालेभाज्या,फळे,पिष्टमय पदार्थ अशा सर्व पदार्थांचा समावेश असायला हवा.याशिवाय काही फळे,भाज्या ज्या गरोदर पणात खात नाहीत त्या खाणे टाळावे. उदाहरणार्थ पपई,अननस अशी फळे गरोदर पणात खाऊ नयेत,कारण ती खूप गरम असतात.

सुका मेवा(Dry Fruits):

Pregnancy मध्ये आहारात Dry Fruits चा समावेश केला तर चालेल का?असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.तर याचे उत्तर होय असे आहे. तुम्ही Dry Fruits प्रेग्नेंसीमध्ये खाऊ शकता.ड्रायफ्रुट्स मध्ये व्हिटॅमिन्स(Vitamins) , प्रोटीन्स(Proteins) , कॅल्शियम(Calcium), ओमेगा थ्री फॅटी ऍसिड(Omega-3 Fatty Acids),आयर्न(Iron)तसेच भरपूर प्रमाणात nutrients असतात.याचा होणाऱ्या बाळाला आणि आईला असा दोघांनाही फायदा होतो.जर ड्रायफ्रूट्स रात्री भिजवून सकाळी अनशेपोटी खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो.

उदाहरणार्थ काळे मनुका,अंजीर,बदाम जर रात्री पाण्यात भिजत टाकले आणि सकाळी अनशेपोटी खाल्ले तर त्याचा फायदा जास्त प्रमाणात होतो. बदाम खाताना त्याचे साल काढूनच खावे.ड्रायफ्रुट्स मुळे डायजेशन सुधारायला देखील मदत होते.

ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते त्यामुळे प्रेग्नेंसी मध्ये जो विकनेस आलेला असतो तो भरून काढण्यास मदत होते.यासाठी प्रेग्नेंसी मध्ये नियमित प्रमाणात ड्रायफ्रूट्स चा वापर करावा.तसेच ड्रायफ्रूट्स हे कॅरी करायला देखील फारसे जड नसल्यामुळे तुमच्या पर्समध्ये नेहमी जवळ ठेवावे.जर प्रेग्नेंसी मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ड्रायफ्रूट्स खाताना देखील डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे(Avoid Smoking and Drinking):

Healthy Pregnancy साठी स्त्रियांनी गरोदरपणात धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे.कारण त्याचा होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.तसेच एरवीसुद्धा धूम्रपान किंवा मद्यपान करण्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.

पाणी(Water):

Healthy Pregnancy साठी संतुलित आहार या बरोबरच पुरेसे पाणीदेखील प्यायला हवे. पाण्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात. पाण्यामुळे पचन व्हायला देखील मदत होते.प्रेग्नेंसी मध्ये गरोदर स्त्रीने दिवसातून आठ ते बारा कप पाणी प्यायला हवे.जर पाण्याचे प्रमाण कमी झाले झाले तर शरीरात डीहायड्रेशन किंवा थकवा येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच रोज पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मुत्राशय(Kidney) संबंधी आजार कमी प्रमाणात होतात.

फास्ट फूड खाणे टाळायला हवे(Avoid Fast Food):

Healthy Pregnancy साठी गरोदर महिलांच्या आहारात समतोल हवा असायला हवा.यामध्ये काही गर्भवती महिलांना मॅगी,नूडल्स,मंचुरियन,पिझ्झा,पास्ता,बर्गर आणि असे अनेक जंक फूड खाण्याचे डोहाळे लागतात,परंतु अशा चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो किंवा शरीराला घातक असणारे पदार्थ असतात आणि ते बाळाच्या वाढीसाठी देखील घातक असतात.त्यामुळे गर्भारपणात हे पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात.

परंतु जर असे पदार्थ खायची खूपच इच्छा झाली तर महिन्यातून एखादा खाण्यास काही हरकत नाही परंतु अति सर्वत्र वर्जयेत याप्रमाणे या पदार्थांचे अतिरिक्त सेवन गर्भवती स्त्रियांनी करू नये.जर तुम्हाला Healthy Pregnancy हवी असेल तर तुम्ही पौष्टिक,सकस आणि सात्विक आहार घ्यावा.

नियमित व्यायाम(Exercise) करणे आवश्यक आहे:

गर्भवती स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करणे हे अतिशय चांगले आहे.गर्भवती स्त्रियांनी काही विशेष योगमुद्रा केल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.जर Healthy Pregnancy हवी असेल तर Exercise सारखा दुसरा पर्याय नाही.परंतु योगा करताना योगा टीचर किंवा योगा गाईडला बरोबर घेऊनच करा थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.तसेच चालणे हा एक सर्वात उत्तम व्यायाम आहे. यामुळे गर्भवती स्त्रीचे मन स्थिर आणि शांत राहण्यास मदत होते.निरोगी गर्भधारणेसाठी व्यायामासारखा दुसरा चांगला पर्याय नाही

पुरेशी झोप (Sleep) घेणे आवश्यक आहे:

गरोदरपणात पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे अतिशय आवश्यक असते.गरोदर स्त्रीने रात्री किमान आठ तास झोप घेणे गरजेचे असते.तसेच गरोदर स्त्रीने रात्रीचे जागरण करणे टाळावे. गरोदरपणात झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे.बऱ्याच स्त्रियांना गरोदरपणा झोपेच्या समस्या आढळतात यावर वेळीच उपाय करावा दुर्लक्ष करू नये.तसेच गर्भावस्थेत बाळ पोटात असल्यामुळे पोटावर झोपणे टाळावे.

कपडे(Cloths):

गरोदरपणात शक्यतो सुती आणि मुलायम कपड्यांचा वापर करावा.तसेच सैलसर कपडे घालावेत.जीन्स,लेगिन्स सारखे घट्ट कपडे घालणे टाळावे.घट्ट कपडे घातल्यामुळे rashes येणे, खाज सुटणे,त्वचा लाल होणे यासारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.तसेच खूप घाम देखील येतो.त्यामुळे गरोदरपणात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील असेच कपडे घाला ज्यामुळे तुम्हाला उताना बसताना चालताना त्रास होणार नाही.

चपला(Shoes):

प्रेग्नेंसी मध्ये तुम्हाला चपला घालताना देखील विशेष काळजी घ्यावी लागते.उंच टाचांच्या चपलांचा वापर करणे कटाक्षाने टाळावे.साध्या फ्लॅट चप्पल चा वापर करावा,जेणेकरून तुम्ही easily चालू शकाल आणि पाय मुरगळायची किंवा पडायची भीती राहणार नाही. गरोदर पणात तुम्हाला फॅशन करण्यापेक्षा तुमच्या शरीराकडे लक्ष देणे जास्त गरजेचे असते.

अवजड वस्तू उचलणे:

गर्भावस्थेमध्ये तुम्हाला अवजड वस्तू उचलणे देखील कटाक्षाने टाळले पाहिजे.डॉक्टर सुद्धा गर्भवती महिलांना अवजड वस्तू उचलण्यास मनाई करतात. या शिवाय बराच वेळ उभे राहून करावी लागणारी कामे टाळावीत.स्वयंपाक करताना देखील थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्यावा. जास्त वाकून काम करणे देखील गर्भवती महिलांच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

वजनाकडे (Weight) लक्ष देणे आवश्यक आहे:

Healthy Pregnancy साठी गरोदर स्त्रीला तिच्या वजनाकडे लक्ष देणे देखील आवश्यक असते.प्रेग्नेंसी मध्ये गरोदर स्त्रीचे वजन वाढणे हे गरजेचे असते.परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन वाढणे हे एक काळजीचे कारण ठरू शकते.साधारणपणे पहिल्या तीन महिन्यात गर्भवती स्त्रियांना उलटी,मळमळ याचा त्रास होत असतो,त्यामुळे सहसा वजन वाढत नाही उलट कमी होते.

त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यात साधारणपणे10 ते 12 किलो वजन वाढणे हे नॉर्मल आहे.त्याहून जास्त वजन वाढून देऊ नये.तसेच वजन कमी होणे हे देखील चांगले नसते असे होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Tips For Healthy Pregnancy

  • 1.प्रेग्नेंसी मध्ये मन शांत आणि प्रसन्न असावे.
  • 2.कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करू नये.
  • 3.प्रेग्नेंसी मध्ये कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे जेणेकरून आईला आणि होणार्‍या बाळाला त्रास होणार नाही.
  • 4.कोणतीही गोष्ट खाताना प्रमाणात खावी.आवडती गोष्ट आहे म्हणून जास्त खाल्ली असे करू नये.कोणतीही गोष्ट खाताना पितांना संयम(control) ठेवावा.
  • 5.गरोदर स्त्रियांनी त्यांना कम्फर्टेबल(Comfortable) वाटतील असेच कपडे घालावेत. घट्ट कपडे घालणे टाळावे.
  • 6.तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नियमित व्यायाम करा यामध्ये चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे.
  • 7.प्रेग्नेंसी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचावीत जोक्स वाचावेत जेणेकरून तुमचा मूड चांगला होईल.
  • 8.आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे कडधान्य यांचा समावेश असावा.
  • 9.भरपूर पाणी प्यावे.
  • 10.प्रेग्नेंसी मध्ये दातांची काळजी घेणे देखील गरजेचे असते.
  • 11.जर तुम्हाला कोणत्या गोष्टींची मनात शंका येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • 12.प्रेग्नेंसी मध्ये स्वच्छतेची काळजी घेणे देखील आवश्यक असते.
  • 13.अती चिडचिडेपणा,अती संताप करणे टाळावे.

FAQ(महत्वाची प्रश्न उत्तरे)

प्रेग्नेंसी मध्ये काम करू शकतो का?

होय,प्रेग्नेंसी मध्ये आपण नक्कीच काम करू शकतो प्रेग्नेंसी हा काही आजार नाही. फक्त कोणतीही गोष्ट अतिरिक्त करणे हे वाईट असते त्यामुळे अति काम करणे टाळावे.याशिवाय ज्या गर्भवती स्त्रियांना डॉक्टरांनी complete bedrest सांगितली असेल त्यांनी काम करणे टाळावे.

प्रेग्नेंसी मध्ये उलट्या मळमळ होणे हे नॉर्मल आहे का?

होय,प्रेग्नेंसी मध्ये उलट्या,मळमळ होणे हे अगदीच नॉर्मल आहे.हा त्रास साधारणपणे पहिल्या तीन महिन्यांपर्यंत(first trimester) खूप जास्त प्रमाणात होतो.

प्रेग्नेंसी मध्ये केसर(saffron) खाणे हे योग्य आहे का ?

होय,तुम्ही प्रेग्नेंसी मध्ये केसर(saffron) खाऊ शकता परंतु केसर हे खूप गरम असल्या मुळे पहिल्या तीन महिन्यांपर्यंत खाऊ नये.Second trimester पासून एक ते दोन strands दिवसातून एकदा तुम्ही घेऊ शकता. तरीसुद्धा प्रत्येकाची प्रेग्नेंसी वेगळी असल्यामुळे केसर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

मी केलेली एक छोटीशी कविता

आई होताना सोसाव्या लागतात अनेक कळा

चूकवून नाही चालत खाण्यापिण्याच्या वेळा

करावा लागतो तो अनेक गोष्टींचा त्याग

तेव्हाच आयुष्यात बहरेल सुंदर अशी बाग

मनावर ठेवावा लागतो खूप संयम

करावे लागते अनेक नियमांचे पालन

जास्त विचार करून होतो खूप त्रास

म्हणून म्हणते बाळ म्हणते आईला तू फक्त हास

तर मी आज तुम्हाला Pregnancy In Marathi याबद्दल थोडक्यात माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.

जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “Pregnancy In Marathi In 2024 | निरोगी गर्भधारणेसाठी काय प्रयत्न कराल?”

  1. Pingback: Parenting Tips

Leave a Comment