Parents Habits That make your child Timid In Marathi | आई वडिलांच्या या सवयी मुलांना करतात नकळत घाबरट

Parents Habits That make your child Timid In Marathi | आई वडिलांच्या या सवयी मुलांना करतात नकळत घाबरट

Parents Habits That make your child Timid In Marathi । आई वडिलांच्या या सवयी मुलांना करतात अधीन, तुम्ही देखील नकळत चूक करत आहात का?

Habits That make your child shy In marathi   : असे म्हणतात की मुलांचा व्यवहार, त्यांचा बोलण्याचा प्रकार आणि त्यांचा स्वभाव या सर्व गोष्टी घरातूनच सुरू होतात. सर्वच पालकांना असे वाटते की त्यांचे मुल हे हुशार, आत्मविश्वास असणारे आणि आत्मनिर्भर असावे. याशिवाय सर्वच मुलाचे वागणे हे वेगवेगळे असते. प्रत्येक मुलाच्या क्षमता देखील वेगवेगळ्या असतात. असे यामुळे होते कारण प्रत्येक पालकाची पालकत्वाची जबाबदारी ही वेगवेगळी असते. काही पालक हे असे असतात जे नकळत आपल्या मुलांना अधीन बनवत जातात. खरतर याच्या पाठीमागे नक्की पालक मुलाच्या बाबतीत कसे वागतात या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथे अमही तुम्हाला काही सवयी सांगणार आहोत ज्या तुम्ही देखील जाणून घ्या. जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्ही तर या चुका करत नाहीत ना? (how to boost kids confidence in marathi, habits that makes out kid shy in marathi, parents habits that makes baby scared, how to increase kids courage in marathi, लहान मुलांची भीती कशी घालवावी, मुलांमधील आत्मविश्वास कसा वाढवावा, पालकांच्या या सवयीनमुळे मुलांचा होतो आत्मविशास कमी, parents habits that lower the kids confidence in marathi, पालकांच्या अश्या वागण्याने मुले होतात घाबरट आणि लाजाळू , how to make your kids brilliant in marathi)

 

Parents Should Avoid This Things With Kids In Marathi । पालकांनी या गोष्टी मुलांच्या बाबतीत टाळाव्या 

 

आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल किंव्हा त्याची भीती वाढू न देता कमी करायची असेल तर आई वडिलांनी या गोष्टी मुलांसोबत करणे टाळावे कारण आई वडिलांच्या या सवयीनमुळे नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, ते हळू हळू घाबरट व लाजाळू बनतात . त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा .

 

१) खूप जास्त कठोर बनणे ( Don’t Be Too Rigid or Strict )

मुलांच्या बाबतीत कठोर बनणे योग्य आहे मात्र खूप जास्त प्रमाणात कठोरता दाखविणे देखील चुकीचे आहे. जेव्हा पालक मुलांच्या बाबतीत अधिक कठोर असतात तेव्हा मुलांच्या मनात पालका विषयी भीती निर्माण होते. ही भीती त्यांच्या मनात इतकी खोलवर रुजून बसते की ते त्यांचे मत इतरांसमोर देखील बोलण्यास घाबरतात. जर वेळ शिल्लक असताना पालकांनी आपल्या मुलांच्या मनातील ही भीती ओळखली नाही तर कदचित तुमचे मुल हे इतर मुलांप्रमाणे सुखी आणि आत्मविश्वासाने जगू शकणार नाही. त्याचा विकास देखील तिथे खुंटित होईल.

 

२) मुलांना मारणे (Don’t Beat Kids)

मुलांना मारणे हे कधीच कोणत्याही समस्येचे उत्तर नसते. मुले जर काहीतरी चुकीचे वागत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे की तुम्ही जे करतात ते चुकीचे आहे. हे सर्वाँना माहीत असून देखील अनेक पालक असे असतात की जे मुलांना प्रत्येक छोट्या गोष्टींवर देखील मारण्यास सुरुवात करतात. मुलांना मारल्याने त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खालावतो. जेव्हा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा त्याच्या मनात भीती बसून राहते. त्याला प्रत्येक वेळी असे वाटते की तो हे काही करतोय ते चुकीचे आहे. सगळ्या पालकांसाठी गरजेचे असते की त्यांनी मुलांना न मारता त्यांच्यासोबत चर्चा करा आणि समस्या सोडवा.
8 Ways to Teach Kids Self-Discipline Skills

parents habits that lower the kids confidence in marathi
parents habits that lower the kids confidence in marathi

 

३) इतर मुलांसोबत तुलना करणे ( Don’t Compare With Other Kids )

ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक पालक करत असतो. ही एक अशी सवय आहे जी आपल्या मुलांमध्ये इतर मुलांविषयी इर्षा, हिंसा आणि द्वेष निर्माण करत असते. याशिवाय प्रत्येक वेळी इतर मुलांसोबत आपल्या मुलाची तुलना केल्याने आपली मुले नवीन काहीतरी सुरू करण्यापूर्वीच थांबवता. त्यामुळे असे करणे योग्य नाही. लक्षात ठेवा की मुल असल्याचा अर्थ असा की खूप खोडसाळपणा आणि नवीन नवीन काहीतरी प्रघलभता! जर तुमच्या या सवयी मुळे जर मुले नवीन काहीतरी कल्पना करण्याची क्षमता घालवत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्याविषयी भीती कायम राहील आणि पुढे जाण्यासाठी प्रगतीसाठी अडथळा येईल. त्यामुळे तुमच्या या सवयींमध्ये सुधारणा नक्की करा

 

४) प्रेरणा न देणे ( Encourage Your Kids )

सध्याच्या काळात ही गोष्ट मोठ्या प्रमाणत बघितली जाते आहे की पालक आपल्या मुलांकडून काहीतरी करून घेण्यासाठी कुठल्याही स्थरावर जातात. मात्र यामध्ये ते एक गोष्ट विसरतात ती म्हणजे मुलांना प्रेरणा देणे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही मुलांना प्रेरणा देत नसाल तर मुलांच्या मनावर त्याचा घाव बसतो. जर तुम्ही मुलांच्या मनावर प्रत्येक वेळी घाव घालणार असाल तर ते मुल कधीच स्वताला सिद्ध करू शकणार नाहीत. जर ते त्यांचा पूर्णपणे समर्पण देऊ शकणार नसतील तर इतरांपेक्षा पिछाडीवर असलेलं ते स्वताला समजतील. इतरांपेक्षा मागे असणे आणि नाकर्तेपणा मुलांना अधीन बनवत जातात. जर तुम्हाला वाटत नसेल की मुलाने अधीन व्हावे तर त्याला सतत प्रेरणा देत रहा.

जर तुम्हाला वाटत असेल तुमचे मुलं देखील आत्मविश्वासाने या जगात वावरावे, तुमचे सर्व काही ऐकावे तर नक्की वरील गोष्टी टाळाव्या. मुलांना शिस्त लावायचे अजून अनेक पर्याय आहेत ते तुम्ही नक्की वापरू शकता .
नक्की वाचा: तुमच्या बाळाला लवकर शिस्त लावण्याचे 5 मार्ग

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment