मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची? | Tips to enhance Kids Immunity in Marathi

हवामानातील बदलांमुळे जास्त आजारी पडतात मुले |  जाणून घ्या प्रतिकारशक्ती कधी वाढवणार? | Tips to enhance Kids Immunity

Tips to enhance Kids Immunity in Marathi: बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत असताना सर्वात जास्त त्रास हा मुलांना होत असतो. या वातावरणातील बदलांमुळे त्यांना अनेकदा सिजनल फ्ल्यू, ताप, सर्दी आणि पोटाशी संबंधित समस्या भेडसावत असतात. कधी कधी या समस्या इतक्या अचानक पणे उद्भवतात की त्यांना त्या वेळी इतक्या तातडीने औषधोपचार उपलब्ध करून देणे अवघड असते. अशा वेळी पालकांना एकच काळजी असते की आपल्या मुलांचा या अशा वातावरणातील बदलांपासून संरक्षण व्हायला पाहिजे.

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील काही टिप्सची मदत घेतली जाऊ शकते. या काही अशा टिप्स आहेत ज्यांच्या माध्यमातून मुलांची फक्त प्रतिकारशक्ती वाढणार नाही तर त्यांचे आरोग्य देखील अधिक सुधारेल. चला तर मग जाणून घेऊयात मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि बदलत्या हवामाननुसार त्यांना योग्य प्रतिकारशक्ती मिळण्यासाठी काही टिप्स,

1. पाणी

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मुलांचे अनेक रोगांपासून रक्षण होऊ शकते. मुलांना पाणी योग्य प्रमाणात दिल्यास त्यांची हाडे अधिक मजबूत तर होतात आणि त्यासोबतच त्यांची पचनक्रिया देखील अधिक सुरळीत होते. पाणी पिण्याने मुलांचे अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते. यामुळे मुलांची एनर्जी देखील वाढते आणि सोबतच प्रतिकारशक्ती देखील खूप मजबूत होते.

2. हंगामी भाज्या

हंगामी भाज्या या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण असतात. यामध्ये असलेले अँटी ऑक्सीडांट मुलांच्या शरीराची प्रतिकारशक्ती तर वाढवतात मात्र त्यासोबत अशक्तपणा पासून देखील मुलांचे संरक्षण करतात. मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना पालक, बीट रूट यासारख्या भाज्या नक्की खाऊ घाला. या भाज्या खाऊ घातल्यानंतर मुलांच्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते.

3. प्रोटीन युक्त अन्न

मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्या जेवणात प्रोटीन युक्त अन्न नक्की समाविष्ट करा. प्रोटीन युक्त अन्न सेवन केल्याने मुलांमध्ये प्रतिकारशक्ती तर वाढतेच मात्र त्यासोबत त्यांचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यांच्या अन्नात पनीर, सोया, वाटाणा, सुका मेवा, अंडी आणि चिकन यांचा समावेश करा.

4. दही

मुलांना दही खाऊ घातल्याने त्यांच्या प्रतिकारशक्ती मध्ये वाढ होते. त्यासोबत मुलांची हाडे देखील मजबूत होण्यासाठी मदत होते. दही मध्ये असलेले कॅल्शियम हे हाडांसाठी गुणकारी असतात. दह्यात असलेले प्रोटीन, लोह, जिंक आणि क जीवनसत्व मुलांची प्रतिकारशक्ती वाढविते आणि त्यांचे शरीर निरोगी देखील ठेवते.

5. बाहेर खेळू द्या

हो, मुलांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर त्यांना बाहेर नक्की खेळू द्या. बाहेर खेळल्या नंतर त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास हा योग्य पद्धतीने होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील याची मदत होते. मुलांना बाहेर खेळल्यानंतर रोगाशी लढण्याची ताकद मिळते.

मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या सर्व टिप्स पासून मदत घेता येते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Also read

Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment