Lahan mulanchi khelni In 2024 | लहान मुलांची खेळणी | Kids Toys in Marathi

Lahan mulanchi khelni,लहान मुलांची खेळणी,khelni lahan mulanchi,lahan mulanche khel

Lahan mulanchi khelni: घरात लहान मुले असली की मग त्यांची खेळणी ही आलीच. आता लहान मुलांना कोणती खेळणी घ्यावीत ज्यामुळे त्यांचे मनही रमेल आणि त्यांचा बौद्धिक विकासही होईल. तर आज मी तुम्हाला लहान मुलांची खेळणी या विषयाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Lahan mulanchi khelni
Lahan mulanchi khelni

लहान मुलांची खेळणी | Toys for Kids in Marathi

खेळणी म्हटले की अगदी लहान बाळापासून ते अगदी मुले मोठी होईपर्यंत त्यांना लागतात. घरात लहान बाळ असले की त्यालाही खुळखुळा ,किंवा वाजणारी खेळणी अशी खेळणी लागतात.

मुलांना वेगवेगळे खेळ देऊन,त्यांच्याबरोबर बसावे. तसेच त्यांना मोबाइल किंवा टीव्ही दाखवण्यापेक्षा ज्यामुळे त्यांचा बौद्धिक,शारीरिक विकास होईल असे खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. त्यांची स्मरणशक्ती वाढेल असे खेळ त्यांना खेळायला द्यावेत.

लहान मुलांचे खेळ | Lahan mulanche khel

  • १) पिरॅमिड – बाळ थोडे मोठे झाले की त्यांना वेगवेगळ्या रंगांचे पिरॅमिड एकावर एक लावता येतात. ते छोट्यापासून सुरु करून मोठ्यापर्यंत असे लावायचे असतात. यामुळे मुलांना थोडा  विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते.
  • २) Funskool Fundough(विविध रंगाची माती) – लहान मुलांना मातीत खेळायला तर खूपच आवडते. या क्लेमुळे ते वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतात. त्यांच्या वयाप्रमाणे मुले वेगवेगळे आकार बनवू शकतात.
  • ३) Puzzles – लहान मुलांना खेळण्यासाठी पझ्झल्स गेम हादेखील एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कोणता शेप कुठे लावावा हा विचार करण्यास मुले प्रवृत्त होतात. त्यांच्या बौद्धिक विकासासाठी हा एक छान  गेम आहे.
  •  ४) Budling blocks – लहान मुलांना खेळण्यासाठी bullding blocks हादेखील एक उत्तम पर्याय आहे.या ब्लॉक्सचे वेगवेगळे कलर असतात. मुलांना यातून वेगवेगळे रंगही आपण शिकवू शकतो आणि वेगवेगळे आकारही शिकवू शकतो.
  • ५) किचन सेट– किचेन सेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. मुलगा असो की मुलगी दोघेही खेळू शकतात. यासाठी मुलांबरोबर बसून त्यांच्याशी खेळावे लागते.
  • ६) कलर बुक्स –  क्रेयॉन्स च्या मदतीने मुले चित्रे रंगवू शकतात. यामुळे त्यांच्या हाताची पकड मजबूत होण्यास मदत होते.
  • ७) बॅट आणि बॉल – लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत क्रिकेटचे सर्वच लोक शौकीन असतात. सर्वांनाच बॅट आणि बॉल खेळायला आवडते. लहान मुलांना खेळण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • ८) वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या– लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या जसे की खेळण्यातला ट्रक,कार,बाईक आणून द्याव्यात. त्यामुळे त्यांचे छान मन रमते.
  • ९) सायकल – लहान मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे सायकलही देता येते. सायकल चालवण्यामुळे त्यांचा खूप चांगला व्यायामदेखील होतो.
  • १०) बुद्धिबळ/चेस – मुले थोडी मोठी असतील तर बुद्धिबळ हा सर्वात चांगला गेम आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते. त्यांची विचारशक्ती वाढते.

महत्वाच्या टिप्स: | toys for kids in Marathi

  • १) मुलांना खेळणी देतांना त्यांना काही इजा तर होत नाही ना याची काळजी घ्यावी. इजा पोचणारी खेळणी त्यांना देऊ नयेत. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करणे खूप महत्वाचे आहे.
  • २) मुले जर खेळणी तोडफोड करत असतील तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगावे.
  • ३) लहान मुलांवर वाईट परिणाम होईल अशी खेळणी घेणे टाळा.
  • ४) मोबाइलवर गेम लावून देणे ,टीव्हीवर गेम लावून देणे टाळा.
  • ५) मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करा.
  • ६) लहान मुलांना कोणतीही वस्तू तोंडात टाकायची खूप वाईट सवय असते. त्यामुळे त्यांना खेळणी दिल्यावर ते तोंडात तर टाकत नाहीत ना याकडे विशेष लक्ष द्या.
  • ७) शक्यतो लहान मुलांच्या कल्पेकतेला वाव मिळेल अशी खेळणीच त्यांना द्यावीत.

महत्वाची प्रश्नोत्तरे (Frequently Asked Questions)

मुलांना खेळणी देताना कोणती काळजी घ्यावी लागते?

लहान मुलांना खेळणी देताना त्यामुळे त्यांना काही इजा तर होत नाही ना याची काळजी घ्यावी लागते. तसेच त्यांचा बौद्धिक विकास होईल अशी उपयुक्त खेळणी त्यांना द्यावी.

मुलांबरोबर मोठ्यांनीही खेळणे गरजेचे आहे का?

लहान मुले नक्की काय करत आहेत हे पाहण्यासाठी ते खेळत असताना कोणतीही मोठी व्यक्ती त्यांच्याबरोबर असणे गरजेचे आहे. तसेच मुलांना एनकरेज करणे देखील गरजेचे आहे. मुलांनी एखादी गोष्ट करून दाखवली तर त्यांच्यासाठी क्लॅप क्लॅप करणे किंवा त्यांना खूप छान केले आहे असे म्हणणे गरजेचे आहे.

लहान मुलांची खेळणी आहेत खूपच छानछान

ऐकून टवकारले ना तुमचे सगळ्यांचे इकडे कान

मुलांबरोबर तुम्हीही एकदा खेळून बघा

त्यातच तुमचेही लहानपण अनुभवा

मुलांबरोबर खेळण्याची मजाच न्यारी

लहान मुले तर सर्वानाच प्यारी

तर आज मी तुम्हाला Lahan mulanchi khelni या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली आहे मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

Angai geet in marathi In 2022|मराठी अंगाई गीत

lahan mulanchi khelni – Puzzles for kids! Learning Toys

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment