Shravnatla Pahila Paus Vaishishtya:या बालकवींच्या कवितेतील दोन ओळी. श्रावण महिना सुरु झाला की या दोन ओळी गुणगुणल्याशिवाय कोणी रहात नाही. श्रावण महिना सुरु झाला की निसर्गात एक वेगळेच चैतन्य येते. एक उत्साह येतो. वातावरण अगदी प्रसन्न असते. आज याच श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा पाऊस येतो तेव्हा एवढा मुसळधार येतो की आपल्याला छत्री उघडायला किंवा रेनकोट घालायलाही वेळ मिळत नाही तोपर्यंत आपण भिजतो.या पावसाचे थेंबदेखील मोठे मोठे आणि टपोरे असतात,आणि जेव्हापर्यंत आपण छत्री उघडू किंवा रेनकोट घालू तोपर्यंत पाऊस गेलेलादेखील असतो. ऊन आणि पाऊस एकत्र हे आपल्याला श्रावणातच बघायला मिळते. त्यामुळेच श्रावणातील पाऊस हा विशेष असतो आणि तो बऱ्याच जणांना आवडतो. हेच श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य आहे.
श्रावण महिन्याला हिंदीमध्ये सावन असेही म्हटले जाते. आकाशात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसण्यास सुरुवात झाली की श्रावण महिना आल्याचे समजते.
श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य(Shravnatla Pahila Paus Vaishishtya) म्हणजे श्रावण महिन्यातील निसर्ग:
श्रावण महिन्यातील निसर्ग हा खूपच सुंदर असतो. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा आलेला असतो,आणि सर्वत्र हिरवीगार झाडे पहायला मिळतात. श्रावण महिन्यातील निसर्ग हा डोळ्यांना तृप्त करणारा असतो. आपल्या घरच्याच खिडकीत बसून सुद्धा बाहेर बघितले की प्रसन्न वातावरण असते,ज्यामुळे मनाला एक प्रकारचे समाधान मिळते. निसर्गाने जणू काही हिरवागार शालूच परिधान केला आहे की काय असे वाटते. भूमी नववधूसारखी नटली आहे की काय असा भास होतो. सर्वत्र नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. बरेचसे जण सुट्टीच्या दिवशी धबधबे बघण्याचा प्लॅन करतात. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात.
स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा सण(Specially important festival for women):
श्रावण महिन्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यात स्त्रिया व्रतवैकल्य करतात. श्रावणी सोमवार,श्रावणी मंगळवार,श्रावणी शुक्रवार तसेच नागपंचमी,रक्षाबंधन यांसारखे सण श्रावण महिन्यात येतात.या महिन्यात स्त्रिया उपवास करतात. नवीन साड्या, दागदागिने घालून सजतात. आपली हौस पुरवून घेतात. त्यामुळेच स्त्रियांसाठी हा महिना विशेष महत्वाचा आहे.
पद्मजा फेणाणी यांनी गायलेले हे गाणेदेखील मला विशेष आवडते. अगदी सोप्या शब्दात श्रावणाचे अचूक वर्णन या गाण्यामध्ये केले आहे.
श्रावण महिन्यातील उन्हाचे महत्व(Significance of summer in the month of Shravan):
श्रावण महिन्यात कोवळे ऊन पडते. म्हणजे ज्या लोकांना उन्हाचा त्रास होतो त्या लोकांनादेखील या कोवळ्या उन्हाचा त्रास होत नाही. या श्रावणातील उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी एक लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ अशी आहे. हि लावणी कवी ना.धों. महानोर यांची असून आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे. श्रावणाचं ऊन हे अगदी कोवळे असल्यामुळे ते सर्वानाच सोसते,आणि जर तेही कोणाला सोसत नसेल तर मग खरंच कठीण आहे हे सांगायचा प्रयत्न केला आहे.
हवाहवासा वाटणारा पाऊस:
श्रावण महिन्यातील पाऊस हा सर्वाना हवाहवासा वाटत असतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचीच भिजायची इच्छा होते. सर्वजण पावसात भिजण्याचा आनंद घेत असतात,आणि पावसात कांदे-भजी खायची मजा तर काही औरच. श्रावणात पडणारा पाऊस हा जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहोचवणारा पाऊस अगदी उना बरोबर लपंडाव खेळत असतो. श्रावण महिना हा शेतकऱ्यांनादेखील आनंद देणारा असतो. कारण शेतकरी कामामध्ये बुडून गेलेला असतो,तेव्हा त्याला आनंद देण्याचे काम श्रावण महिना करत असतो.
ही कविता देखील आपल्याला आठवते.श्रावण महिना आला की अशा वेगवेगळ्या कविता आपल्याला आठवू लागतात. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते,आणि अशा थंडगार वातावरणात बऱ्याच जणांना कविता ऐकायला किंवा कविता बनवायला देखील आवडते.
पशुपक्षी(animals and birds):
श्रावण महिन्यात पशुपक्षीही आनंदी असतात. मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नाचतात.थंडगार वातावरणामुळे पशुपक्ष्यानादेखील खूप छान वाटत असते. सर्वत्र आनंदी वातावरण असते.
महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)
२०२२ मध्ये श्रावण महिना कधी सुरु होणार आहे?
२०२२ मध्ये श्रावण महिना २९ जुलै पासून सुरु होणार आहे.
श्रावण महिन्यात विशेष कोणाची पूजा केली जाते?
श्रावण महिन्यात विशेषतः भगवान शंकराची पूजा केली जाते.
३)श्रावणात मांस, मासे आणि कांदा लसूण का खात नाही ?
श्रावण महिन्यात मांस, मासे आणि कांदा-लसूण खाण्यास मनाई आहे कारण असं म्हटलं जातं की, हे पदार्थ खाल्ल्यास अध्यात्माच्या मार्गात हस्तक्षेप होतो. या महिन्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते आणि शरीराची स्थिती अधिकच बिकट होते.
तर आज मी तुम्हाला Shravnatla Pahila Paus Vaishishtya या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली आहे मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी | Alexander the great quotes in marathi
मोबाईल वरदान या अभिशाप हिंदी निबंध
1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good morning wishes in marathi | Good morning status in marathi.