Parenting Tips in Marathi | तुमचे मूल तणावात तर नाही ना? या पद्धतीने जाणून घ्या

Parenting Tips in marathi | तुमचे मूल तणावात तर नाही ना? या पद्धतीने जाणून घ्या

Parenting Tips in Marathi: सध्या मानसिक आरोग्याविषयी समस्या वाढतच चालल्या आहेत. आजच्या या मोबाईल च्या जगात मुले खूप जास्त तणावाखाली जगतात आणि त्यांना ही गोष्ट त्यांच्या आईवडिलांना देखील सांगायला जमत नाही. मुलांच्या बाल मनावर सभोवतालच्या घडणाऱ्या घटनांचा खूप लवकर प्रभाव पडतो. मुलांवर घरातील सदस्य, आसपास असणारे लोक, शाळेत सोबत असणारे विद्यार्थी, सिनेमा आणि सोशल मीडिया यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसतो.

मुलांचे विचार प्रभावित आणि विकसित होण्यासाठी आजूबाजूला असलेला समाज हा महत्वाचा कारणीभूत घटक आहे. प्रत्येक आईवडील हे मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा भागविण्यासाठी लक्ष देत असतात मात्र त्यामध्ये ते मुलांच्या वागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात. यामुळे त्यांना हेच समजत नाही की आपल्या पाल्याला कुठल्यातरी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Anxiety meaning in marathi: कोरोना काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर तणाव वाढलेला लवकर दिसून आला. मागील काही काळात असे अनेक प्रकार समोर आले आहेत ज्यामध्ये मानसिक तणावामुळे अनेक मुलांनी स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. लखनऊ येथील एक प्रकार तर खूपच धक्कादायक आहे. एका मुलाने पब्जी या गेम मुळे आपल्या आईची हत्या करून तिचा मृतदेह हा घरातच लपवून ठेवला होता. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी युनिसेफ सारख्या संस्था अनेक कार्यक्रम राबवत आहेत.

तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या भविष्याची आणि मानसिक आरोग्याची काळजी असेल तर तुम्ही देखील तुमचा मुलगा कोणत्या तणावाखाली किंवा समस्येत आहे का? हे जाणून घ्यायला हवे. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी पालकांनी त्यांच्या खालील बाबींकडे लक्ष द्यायला हवे.

Parenting Tips for Kids in Marathi

Parenting Tips for Kids in Marathi
Parenting Tips for Kids in Marathi
  • मुलांना त्यांच्या भावना प्रकट करण्यासाठी प्रोत्साहित करा

पालकांना माहिती असायला हवं की त्यांच्या मुलांची मानसिक स्थिती नक्की कशी आहे. तो नक्की काय विचार करतोय, त्यांचे विचार काय आहेत त्याच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या पाल्याने पालकांसोबत स्पष्टपणे बोलणे अगदी गरजेचे आहे. तुम्ही त्यांच्याशी सतत बोलत असायला हवे कारण जर तुम्ही अचानक त्याला त्याच्यामध्ये झालेल्या वागण्यातील बदलांविषयी विचारले तर तेव्हा तो खरं सांगण्यास घाबरलेला असेल. त्यामुळे आपल्या पाल्यासाठी दररोज थोडाफार वेळ नक्की द्या. त्याचा दिवस नक्की कसा गेला, दिवसभरात काय काय केले हे असे सोपे प्रश्न त्याला विचारून त्याला विश्वासात घ्या. त्यामुळे आपल्या मुलांना नेहमी त्यांचे मत व भावना व्यक्त करण्याची सवय होऊन जाईल .

  • मुलांसाठी वेळ काढा

मुलांच्या वागण्यात झालेले बदल किंवा त्यांच्यावर असलेला दबाव जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी मुलांसाठी थोडातरी वेळ काढावा लागेल. खूप आई वडील हे दिवसभर सुरू असलेल्या कामाच्या व्यापामुळे मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष देखील देऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित काही वाईट पाऊले मुले मुद्दामून देखील उचलतात जेणेकरून त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्याकडे थोडे तरी लक्ष दिले जाईल.

  • पाल्यांच्या वागण्यकडे लक्ष असू द्या

मुलांना नक्की काय करायला आवडते, त्यांची आवड आणि नावड या गोष्टींवर लक्ष असू द्या. त्यासोबत मुलांच्या वागण्यात काही बदल झाल्यास किंवा त्यांच्यातील काही आवडी निवडी बदलल्यास त्याविषयी पाल्यासोबत एकदा नक्की चर्चा करा. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांचे हे वागणे नक्की का बदलले आहे. अनेकदा जेव्हा मुले काही समस्येत अडकतात किंवा त्यांच्यावर कुठल्यातरी गोष्टीचा ताण असतो तेव्हा त्यांचे काम करण्यात मन लागत नाही. मग त्यावेळी ते त्यांच्या आवडीची कामे सुद्धा करत नाही. त्यावेळी त्यांच्या चिडचिड करणे, राग लवकर येणे, एकांतात राहणे आणि शांत राहणे हे काही लक्षणे दिसून येतात.

  • तुमच्या भावना व्यक्त करा

फक्त मुलांसोबत बोलून किंवा त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेता येत नाही. असे देखील असू शकते की मुलगा एखाद्या गोष्टीविषयी घाबरत असेल, त्याने काहीतरी चूक केली असेल आणि तुम्हाला ती गोष्ट संगण्यापासून तो घाबरत असेल. पालकांनी यासाठी त्यांच्या मुलाला भरोसा देणे अगदी गरजेचे असते. तुम्हाला नक्की काय वाटते हे त्यांना मनमोकळे पणाने सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या भावना सहज व्यक्त करू शकतील.

  • समजून सांगा

जर तुमच्या पाल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याला ती रागावून करायला सांगू नका. त्याशिवाय तुम्ही त्याचे मन परिवर्तन करण्यासाठी त्याला समजावून सांगू शकता. तुमच्या रागवण्याने कदाचित ते घाबरून जातील आणि पुढील काळात छोटी चूक देखील सांगण्यासाठी ते घाबरतील. मन शांत ठेवून त्यांना तुमचे मत समजावून सांगा. एखादी गोष्ट चांगली केली की त्यांची स्तुती देखील करा आणि काही चुकीचे केले तर त्यांना समजावून देखील सांगा.

  • मदत करा

मुलांना आपल्या कामांमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना घरातील कामांमध्ये तुमची मदत करायला सांगा. तसेच जर पाल्य एखाद्या कामात व्यस्थ असेल तर त्यांना मदत करायला देखील तयार रहा. त्यामुळे मुले मदत मागण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कधी विचार करणार नाहीत.

  • रागवू नका

मुलांवर किंवा मुलांच्या कुठल्याही वागण्यावर जास्त रागवू नये. तुमच्या रागाचा त्यांच्या बाल मनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तुमच्यातील काही वाद असतील तर ते लगेच शांत होऊन सोडवा. जास्त राग आल्यास मोठा श्वास घ्या. काही वेळ शांत रहा आणि नंतर मग मुलासोबत चर्चा करा.

तर मला अशा आहे तुम्हाला आता Parenting Tips in Marathi या लेखात दिलेल्या ७ टिप्स चा वापर करून तुमचा मुलगा तणावात आहे कि नाही हे तुम्हाला समजायला मदत होईल. तसेच तुमच्या मुलाचे तणाव कसे कमी करता येईल याबाबत देखील मी या लेखात माहिती दिलेली आहे.

Parenting Tips for Kids in Marathi या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Lahan mulanchi khelni

How to control anger in marathi

How To Know Your Child Better

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment