5 Months Old Baby Milestones In Marathi || 5 महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे आणि काळजी

5 Months Old Baby Milestones In Marathi || 5 महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे आणि काळजी

5 Months Old Baby Milestones In Marathi बाळाच्या वाढीत 5 वा महिना हा बाळात होणाऱ्या अनेक बदलांचा साक्षीदार असतो. तुमचे पाच महिन्याचे बाळ हे बडबड करायला सुरुवात करत असते आणि त्यासोबतच बाळ रांगायला देखील सुरुवात करते. पाच महिन्याचे बाळ हे जेव्हा कधी आपण त्याला उचलून घेण्यासाठी हात देतो तेव्हा ते हात वर करते. बाळ या काळात जास्त काळ झोपते. बाळाच्या आहारात आता घन पदार्थ आपण देऊ शकतो. बाळ एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रोलिंग करत जाण्याचा प्रयत्न करते. बाळ 5 वर्षाचे बाळ हे तुम्हाला अनेक अशा गोष्टी करताना दिसेल ज्यांनी तुम्हाला आश्चर्य होईल. बाळाच्या वागण्यात एक सातत्य असल्याचे आपल्याला दिसेल. आता आपण जाणून घेऊयात की आपण या बाळाच्या वाढीच्या टप्प्यात नक्की कोणत्या अपेक्षा ठेऊ शकतो. ( 5 months baby milestones in marathi, 5 month baby growth chart in marathi, 5 month baby development in marathi, 5 month baby activities in marathi, baby brain development activity in marathi, 5 month baby care in marathi, 5 month baby toys in marathi, 5 mahinyachya balachi kalagi, 5 mahinyachya balacha vikas)

 

5 महिन्यांच्या बाळाच्या विकासातील महत्वाचे टप्पे | 5 months Old Baby Developing Stages In Marathi

 

खाली दिलेल्या तक्त्या मधून आपण 5 महिन्यांच्या बाळाचे साध्य केलेलं आणि पुढील काळात घडणाऱ्या टप्प्यांची माहिती दर्शविते,

गाठलेले टप्पे (Achieved Stages) पुढील काळात गाठता येणारे टप्पे
 

आधाराने बसते

स्वतः हुन बसू शकते कोणत्याही आधाराशिवाय
 

आवाजाला प्रतिसाद देते

स्वताच्या नावाला प्रतिसाद देते
 

ओळखीचे चेहरे ओळखते

ओळखीच्या लोकांना प्रतिसाद देखील द्यायला सुरुवात करते
 

स्थिर वस्तुंविषयी आकर्षण

हलणाऱ्या वस्तुंच्या बाजूने डोळ्यांची हालचाल करते
 

पोटावर बाळाला टाकल्यास पाय वाकवते

उभे पकडले असता पायांवर भर देण्यास सुरुवात करते
 

तोंडातून काही स्वर काढते

एक सारखेच आवाज पुन्हा पुन्हा काढते
 

पाठीवर टाकले असता पुन्हा पोटावर पलटी होते

पाठीवरून आणि पोटावर आणि विरुद्ध पलटी घेणे
 

काही हावभाव दाखवून व्यक्त होण्यासाठी प्रयत्न करते

हावभाव सोबत आता बाळ काही आवाज देखील काढते.
 

आता बाळाची जीभ चवीसाठी तयार होत असते.

6 महिन्यानंतर बाळ वेगवेगळ्या चवीना प्रतिसाद द्यायला सुरुवात करते.
 

काही प्रयोग करून साध्या गोष्टी आणि त्यांचे परिणाम जाणून घेते.

कठीण कार्य आणि त्यांचे होणारे परिणाम जाणून घेत.

 

 

5 महिन्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे कोणते आहेत?

खाली काही 5 महिन्यांच्या बाळाच्या विकासातील महत्वाची टप्पे देत आहोत.

 1. शारीरिक विकास / मोटर स्किल्स – Physical Development Of 5 Months Old Baby In Marathi

  Physical Development Of 5 Months Old Baby In Marathi
  Physical Development Of 5 Months Old Baby In Marathi
 • वस्तुनपर्यंत पोहोचते –
  आता तुमच्या बाळाला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पकड बनविता येते. बाळ त्या वस्तू पर्यंत सहज पोहचते आणि ती वस्तू योग्य प्रकारे पकडते देखील. बाळाला दूध देण्यासाठी वापरत असलेली बाटली ते स्वतः पकडू शकते.
 • उभे पकडले असता दोन्ही पायांवर जोर देते –
  बाळ उभे पकडले असल्यानंतर दोन्ही पायांवर जोर देते. जमिनीवर पकडल्यानंतर ते त्या जागेवर पाय घट्ट रोवन्यासाठी प्रयत्नशील असते. गुडघा स्थिर ठेवून आणि सैल सोडून बाळ जागेवर उड्या मारण्यासारख्या हालचाली करते.
 • दोन्ही प्रकारे रोलिंग करते –
  5 महिन्यांपर्यंत बाळ हे पाठीवर ठेवले असता रोलिंग करून पुन्हा पोटावर येते. आता बाळ उलटे देखील करू शकते आणि त्यासाठी ते लोळणे आणि पलटने करते.
 • आधाराने बसते –
  5 महिन्यांचे बाळ हे आता आधाराने बसू शकते. काही काळात बाळ कोणताही आधार न घेता उभे राहू शकते.
 • अंतर आणि रंग जाणून घेण्यासाठी त्यांची नजर सुधारते –
  तुमच्या बाळाला 5 व्या महिन्यात अंतर समजून घेता येते. फक्त रंग ओळखणे नाही तर रंगाच्या छटा मधील बदल देखील बाळाला समजते.
 • स्नायू मधील समन्वय सुधारतो –
  तुमच्या बाळाच्या वाढीत खाली पोटावर ठेवले असता ते कोपर वर जोर देऊन छाती वर करण्याचा प्रयत्न करतात. बाळ आणि वस्तू यात असलेले अंतर ते समजून घेऊन बाळ हात पुढे करून स्नायु ला त्रास देऊन ते उचलते आणि त्याला खेचून घेते.

 

2. संज्ञात्मक विकासात्मक टप्पे – Cognitive Development Milestone Of 5 Months Old Baby In marathi

 

 • हलणाऱ्या वस्तुंचा मागोवा घेणे
  5 महिन्यांचे बाळ हे हलणाऱ्या वस्तू आणि लोकांचा मागोवा घेण्यासाठी सुरुवात करते.
 • अर्धवट लपलेल्या वस्तू शोधते –
  जेव्हा कधी आपण आपला चेहरा एखाद्या वस्तूच्या मागे लपवत असतो तेव्हा बाळ ती वस्तू बाजूला करून आपल्याला बघेल. बाळाला हे समजायला लागते की त्याच्या नजरेच्या पलीकडे देखील वस्तू आहेत. बाळाला शोध घेणारे खेळ देखील आवडायला लागतात.
 • नाही म्हणल्यास त्याला प्रतिसाद देते –
  तुमच्या 5 महिन्यांच्या बाळाला नाही म्हणल्यास ते समजण्यास सुरुवात होते आणि ते त्यावर प्रतिक्रिया देखील देते.
 • कारण आणि परिणाम यांच्या चाचण्या घेते –
  एखादी गोष्ट केल्यानंतर मागे घडलेली गोष्ट पुन्हा घडते का हे बघण्यासाठी पुन्हा करून बघते. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या वेळी बाळाला एखाद्या खेळणी मधून आवाज येत असेल तर त्या खेळणीला पुन्हा हलवून तो आवाज येतो का हे बघण्यासाठी प्रयत्न करते.
 • वस्तू आणि लोक यांच्याकडे उत्सुक्तने बघते –
  आता बाळ वस्तू आणि लोकांकडे आकर्षित होऊन त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहते.
 • सहज लक्ष विचलित होते आणि नवीन वस्तुंकडे लवकर आकर्षित होते –
  बाळ लवकरच नवीन वस्तूंनी मोहित होते. त्यामुळे लक्ष विचलित होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
 • रात्री जास्त काळ झोपते –
  5 महिन्यांच्या वयात बाळ खूप जास्त झोपते. विशेषतः रात्री त्याची झोप वाढते.

 

3. सामाजिक आणि भावनिक विकासात्मक टप्पे – Social and Emotional Developmental Milestones Of 5 Months Old Baby In Marathi

 • इतर लोकांच्या भावनाना प्रतिसाद देते –
  तुम्ही जर बाळाला हळुवार पने गुदगुल्या करत असाल किंवा मजेशीर हावभाव तुमच्या चेहऱ्यावर दाखवत असाल तर बाळ आनंदी होऊन हावभाव दाखवेल किंवा हसेल आवाज करेल.
 • तुमच्या आवाजाच्या टोन वरून भावना ओळखू शकतात –
  बाळ कदाचित तुमच्या आवाजाच्या टोन अनुसार तुमची भावना जाणून घ्यायला सुरुवात करेल. आपला जोरदार आवाज हा बाळाला समजून येईल की तुम्ही चिडलेला आहात. बाळा सोबत शांत आवाजात बोलल्यास बाळ देखील शांत होईल.
 • स्वतःचे प्रतिबिंब बघणे आवडते –
  बाळाला स्वतःचे प्रतिबिंब बघणे आवडते.
 • आनंदी असणे –
  बाळाला 5 महिने वयात आनंद दर्शविणे ही सर्वात महत्वाची आणि पहिली भावना येते.
 • पालकांसोबत खेळायला आवडते –
  बाळाला पालकांच्या सोबत खेळायला आवडते त्यामुळे पालकांनी या काळात बाळाला वेळ द्यावा.

 

4. संप्रेषण कौशल्य – Communication skills Development in 5 Months Old Baby In Marathi

 • स्वतःच्या नावाला प्रतिसाद देणे –
  5 व्या महिण्यापर्यंत बाळाचे संवाद कौशल्य सुधारलेले असते. बाळ या काळात तुम्ही त्याचे नाव घेतले ना तर ते मान वळवून प्रतिसाद देईल.
 • काहीतरी आवाज करून आवाजाला ते प्रतिसाद देते –
  आपण जर बाळाशी बोलतो तर बाळ त्यावर काहीतरी बडबड करून प्रतिसाद देत असते. बाळ अशा प्रकारे हावभाव देते की जसे ते आपल्याशी गप्पा मारत असते.
 • आनंद आणि नाराजी दाखविण्यासाठी आवाज वापरते –
  बाळ आवाजातून भावना दर्शविण्यासाठी सुरुवात करते. आनंद व्यक्त करण्यासाठी बाळ ओरडते तर रडून नाराजी दाखवीत असते.
 • काही व्यंजन सलग बोलते –
  जसे की दा दा किंवा म म म अशा प्रकारे काही व्यंजन बाळ सतत बोलत असते.

 

5. संवेदना – Senses Of 5 Months Old Baby In Marathi

 • चवीची भावना –
  आपले जवळपास खूप सारे मज्जातंतू हे जिभेत येऊन संपता आणि त्यामुळे बाळ प्रत्येक गोष्ट ही तोंडात किंवा तोंडाजवळ घेऊन ती बघते. बाळाची चव ही 5 व्या महिन्यापासून सुधारत चालते.
 • रंगांमध्ये फरक करू शकते –
  बाळाकडे आता 5 व्या महिन्यात पूर्ण रंगाची दृष्टी आलेली असते. बाळ रंग आणि त्यांच्या छटा यामध्ये फरक करत असते.
 • ऐकणे सुधारते – 
  5 महिन्यांच्या बाळाची ऐकण्याची क्षमता चांगली असते आणि त्यामुळे ते आवाजाकडे लगेच डोके वळवून बघते.
 • प्रत्येक गोष्टीला स्पर्श आणि चव घेण्याचा प्रयत्न करणे –
  बाळ 5 महिन्यांचे असताना ते वस्तुना स्पर्श करण्यास, पकडण्यास आणि चव घेण्यास प्रगतशील असते. त्यामुळे त्याच्या सर्व वस्तू जसे की खेळणी आणि कपडे हे स्वच्छ आणि फुटतील असे नसावे. त्यासोबतच वस्तू इतक्या छोट्या नसाव्यात की त्या तोंडात गेल्यास गळ्यात अडकून बसतील.

 

काळजी करण्याची गरज केव्हा आहे? When to be worried?

5 महिन्यांच्या बाळाच्या वयात खालीलपैकी कोणतीही समस्या तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

 • आवाजांना प्रतिसाद देत नाही –
  बाळाला आवाज दिला असता जर ते त्यावर प्रतिक्रिया देत नसेल किंवा डोकं वळवत नसेल तर यातून ऐकण्याची समस्या असू शकते हे जाणवते.
 • पकड आणि हात नियंत्रण सैल असणे –
  बाळ जर जास्तच सुस्त असेल आणि त्याची पकड खूपच खराब असेल तर या गोष्टी बाळाच्या विकासात असलेल्या समस्या दाखवत असते.
 • पालकां विषयी आकर्षण न दाखविणे –
  ही गोष्ट संज्ञात्मक विकासात होणारे प्रोब्लेम दाखविता. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला लवकर घेणे गरजेचे असते.
 • बाळ खूप शांत आहे किंवा जास्त बडबड देखील करत नाही –
  हे बोलण्यात प्रोब्लेम असल्याचे लक्षण आहे.
 • एकाच हाताने वस्तूंपर्यंत पोहोचते –
  विकासात होणाऱ्या विलंबाने हे एक लक्षण आहे.
 • रात्रभर बाळ रडते किंवा हसतच नाही –
  हे देखील विकासात होणाऱ्या विलंबाचे लक्षण आहे. त्यामुळे वरील गोष्टी जाणवत असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
  Is Speech Therapy Right For Your Toddler?

 

तुमच्या बाळाला वयाच्या 5 महिन्यांपर्यंत मोठे टप्पे गाठण्यात मदत करण्यासाठी काही टिप्स – How to Help your Kid to Developed The Skills In Marathi

 • बाळासोबत खेळ खेळा आणि तुमच्या बाळाशी बोला –
  या गोष्टींमुळे बाळाला बोलणे आणि संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी मदत होत असते.
 • बाळाला टम्मी टाईम द्या –
  बाळाला पोटावर ठेवल्यास त्याची मान, पाठ आणि हातचे स्नायु मजबूत होण्यास मदत होईल. या स्थिती मध्ये बाळ कोपराला जोर देऊन डोके आणि मान वर करत असते. ही गोष्ट बाळाची दृष्टी विकसित होण्यासाठी मदत करेल. बाळ डोकं वर करून दूरच्या वस्तू बघत असते.
 • खेळणी बाळाच्या पोहचच्या पुढे ठेवा –
  बाळाचा हात आणि डोळे यांचे समन्वय सुधारण्यासाठी ही गोष्ट उपयुक्त ठरेल.
 • बाळाच्या समोर चमकदार आणि चित्र असलेली पुस्तके द्या –
  5 वर्ष वयाच्या मुलाची दृष्टी आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करेल. बाळ ती चित्रे पाहण्यात मग्न होते आणि त्यानुसार कथा सांगण्यासाठी काहीतरी बडबड सुरू होईल.
 • बाळाला चमकदार रंगाची खेळणी आणि मनोरंजक आवाज देणारी काही खेळणी द्या –
  या गोष्टींनी बाळाचे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता सुधारेल. त्यासोबत बाळाच्या हालचाली सुधारण्यास देखील मदत होईल.
 • तुमच्या बाळासाठी संगीत वाजवा आणि गाणे गा –
  लहान बाळांना सुमधुर संगीताने आनंद मिळतो. त्याला ते संगीत कदाचित आवडेल आणि ते संगीत बाळ देखील गुणगुनाण्याचा प्रयत्न करेल. बाळाचं आनंद दर्शविण्याचा प्रयत्न म्हणजे टाळ्या वाजविणे किंवा हसणे होय.
 • बाळाला नवीन व्यक्तींसोबत भेटू द्या –
  ही गोष्ट बाळाचे संज्ञात्मक विकास आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी मदत करेल.
 • बाळाला आधार देऊन उभे राहण्यास प्रोत्साहन द्या –
  जर तुमचे बाळ स्वतः हुन बसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी बाळाला सुरुवातीला तुमच्याच मांडीचा आधार घेऊन प्रोत्साहित करत जा.

 

FAQs

5 महिन्यांच्या बाळाला अन्न देणे सुरक्षित आहे का?

तज्ञांच्या मते वयाच्या 6 महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान देण्यास सांगितलेले आहे. या काळात बाळाचे शरीर अजून विकसित झालेले नसते. 6 महिन्यांपर्यंत म्हणजे यापेक्षा कमी वयाच्या बाळाला अर्ध घन आणि घन पदार्थ पचवता येत नाहीत. त्यामुळे अन्न न देणेच सुरक्षित असते.

माझ्या 5 महिन्यांच्या बाळाला शब्द समजू शकतात का?

5 महिने वय असलेल्या बाळाला शब्द समजणे जवळपास अशक्य आहे. बाळाला तोपर्यंत स्वतः बोलता येत नाही ते बोलण्यास सुरुवात करत करत असते आणि भाषा व कृती मधून समजून घेण्यास शिकत असते. मात्र बाळाला या काळात शब्द, कृती आणि संगीत समजत असतात आणि त्यामुळे तुम्ही बाळाला याद्वारे समजून सांगू शकतात.

5 महिन्यांच्या बाळाचे आदर्श वजन किती असते?

5 महिन्याच्या बाळाचे जन्मतः असलेल्या वजनाच्या दुप्पट वजन असणे आवश्यक असते. बाळाचे वजन 500 ग्राम पर्यंत वाढू शकते. ही गोष्ट देखील आपण लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक बाळ वेगळे असते आणि त्यांच्या वाढीत देखील बदल असतात. 5 महिन्यांच्या काळात बाळाचे वजन हे सरासरी वजन पेक्षा थोडेफार कमी किंवा जास्त असणे अगदी ठील आहे. त्यामुळे यात जास्त काळजी करण्याची गरज नाही.

लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ हे वेगळे असते. त्यामुळे त्यांच्या विकासाची गती देखील बदलत असते. एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या बाळाची विकसित स्थिती ही त्याच्या मागील काळातील वाढी सोबत देखील सबंधित आहे. दुसरा 5 महिन्यांचा बाळ जर हे करते आहे तर माझ्या बाळाने पण हे करावे अशी आशा ठेवू नका. आपल्या बाळाला काहीही करण्यास भाग पाडू नका. तुमच्या बाळाला स्वताहून त्याच्या विकासाचे टप्पे गाठू द्या. बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा आणि समस्या गंभीर जाणवत असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
4 Months Old baby Milestones Chart In Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment