5 Signs That Your Child Is Mentally Healthy And Strong In Marathi | आपले मूल मानसिक दृष्ट्या निरोगी आणि मजबूत असल्याचे 5 लक्षणे

5 Signs That Your Child Is Mentally Healthy And Strong In Marathi | आपले मूल मानसिक दृष्ट्या निरोगी आणि मजबूत असल्याचे 5 लक्षणे

 

5 Signs That Your Child Is Mentally Healthy And Strong In Marathi जीवनात जे लोक यशस्वी असतात ते आधी मानसिक दृष्ट्या खूप मजबूत असतात. त्यांच्यामध्ये काही तरी करून दाखविण्याची धमक असते. असे लोक कठीण प्रसंगी घाबरत नाही. यांच्यामध्ये कोणतेही कठीण काम स्वतः वर घेण्याची क्षमता असते. ते अनेक जोखमीचे प्रसंग देखील कठीण काळासोबत अगदी हसत पूर्ण करतात. प्रत्येक पालकांना वाटते की आपले मुल हे मानसिक दृष्ट्या अधिकाधिक सक्षम असावे. जसे की प्रत्येकाचे आरोग्य हे एक सारखे नसते अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाची मानसिक क्षमता देखील वेगवगळी असते. काही मुले ही मानसिक दृष्ट्या अधिक मजबूत असतात तर काही मुले मानसिक दृष्ट्या खूप दुर्बल असतात. असे काही संकेत आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊ शकतो की आपले मुल मानसिक दृष्ट्या मजबूत आहे किंवा नाही. चला तर मग हे निर्देश जाणून घेऊयात. (Signs of Mentally Strong Kids In Marathi, how to make your child mentally strong in marathi, how to make your child brilliant in marathi )

 

1. कधीच हार मानत नाही ( Never gives up )

जर तुमचे मुल हे कठीण प्रसंगात आणि खूप वाईट काळात सुद्धा हार मानत नसेल तर समजून जा की त्याची आंतरिक शक्ती खूप जास्त बलवान आहे. ज्या मुलांची आंतरिक शक्ती म्हणजेच विल पॉवर किंवा इच्छा शक्ती अगदी मजबूत आहे ती मुले मानसिक दृष्ट्या सक्षम असतात. ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा मुलाच्या आयुष्यात काहीतरी अडचणी असतील किंवा त्याचे आरोग्य चांगले नसेल.

 

2. मुलामध्ये सहनशक्ती आहे ( The child has endurance )

मुलामध्ये जर सहनशक्ती असेल तर समजून की तो मानसिक दृष्ट्या खूप सक्षम आहे. कोणत्याही वाईट प्रसंगातून किंवा काळातून बाहेर येण्यासाठी सहनशक्ती कामी येते. अभ्यासात अपयश आल्यानंतर अनेक मुल ही निराश होऊन जातात. तर काही मुले ही सहनशक्ती टिकून ठेवतात आणि पुन्हा त्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतात. हेच लक्षण आहे जे सांगते की तुमचे मूल हे प्रयत्न करण्यापासून कधीच थांबणार नाही.
A Parent’s Guide to Age-Appropriate Discipline

 

3. पुढील पाऊल टाकण्यासाठी एकदा विचार करणे ( Thinking once to take the next step )

जर तुमचे मुल काहीतरी निर्णय घेत असताना आधी काही काळ विचार करत असेल तर काळजी करू नका. हे देखील मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे लक्षण आहे. जे मुल मानसिक दृष्ट्या सक्षम असतात त्यांना त्यांचे पुढील पाऊल हे ठाऊक असते. मानसिक दृष्ट्या मजबूत असलेली मुले ही आपल्यासाठी पुढे काहीही निर्णय घेत असताना त्याविषयी आधी खूप विचार करतात. त्यांना निर्णय घेण्यासाठी कदाचित खूप वेळ लागेल मात्र ते योग्यच निर्णय घेतात.

4. मुलं तक्रार करत नाही ( Children That don’t complain )

जी मुले मानसिक दृष्ट्या सक्षम असतात ती प्रत्येक गोष्टीवर कधीच तक्रार करत नाही. त्यांना प्रत्येक संकटाचा उभ राहून सामना करण्याची सवय झालेली असते. अशी मुले आपल्यासाठी काही तरी नवीन मार्ग नक्कीच शोधत असतात. मानसिक दृष्ट्या सक्षम असणारी मुले ही हट्टी नसतात. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्यांच्यासाठी ती मुले कधीच हट्ट करत नाही.

 

५. स्वतःचे निर्णय मुले स्वतः घेतात ( Children make their own decisions )

जर तुमचे मुल हे स्वतःचे निर्णय स्वतः घेत असेल तर समजून घ्या की तुमचे मुल हे मानसिक दृष्ट्या खूप सक्षम आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम असल्यानंतर इतकी तर समज प्रत्येकाला येते की ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. तर काही मुले ही वेळेच्या आधीच भावना समजून घेतात आणि स्वतःच्या मनाच्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवतात.

 

या 5 लक्षणां वरून समजते की तुमचे मुल हे मानसिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही.
आई वडिलांच्या या सवयी मुलांना करतात नकळत घाबरट

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment