Ganesh Chaturthi Unique Information And Story In Marathi 2024 | गणेश चतुथी 2024 माहिती आणि कथा

Ganesh Chaturthi Unique Information And Story In Marathi 2024: गणेश चतुर्थी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भारतातील लोक या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण देशभर साजरा होत असला तरी महाराष्ट्र राज्यात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गणपती वंदन  श्लोक (Ganesh Vandan Shlok In Marathi Lyrics)

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. गणेश चतुर्थी हा  गणपती देवाचा जन्मदिवस आहे जो हिंदू महिन्यातील भाद्रपद या महिन्यात उत्सहाने साजरा केला जातो.  गणेश देव हा सर्व अडथळे दूर करणारे म्हणून त्यांना विघ्नहर्ता असे देखील संबोधले जाते. असे म्हणतात गणपती बाप्पा स्वतः सोबत समृद्धी आणि यश घेऊन येतो. त्यामुळे देशभरात लोक घरोघरी गणेश देवाची स्थापना करून हा सण साजरा करतात.

माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध ( Marathi Essay On My Favorite Festival Ganesh Chaturthi )

भगवान श्री गणेशाला अनेक नावे दिली आहेत, काही लोक त्यांना गणपती बाप्पा म्हणतात, काही लोक त्यांना गजानन म्हणतात आणि काही लोक त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. श्रीगणेश आपल्या सर्व दुःखांचे हरण करतात आणि आपल्याला आनंद देतात अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून त्यांना  विघ्नहर्ता म्हणतात ज्याचा अर्थ सर्व दुःख आणि कष्ट दूर करणारा आहे. गणेश देव हे शंकर भगवान आणि पार्वती देवीचे पुत्र असून त्यांना बुद्धीचा देवता देखील संबोधले जाते .

गणेश चतुर्थी हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसून तो सलग अकरा दिवस साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाची सुंदर सुशोभित मूर्ती आणून किंवा त्याचे स्वागत करून त्याची स्थापना केली जाते आणि मनोभावे बाप्पाची पूजा करून अनंत चतुर्दशीच्या अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते.

लोक अकरा दिवस अखंड श्रीगणेशाची प्रार्थना करतात. ते प्रार्थना करण्यासाठी मंदिरात देखील जातात तसेच ते घरी पूजा देखील करतात. ते अनेक पदार्थ बनवतात आणि श्री गणेशाच्या मूर्तींना नैव्यद्य म्हणून अर्पण करतात. गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात म्हणून त्यांना मोदकांचा नैवैद्य केला जातो त्याचप्रमाणे, जास्वंद चे फुल आणि दुर्वा अर्पण केल्या जातात . शहरांमध्ये जागोजागी मंडप घालून सार्वजनिक गणेश उत्सव देखील साजरा केला जातो . लोक आपल्या कुटुंबासह घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेश देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात.

गणेश देवाची कथा ( Story Of Lord Ganesha In Marathi )

एकदा पार्वती देवीला स्नानासाठी जायचे  होते परंतु आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक सुबक मूर्ती बनवली आणि आपल्या दिव्य शक्तीने ती जिवंत केली. त्या जिवंत झालेल्या मुलाला त्यांनी आपलं मुलं समजलं आणि त्याला शयनगृहा बाहेर पहारा देण्यास नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्यामुलाने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतापले आणि त्यांनी त्या मुलाचा शिर धडा वेगळं केलं.

ganapati janm kahani in marathi
ganapati janm kahani in marathi

पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेरआल्या तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून त्यांनी पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव देवता अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वती देवीची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले. पण पार्वती देवी कोणाचं काहीही ऐकून घेत नाही असे जाणवल्यावर  शंकर देव आपल्या वाहन नंदीला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. नंदी बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर त्या पुतळ्याला लावले आणि त्या मृत देहाला जिवंत केले. आणि तेंव्हापासून हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत (ganpati bappa information in marathi) असणं आवश्यक आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात ( Sarvajanik Ganeshotsav Suruvat In Marathi )

पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हवी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठपना करुन हा उत्सव साजरा केला.

हे पाहून 1894 लोकमान्य टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्‌यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्या वर्षी म्हणजेच 1894 मध्ये पुण्यात शंभरहून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. केसरी या टिळकांच्या वृत्तपत्रातही गणेशोत्सवाबाबत लिहिण्यात आलं होतं. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.

आजकाल, गणेश चतुर्थी हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर लोकांमधील विषमता दूर करण्यासाठी राष्ट्रीय सण म्हणून पाळला जातो. भगवान गणेश विविध नावांनी ओळखले जातात जसे की एकदंत, अमर्याद शक्तींचा देव, हेरंब (अडथळे दूर करणारा), लंबोदरा, विनायक, देवांचा देव, बुद्धीचा देव, संपत्ती आणि समृद्धीचा देव आणि बरेच काही. 11व्या दिवशी (अनंत चतुर्दशी) गणेश विसर्जनाच्या संपूर्ण हिंदू विधीसह लोक गणेशाचे दर्शन घेतात. पुष्कळ आशीर्वाद देऊन पुढच्या वर्षी परत यावे म्हणून ते देवाकडे प्रार्थना करतात.

गणेशाची १०८ नावे (108 Names of Ganapati Bappa In Marathi )

 

लंबोदर – Lambodar गणपती – Ganapati
महाबल – Mahaabal गौरीसुत – Gaurisut
महागणपति – Mahaaganapati लंबकर्ण – Lambakarn
महेश्वर – Maheshwar विघ्नराज – Vighnaraaj
मंगलमूर्ति – Mangalmurti विघ्नराजेन्द्र – Vighnaraajendra
गजकर्ण – Gajkarn विघ्नविनाशाय – Vighnavinashay
गजानन – Gajaanan विघ्नेश्वर – Vighneshwar
गजनान – Gajnaan विकट – Vikat
गजवक्र – Gajvakra धार्मिक – Dharmik
गजवक्त्र – Gajvaktra दूर्जा – Doorja
गणाध्यक्ष – Ganaadhyaksha बुद्धिनाथ – Buddhinath
द्वैमातुर – Dwemaatur धूम्रवर्ण – Dhumravarna
एकदंष्ट्र – Ekdanshtra एकाक्षर – Ekakshar
ईशानपुत्र – Ishaanputra एकदंत – Ekdant
गदाधर – Gadaadhar मूषकवाहन – Mushakvaahan
कपिल – Kapil बालगणपति – Baalganapati
कवीश – Kaveesh बुद्धिप्रिय – Buddhipriya
श्वेता – Shweta बुद्धिविधाता – Buddhividhata
सिद्धिप्रिय – Siddhipriya चतुर्भुज – Chaturbhuj
स्कंदपूर्वज – Skandapurvaj निदीश्वरम – Nidishwaram
भालचन्द्र – Bhalchandra प्रथमेश्वर – Prathameshwar
देवदेव – Devdev शूपकर्ण – Shoopkarna
देवांतकनाशकारी – Devantaknaashkari शुभम – Shubham
गणाध्यक्षिण – Ganaadhyakshina सिद्धिदाता – Siddhidata
गुणिन – Gunin मूढ़ाकरम – Mudhakaram
हरिद्र – Haridra मुक्तिदायी – Muktidaayi
हेरंब – Heramb अविघ्न – Avighn
नादप्रतिष्ठित – Naadpratishthit भीम – Bheem
नमस्तेतु – Namastetu भूपति – Bhupati
उमापुत्र – Umaputra भुवनपति – Bhuvanpati
वरगणपति – Varganapati देवव्रत – Devavrat
वरप्रद – Varprada देवेन्द्राशिक – Devendrashik
वरदविनायक – Varadvinaayak विघ्नविनाशन – Vighnavinashan
वीरगणपति – Veerganapati सुमुख – Sumukha
विद्यावारिधि – Vidyavaaridhi स्वरुप – Swarup
विघ्नहर – Vighnahar तरुण – Tarun
विघ्नहर्ता – Vighnahartta उद्दण्ड – Uddanda
विनायक – Vinayak कीर्ति – Kirti
विश्वमुख – Vshvamukh कृपाकर – Kripakar
यज्ञकाय – Yagyakaay कृष्णपिंगाक्ष – Krishnapingaksh
यशस्कर – Yashaskar क्षेमंकरी – Kshemankari
यशस्विन – Yashaswin क्षिप्रा – Kshipra
योगाधिप – Yogadhip मनोमय – Manomaya
सिद्धिविनायक – Siddhivinaayak मृत्युंजय – Mrityunjay
सुरेश्वरम – Sureshvaram नंदन – Nandan
वक्रतुंड – Vakratund पाषिण – Pashin
अखूरथ – Akhurath पीतांबर – Pitaamber
अलंपत – Alampat प्रमोद – Pramod
अमित – Amit पुरुष – Purush
अनंतचिदरुपम – Anantchidrupam अवनीश – Avanish

भारताबाहेरील गणेश चतुर्थी (Celebration Of Ganesh Chaturthi Outside India)

गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्त्या विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते. तिथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षोडशोपचारे पूजा केली जाते. उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असतं. कारण हा गणपतीला आवडता प्रसाद आहे. गणेश चतुर्थीला (ganesh chaturthi chi mahiti) पारंपारिकरित्या तांदूळ, गूळ आणि नारळ यांच्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नैवेद्य असतात.

The History of Ganesh Chaturthi

गणपती स्तोत्र ( Ganapati Stotra Lyrics In Marathi )

 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका|
भक्तीने स्मारतां नित्य आयुष्कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते|
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ||२||

पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते |
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते ||३||

नववे श्रीभालचांद्र दहावे श्री विनायक |
अकरावे गणपती बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर |
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धिद ||५||

विद्यार्थ्याला मिळेल विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मोक्ष्यार्थ्याला मिळे गती||६||

जपता गणपति स्तोत्र सहा मासात हे फळ|
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिध्दी न संशय||७||

नारदांनी रचीलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे |
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले||


गणेश स्तोत्र ( Ganesh Stotra Marathi Lyrics )

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥


अष्टविनायक गणपती आरती ( Ashtavinayak Ganapati Aarti Lyrics )

।। श्री अष्टविनायक आरती ।।

मोरया मोरया मोरेश्वर मोरया ।
मोरया मोरया चिंतामणी मोरया ।।

मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।
मोरया मोरया महागणपती मोरया ।।

मोरया मोरया विघ्नेश्वर मोरया ।
मोरया मोरया गिरिजात्मक मोरया ।।

मोरया मोरया वरदविनायक मोरया ।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया ।।

मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।
मोरया मोरया गणपतीबाप्पा मोरया ।।

मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे

|| गणपती बाप्पा मोरया….
मंगलमूर्ती मोरया….||


निष्कर्ष :

सध्याची परिस्तिथी पाहता , सगळीकडे प्रदूषण वाढत चालले आहे. आणि गणेश चतुर्थी च्या या दिवसात उत्साहाच्या भरात आपण देखील या प्रदूषणात हातभार लावतोच. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणपती मूर्ती आणून, जोरजोरात स्पीकर वर गाणी लावून, अश्या अनेक प्रकारे प्रदूषणात वाढ होत असते. तर या गोष्टी आपण आपल्या परीने कमी करण्याचा प्रयत्न करूया . आजकाल नैसर्गिक गणपती मूर्ती ( Ecofriendly Ganesh Murti ) त्याचसोबत इकोफ्रेंडली डेकोरेशन (Ecofriendly Ganapati decoration ) साठीचे खूप पर्याय आले आहेत तर त्याचाच वापर करूया .

Ecofriendly Ganesh Murti Options :
१) शाडूची गणेश मूर्ती (मातीची )
२) लागवड करण्यायोग्य वृक्ष गणेशमूर्ती
३) चॉकलेटी गणेशमूर्ती
४) वर्तमान पत्र गणेश मूर्ती

ecofriendly ganesh statue
ecofriendly ganesh statue

हे काही पर्याय आहेत नैसर्गिक गणेश मूर्ती चे जे, सहज रित्या पाण्यात विरघळून जाऊ शकतात किंव्हा ज्यामुळे निसर्गाला हानी पोहचू शकत नाही.

तर तुम्हाला आमच्या या लेखातून गणेश चतुर्थी ची माहिती, गणेश चतुर्थी निबंध, गणपती स्तोत्र, अष्टविनायक गणपती नावे, अष्टविनायक गणपती आरती , गणपती बाप्पा कथा , गणेश चतुर्थी २०२4 , ganesh chaturthi marathi nibandh, eassay on ganesh chaturthi in marathi, ganesh stotra lyrics in marathi, ganapati stotra, ganesh chaturthi 2024, ganesh chaturti mahiti in marathi, information about ganesh festival in marathi, asthvinayak aarti lyrics in marathi, story of ganapati bappa in marathi, names of lord ganesha, chotu ganesha eassay in marathi याबाबत माहिती मिळाली असेलच. तर हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की शेयर करा.

हे आर्टिकल देखील वाचा

Sloka For Kids To Learn In Early Age In Marathi

Birthday Wishes in Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment