Information about Education Loan in Marathi

Information about Education Loan in Marathi: मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण बघतो की शिक्षणाचे महत्त्व फारच वाढलेले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण हे गरिबाच्या खिशाला परवडणारं राहिलेले नाही आहे, आजच्या घडीला हजारो लाखोंच्या संख्येने विद्यार्थी विदेशामध्ये उच्च शिक्षण घ्यायची स्वप्न बघत असतात. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे स्वप्न फक्त अपूर्ण राहतं. पण अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारकडून एज्युकेशन लोन दिले जाते.

जर तुम्हाला सुद्धा तुमची स्वप्न सत्यामध्ये उतरवायची असतील, व त्यासाठी आर्थिक अडचण दूर करायची असेल, तर तुम्ही सुद्धा एज्युकेशन लोन घेऊ शकता. पण एज्युकेशन लोन कसे घ्यावे? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत.

हे आर्टिकल वाचल्यानंतर आपल्याला कळेल की एज्युकेशन लोन काय असते? एज्युकेशन लोनचे काय काय फायदे आहेत? एज्युकेशन लोनचे किती प्रकार आहेत?

एज्युकेशन लोन कसे घ्यावे 2023 मध्ये? (Education loan Kase ghyave?) या व अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या आर्टिकल मध्ये मिळणार आहे. त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

जेव्हा आपण उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा शिक्षणासाठी आपल्या जवळील बँक किंवा इतर संस्थानाकडून कर्ज घेतो, यालाच एज्युकेशन लोन किंवा स्टुडन्ट लोन असे म्हणले जाते. अशा प्रकारचं लोन मिळवण्यासाठी तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास होणे गरजेचे असते.

हे लोन बँकेकडून मिळवून कोणताही student आपले higher studies चे स्वप्न पूर्ण करू शकतो. विविध बँकांद्वारे एज्युकेशन लोन हे परदेशात त्याचबरोबर आपल्या देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दिले जाते.

जर तुमची पुढील शिक्षणाची इच्छा प्रबळ असेल, तर तुम्ही या लोनसाठी Apply म्हणजे आवेदन करू शकता. देश विदेशामध्ये शिक्षणासाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी विविध बँकांतर्फे हे लोन विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांचे आई-वडील देखील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेऊ शकतात.

एज्युकेशन लोन चे किती प्रकार आहेत? । Types of Education Loan in Marathi

Types of Education Loan in Marathi
Types of Education Loan in Marathi

भारतीय बँक तसेच प्रायव्हेट बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशन लोन प्रदान केले जाते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशन लोन वेगवेगळ्या प्रोग्राम साठी घेऊ शकता.

एज्युकेशन लोन वेगवेगळ्या प्रकारे दिले जाते . जसे की –

1. लोकेशनच्या आधारावर 

जर एखादा विद्यार्थी आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये स्थित असलेल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेऊ इच्छितो, तर तो लोकेशन च्या आधारावर एज्युकेशन लोन घेऊ शकतो. जर कोणी विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी एज्युकेशन लोन घेऊ इच्छितो तर त्यास परदेशात शिक्षण घेणे बंधनकारक आहे.

2. कोर्सच्या आधारावर 

जर तुम्हाला उच्च शिक्षण, डिप्लोमा किंवा व्यावसायिक पाठ्यक्रम असलेला कोर्स करायचा असेल तर तुम्ही या कोर्सच्या आधारावर एज्युकेशन लोन कोणत्याही सरकारी बँक किंवा प्रायव्हेट बँकेद्वारे सहजरित्या मिळवू शकता.

3. गारंटीच्या सुरक्षेच्या आधारावर 

जर तुम्ही सुरक्षित आणि असुरक्षित अशा दोन्ही प्रकारचे लोन एज्युकेशन purpose साठी घेऊ इच्छिता तर तुम्ही गॅरंटीच्या सुरक्षेच्या आधारावर एज्युकेशन लोन सहज मिळवू शकता.

4. करियर एजुकेशन लोन 

जर एखादा विद्यार्थी सरकारी कॉलेज किंवा संस्थेमधून शिक्षण घेऊन करिअर घडवू पाहत असेल तर अशा वेळेस तुम्ही करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकता.

5. प्रोफेशनल ग्रेजुएट एजुकेशन लोन 

जर तुम्ही तुमचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असेल, आणि आता तुम्हाला तुमच्या शिक्षण अजून पुढे चालू ठेवायचे असेल तर तुम्ही प्रोफेशनल ग्रॅज्युएट एज्युकेशन लोन मिळवू शकता.

6. पेरेंट्स एजुकेशन लोन 

जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखाद्या सरकारी किंवा प्रायव्हेट बँकेकडून कर्ज घेता तेव्हा त्यास पेरेंट्स एज्युकेशन लोन म्हटले जाते. आणि अशा तऱ्हेने पेरेंट्स आपल्या मुलांचे भविष्य उज्वल बनवू शकतात.

एज्युकेशन लोन कसे घ्यावे 2023 मध्ये? । Education Loan kase Ghyave

जर तुम्हाला उच्च शिक्षण घेऊन तुमचे करिअर घडवायचे असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी बँक किंवा प्रायव्हेट बँकेद्वारे एज्युकेशन लोन प्राप्त करू शकता. एज्युकेशन लोन प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या गोष्टी फॉलो करू शकता , :-

Step 1: सर्वप्रथम तुम्हाला ज्या कोणत्या मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घ्यायचे असेल तिथून तुम्हाला ऍडमिशन कॉन्फीर्मेशन लेटर आणावे लागेल.

Step 2: यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या बँकेमध्ये तुम्ही एज्युकेशन लोन साठी आवेदन करू शकता.

Step 3: यानंतर लोनच्या संबंधित सर्व कागदपत्रे तुम्हाला बँकेमध्ये जमा करावी लागतील.

जसे की

  1. बँकेचा लोन एप्लीकेशन फॉर्म.
  2. ओळख पत्र.
  3. वर्तमानातील राहण्याचे ठिकाण .
  4. तुमच्या वयाचा दाखला (Age proof)
  5. दोन पासपोर्ट साइज फोटो.
  6. तुमच्याकडे असलेल्या शिष्यवृत्ती (scholarship) पत्राची प्रत.
  7. मागील दोन वर्षांची इन्कम टॅक्स रिटर्न डॉक्युमेंट्स.
  8. सर्व वित्तीय सहायक कागदपत्रे .
  9. मागील 6 महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट.
  10.  मालमत्ता आणि दायित्वांचे विवरण.
  11.  परकीय चलन परवानगी.
  12.  शेवटच्या पात्रता परीक्षेची मार्कशीट.
  13.  विद्यापीठाचे ऑफर लेटर.
  14.  तुमच्या अपेक्षित असलेल्या कोर्सेसची यादी.

Step 4: त्यानंतर, सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रे आणि तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे बँक तुमच्या कर्जाची पडताळणी करेल. बँक पडताळणीनंतर तुमच्या कर्ज (Loan) अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाईल.

Step 5: यानंतर जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य असेल, आणि एज्युकेशन लोन (Education Loan) साठी जर तुम्ही पात्र असाल तर, बँकेकडून लोन एप्लीकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर ती रक्कम तुम्ही दिलेल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.

वेगवेगळ्या बँकांमध्ये एज्युकेशन लोन साठी किती इंटरेस्ट आकारला जातो ? (Education Loan Bank Interest List 2023)

भारतीय यूनिवर्सिटीज़ साठी स्टूडेंट लोन इंटरेस्ट आणि परदेशात शिक्षणासाठी स्टूडेंट लोन इंटरेस्ट :

Bank Name Education Loan Interest Rate (per annum)
State Bank of India (SBI) 6.90% – 9.30%
Punjab National Bank (PNB) 6.90% – 9.55%
Canara Bank 7.40% – 9.40%
Union Bank of India 7.20% – 10.45%
Bank of Baroda 6.85% – 9.95%
Axis Bank 13.70% – 15.20%
ICICI Bank 11.25% – 11.75%
HDFC Bank 9.25% – 13.68%
Kotak Mahindra Bank 12.33% – 16.00%
Tata Capital 10.99%

 

एजुकेशन लोन ची गॅरंटी

जेव्हा आपण कुठल्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून एज्युकेशन लोन ची अपेक्षा करतो तेव्हा आपल्याला बँकेला गॅरंटी किंवा सिक्युरिटी द्यावी लागते. जेव्हा आपल्याला चार लाखांहून ( 400000)अधिक रुपयाचे लोन हवे असेल तर तुम्हाला गॅरंटी द्यावी लागते. चार लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असलेल्या लोन साठी गॅरंटी ची आवश्यकता नसते.

जर तुम्हाला चार लाखांहून अधिक पैशाची आवश्यकता असेल तर विविध बँकेच्या नियमानुसार तुम्हाला सिक्युरिटी ची गरज भासू शकते. त्याचबरोबर जर एखादी बँक तुमच्याकडून प्रोसेसिंग फीज चे पैसे मागत असेल तर या विरोधात तुम्ही कंप्लेंट देखील करू शकता, कारण एज्युकेशन लोन घेताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या प्रोसेसिंग फीज ची गरज नसते.

Education Loan देणाऱ्या बँकांची लिस्ट

Bank Name Official Site Terms & Conditions
State Bank of India Apply Now Click Here
Axis Bank Apply Now Click Here
Punjab National Bank Apply Now Click Here
HDFC Bank Apply Now Click Here
ICICI Bank Apply Now Click Here
Allahabad Bank Apply Now Click Here
Union Bank of India Apply Now Click Here
IDBI Bank Apply Now Click Here
Canara Bank Apply Now Click Here
UCO Bank Apply Now Click Here

 

FAQ : एजुकेशन लोनच्या संबंधित प्रश्न :-

Q. एज्युकेशन लोन ची परतफेड न केल्यास काय होते ?

A. एज्युकेशन लोन ची वेळेवर परतफेड न केल्यास, त्या विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोर खराब होतो, ज्यामुळे त्याला भविष्यामध्ये कर्ज घेण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपले शिक्षण पूर्ण करून जर तो विद्यार्थी नोकरी करत असेल आणि भविष्यामध्ये जर त्यास पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डची गरज भासली तर त्याला ते मिळण्यात देखील अडचणी येऊ शकतात.

एज्युकेशन लोन कोण घेऊ शकते?

A. कोणताही विद्यार्थी एज्युकेशन लोन कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी घेऊ शकतो. जसे की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, किंवा डिप्लोमा किंवा आणखी काही.

Q. एज्युकेशन लोन किती पर्सेंट वर मिळते ?

A. एज्युकेशन लोन आपल्याला सरकारी बँकांकडून 9.37% तर प्रायव्हेट बँकांकडून 10.4% टक्क्यांपर्यंत मिळून जाते.

Q. काय तुम्ही दोन्ही बँकांकडून एज्युकेशन लोन घेऊ शकता ?

A. होय तुम्ही दोन्ही बँकांकडून एज्युकेशन लोन घेऊ शकता परंतु लक्षात ठेवा की, योग्य वेळेवर तुम्हाला या एज्युकेशन लोन ची परतफेड करावी लागेल.

तर मित्रांनो Information about Education Loan in Marathi या लेखातून एज्युकेशन लोन कसे घ्यावे? एज्युकेशन लोन चे किती प्रकार आहेत? एज्युकेशन लोन साठी किती इंटरेस्ट आकारला जातो? इत्यादी प्रकारची माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये बघितली. आम्ही आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल.

तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

हे देखील वाचा

How long does it take to improve a CIBIL in Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

2 thoughts on “Information about Education Loan in Marathi”

Leave a Comment