Home Remedies for Stretch Marks in Marathi | स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी घरघुती उपाय

स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी घरघुती उपाय | Home Remedies for Stretch Marks in Marathi

Home Remedies for Stretch Marks in Marathi: स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे घरघुती उपाय, काही दिवसात समस्या होईल दूर.

Home Remedies for Stretch Marks in Marathi: जर तुम्ही सुद्धा स्ट्रेच मार्क्स मुळे तुमच्या आवडीचे कपडे घालू शकत नाही का? तर हे काही उपाय आहेत ज्यांच्या अवलंब केल्याने तुमच्या पोटावरील किंवा शरीरावरील कुठेही असलेले स्ट्रेच मार्क्स नक्कीच निघून जातील.

गर्भधारणा झाल्यानंतर किंवा वजन वाढल्यानंतर शरीरात अचानक बदल होतात. त्यामुळे शरीरावरील आपली त्वचा ओढली गेल्याने त्वचेवर अनेक ठिकाणी डाग पडतात. त्यानांच आपण स्ट्रेच मार्क्स म्हणत असतो. सुरुवातीच्या काळात हे स्ट्रेच मार्क्स अस्पष्ट अशा जांभळ्या आणि लाल रंगाचे असतात. ते काहीसे आपल्या नसांसारखे दिसतात. काही काळानंतर ते मोठे होऊन सोनेरी रंगात बदलतात. तसे बघायला गेले तर स्ट्रेच मार्क्स पासून काही धोका नसतो मात्र तर दिसायला खूपच जास्त खराब दिसतात. यापासून सुटका मिळविण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात.

तुम्ही सुद्धा स्ट्रेच मार्क्स मुळे तुमच्या आवडीचे कपडे घालू शकत नाही? घाबरु नका खाली दिलेले काही उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील जेणेकरून तुम्हाला या नको असलेल्या स्ट्रेच मार्क्स पासून कायमची सुटका मिळेल.

स्ट्रेच मार्क्स पासून मुक्ती मिळविण्याचे घरघुटी उपाय – Home Remedies for Stretch Marks in Marathi

1. साखर: एक चमचा साखर बदामाच्या तेलात काही थेंबात टाका. त्यामध्ये निंबाच्या रसाचे काही 3 ते 4 थेंब टाका. त्यांचे एक मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण अंघोळी आधी 2 ते 3 मिनिट लावून नंतर त्याला धुवून टाका. हे एक महिन्यापर्यंत केल्याने तुमचे स्ट्रेच मार्क्स नक्की दूर होतील.

2. कोरफड: कोरफड ही तुमच्या त्वचेला होणाऱ्या जखम पासून संरक्षण द्यायला आणि त्या जखमा आणि डाग कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये अँटी ऑक्सीडांट गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमच्या शरीरावरील डाग कमी करण्यास मदत नक्की होते. स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर कोरफड द्रव्य किंवा जेल लावावे. 10 मिनिट ते तसेच ठेवून नंतर त्याला थंड पाण्याने धुवावे.डाग कमी होण्यासाठी ही प्रक्रिया दररोज करावी.

3. तेलाची मसाज: स्ट्रेच मार्क्स हे त्वचेच्या तणावामुळे येतात. हा तणाव कमी करण्यासाठी आपण त्यावर सतत तेलाची मसाज करून स्ट्रेच मार्क्स घालवू शकतो. उत्तम परिणाम हवे असतील तर यासाठी नारळाचे तेल किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. याशिवाय तुम्ही एरंड्याच तेल, बदाम तेल यांचा देखील वापर करू शकतात.

4. बटाटा: बटाट्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात. एका बटाटयाचा रस काढून त्याला स्ट्रेच मार्क्स वर लावा. 1 ते 2 आठवडे सतत हे केल्याने स्ट्रेच मार्क्स, त्याचे व्रण आणि इतर डाग देखील कमी होतील व तुम्हाला स्ट्रेच मार्क्स पासून सुटका मिळेल.

5. जीवनसत्व ई: त्वचेसाठी जीवनसत्व ई खूप आवश्यक असते. जीवनसत्व ई असलेल्या तेलात देखील अँटी ऑक्सीडांट गुणधर्म असतात. यामुळे कोलेजन कमी होण्यापासून बचाव होतो. दररोज कमीत कमी 15 ते 20 मिनिट स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर जीवनसत्व ई च्या तेलाने मालिश करत जा. या तेलाने स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

योग्य पद्धतीने सर्व उपाय वापरले तर स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे नाहीसे देखील होतात.

तर मैत्रिणींनो मला अशा आहे Home Remedies for Stretch Marks in Marathi या लेखात दिलेले घरगुती उपाय करून स्ट्रेच मार्क्स घालवायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला काही Suggestions द्यायचे असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा:

Garbh sanskar in marathi

Dohale jevan information in marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment