आपला सिबिल स्कोर किती दिवसांमध्ये अपडेट होतो? How long does it take to improve a CIBIL in Marathi
How long does it take to improve a CIBIL in Marathi: मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्याला विविध प्रकारचे Loan घेण्यासाठी एका चांगल्या सिबिल स्कोर ची आवश्यकता असते. जर तुमचा CIBIL Score कमी असेल तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की CIBIL Score किती दिवसांमध्ये Update होतो? कारण हा CIBIL Score काही वेळानंतर आपण केलेल्या transaction नुसार कमी जास्त होत असतो. त्यामुळे लोन काढण्यापूर्वी तुम्हाला तुमचा CIBIL Score माहिती असणे गरजेजे असते.
यानंतरच तुमचा CIBIL Score कमी आहे की जास्त हे तुम्हाला समजू शकेल.जर तुम्ही असा विचार करत असाल की CIBIL Score चा आपल्या Loan वर काय फरक पडतो? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त त्याद्वारेच बँकेला कळते की तुम्ही तुमच्या जुन्या किंवा आधीच्या कर्जाची (Loan) वेळेवर परतफेड केली आहे की नाही आणि यामुळेच तुमची Credit History देखील दिसून येते.
आणि म्हणूनच एक चांगला CIBIL Score असणे फार गरजेचे आहे. जर तुम्हाला देखील हे जाणून घ्यायचे असेल की आपला CIBIL Score किती दिवसात अपडेट होतो?
जेणेकरुन तुम्ही तुमचा CIBIL Score तपासू शकता, मग आजच्या या Article मध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आज हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की सिबिल स्कोर किती दिवसांमध्ये अपडेट होतो? CIBIL Score kiti divsat update hoto? )
CIBIL Score kiti Divsat Update Hoto
तुमचा CIBIL Score लोन (Loan) पासून Credit Card पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन Save करून ठेवत असतो. ही 300 ते 900 च्या मधील एक अशी संख्या असते ज्यामुळे, तुमची Credit History समजू शकते.
यामध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टींना Notice केले जाते आणि अशाप्रकारे तुमचा CIBIL Score तयार होतो.
- जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा लोन( Loan) खूपच लवकर मिळते.
- परंतु जर तुमचा CIBIL Score 750 पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तीला Loan किंवा Credit Card मिळण्यात बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते.
- जसे की आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितले की CIBIL Score म्हणजे 300 ते 900 मधील एक नंबर असतो ज्यामध्ये 300 हा खूपच कमी तर 900 सगळ्यात चांगला नंबर मानला जातो.
यामध्ये बऱ्याच लोकांचा CIBIL Score हा 700 ते 800 च्या मध्ये असतो.
जर एखाद्या बँकेकडून घेतलेले कर्ज जर तुम्ही वेळेवर परतफेड करता तर तुमचा CIBIL Score हा नेहमी चांगला राहतो.
आणि अशाप्रकारे, तुम्ही भविष्यातही चांगल्या सिबिल स्कोअरद्वारे सहज कर्ज मिळवू शकता. त्याचबरोबर कर्जाव्यतिरिक्त, आपल्याला हवे असल्यास, आपण बँकेकडून क्रेडिट कार्ड देखील घेऊ शकता.
आता तुम्ही विचार करत असाल की CIBIL Score किती दिवसामध्ये अपडेट होतो, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सिबिलनुसार तुमचा CIBIL Score हा 30 ते 45 दिवसात अपडेट होतो.
ज्यामध्ये अपडेट होण्यासाठी कमीतकमी 30 दिवस तर जास्तीत जास्त 45 दिवसांचा कालावधी लागतो.
CIBIL Score Update कोण करतो ?
लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही आजच्या दिवशी Loan किंवा Credit Card चे बिल भरले, तर त्यानंतर बरोबर 45 दिवसांनी तुमचा सिबिल स्कोअर अपडेट होतो; जो बँक आणि NBFC म्हणजे Non-Banking Financial Companies ने पाठवलेल्या अहवालानुसार अपडेट केला जातो.
जेव्हा Bank किंवा Non-Banking finance कंपन्या(NBFC) तुमच्या व्यवहाराचा अहवाल सिबिलला पाठवते, तेव्हा त्यानुसार तुमचा Credit Score किंवा CIBIL Score तयार केला जातो आणि तो वेळोवेळी Bank आणि NBFC द्वारे 30 ते 45 दिवसांत अपडेट केला जातो.
CIBIL Score कसा Check करावा?
जर तुम्हालाही तुमचा CIBIL Score तपासायचा असेल आणि तुम्हाला CIBIL Score कसा तपासायचा हे माहीत नसेल, तर इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत; ज्याद्वारे तुम्ही तुमचा CIBIL Score अगदी Free तपासू शकता, त्या websites खालीलप्रमाणे आहेत
- Cibil.com
- Paisabazar.com
- Wishfin.com
- Bajajfinserv.in
- Credit.club
- Paytm app & Website
- BankBazar.com
- Business Standard.Com
- Comsumersearch.com
- Izito.co.in
बघा या वरील वेबसाइट आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्हीसुद्धा या वेबसाइट्सद्वारे Email Id किंवा Mobile Number ने साइन अप करून तुमचा सिबिल स्कोअर स्वतः तपासू शकता ते सुद्धा अगदी मोफत.
याव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर वेबसाइट्स वरून तुमचा CIBIL Score चेक करायचा असेल तर यासाठी तुम्हाला पैसे देखील लागू शकतात.
CIBIL Score कसा ठीक करावा? | How to increase CIBIL Score in Marathi
जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ठीक करायचा असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टी करणे गरजेचे आहे:
1) तुमच्या Credit Card चे बिल वेळेवर भरा देय तारखेला किव्हा देय तारखेच्या आधी भर.
2) कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा EMI म्हणजे Equated Monthly Instalment योग्य वेळी भरत चला.
3) बँकेतील कर्मचाऱ्यांशी तुमचे वर्तन चांगले ठेवा.
4) तुम्ही ज्या Bank खात्यात कर्जाची रक्कम हस्तांतरित केलेली आहे त्या खात्यातून नेहमी व्यवहार करत रहा.
5) बिलाचे पेमेंट नेहमी पूर्ण करा आणि पेमेंट करण्यात कधीही उशीर करू नका.
6) तुमचे जुने क्रेडिट खाते Credit Account) बंद करू नका.
7) तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासत राहा; ज्याद्वारे तुम्हाला Credit Bureau कडून चुकीची माहिती दिली जात आहे की नाही हे कळू शकेल.
8) लवकरात लवकर Loan किंवा Credit Card मिळवण्यासाठी सतत अर्ज करू नका.
Credit Score / CIBIL Score सुधारण्यासाठी किती कालावधी लागतो?
जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड Payments आणि ईएमआय EMI वेळेवर भरल्यास तूमचा CIBIL Score सहज सुधारू शकतो. पण जर तुमचा Credit Score किंवा CIBIL Score जर खराब असेल तर तो सुधारण्यासाठी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्ष लागू शकते.
जर तुमचा सिबिल स्कोर हा 750 असेल आणि त्यातही जर तुम्हाला सुधारणा करायची असेल, तर वरील गोष्टी उपयोगात आणून तुम्ही तुमचा सिव्हिल स्कोर हा अजून चांगला करू शकता. पुढील सहा महिन्यातच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील. तरीसुद्धा Credit Score किंवा CIBILScore वाढायला किती वेळ लागेल हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.
FAQ
Q. माझ्या CIBIL स्कोअर मुळे माझ्या व्हिसा एप्लिकेशन वर परिणाम होईल का?
उत्तर: नाही, आपल्या CIBIL स्कोअरमुळे आपल्या व्हिसा एप्लिकेशन वर कोणताच परिणाम होत नाही.
Q. CIBIL चे फुल फॉर्म काय आहे?
उत्तर: ट्रांसयूनियन CIBIL लिमिटेड ला आधी CIBIL बोलले जात होते कहा जाता था। CIBIL चे फुल फॉर्म आहे क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड.
Q. CIBIL एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासाच्या नोंदी किती काळ ठेवते?
उत्तरः CIBIL एखाद्या व्यक्तीच्याक्रेडिट इतिहासाची नोंद कमीतकमी 7-10 वर्षे ठेवते.
Q. CIBIL स्कोअर केवळ भारतातच लागू होते का?
उत्तरः होय, सीआयबीआयएल स्कोअर केवळ भारतातच लागू होते कारण ते केवळ भारतीय बँक/एनबीएफसीने प्रदान केलेल्या डेटाच्या आधारे तयार केले जाते.
Conclusion
आजच्या या आर्टिकलमध्ये आपण पाहिलं की Credit Score / CIBIL Score किती दिवसांमध्ये अपडेट होतो? त्याचबरोबर तुम्ही तुमचा CIBIL Score/ Credit score सुधारण्यासाठी काय काय करू शकता? हे देखील आम्ही तुम्हाला सांगितले, आणि CIBIL score/ credit score सुधारण्यासाठी किती कालावधी लागतो? हे देखील आपण या Article मध्ये आपण बघितले .
आम्हाला आशा आहे की आमचा आजचा हा लेख वाचून तुम्हाला Cibil Score /Credit Score बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला आमचे हे Article वाचायला आवडले असेल तर ते तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
तुम्हाला यासंबंधी काही प्रश्न असल्यास, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की विचारू शकता.
धन्यवाद.
हे देखील वाचा