Dohale jevan information in marathi In 2024 | डोहाळजेवण म्हणजे काय? | Baby shower in marathi

Dohale jevan information in marathi | डोहाळजेवण म्हणजे काय?

What is Dolahe Jewan in Marathi? | Baby shower Meaning in Marathi

डोहाळजेवण म्हणजे पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम. डोहाळजेवणालाच ‘ओटी भरणे‘ असेही म्हणतात. आज मी तुम्हाला या लेखातून डोहाळजेवणाची संपूर्ण माहिती(Dohale jevan Information In Marathi ) थोडक्यात सांगणार आहे.आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी हा दिवस अतिशय खास असतो. यादिवशी कुटुंबातील नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना बोलावले जाते. आपल्या इच्छेनुसार किंवा ऐपतीप्रमाणे छोटामोठा समारंभ केला जातो.डोहाळजेवणाचा कार्यक्रम हा सातव्या महिन्यात केला जातो.

डोहाळे जेवण करण्याचे शास्त्रीय कारण | Scientific Reason of Dohale Jevan In Marathi 

सर्वसाधारणपणे डोहाळजेवण हे सातव्या महिन्यात केले जाते .याचे मुख्य कारण म्हणजे यानंतर प्रत्येक गर्भवती महिलेला संपूर्ण विश्रांतीची गरज असते.पूर्वीच्या काळी डोहाळजेवण झाल्यावर गर्भवती स्त्रियांना माहेरी पाठवण्याची प्रथा होती.आजही बरेच जण ही प्रथा पाळतात. परंतु हल्ली बऱ्याच स्त्रिया या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ही प्रथा पाळतात किंवा पाळत नाहीत. पूर्वी महिलांना आराम मिळत नसे,त्यामुळे ही पद्धत होती.

याशिवाय दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पूर्वी महिलांना हवे तितके खायला मिळत नसे आणि हल्ली ज्याप्रमाणे महिलांचे लाड केले जातात तसे पूर्वीच्या काळी केले जात नव्हते. त्यामुळेच त्यांचे डोहाळे पुरविण्याची आणि त्यांना हवं नको ते पाहण्याची ही प्रथा होती. तसेच बाळाचे आरोग्य उत्तम राहावे त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा डोहाळजेवणाचा विधी करण्यात येत असे. काही ठिकाणी यासाठी विशेष पूजाअर्चा करण्याची पद्धत देखील आहे.डोहाळजेवण झाल्यावर गर्भवती महिलेला माहेरी पाठवले जात असे आणि बाळ झाल्यावर ते चांगले दोन ते तीन महिन्यांचे झाल्यावर मगच तिला सासरी परत आणत असत.

डोहाळे जेवणाचा विधी करण्याची पद्धत | Dohale jevan Vidhi in Marathi

आपणा सर्वांना हे तर माहीतच आहे की डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती महिलेची ओटी भरली जाते. हा कार्यक्रम आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी केला जातो. ज्या स्त्रीचे डोहाळजेवण करायचे आहे तिच्यासाठी एक विशिष्ट असं एक आसन तयार केले जाते. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर कमळाचे फुल बनवले जाते किंवा चंद्र बनवला जातो किंवा होडी बनवली जाते किंवा अगदी काहीच शक्य नसेल तर त्या गर्भवती स्त्रीची खुर्ची फुलांनी छान सजवली जाते. डोहाळजेवणाचा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे तिच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो.
साधारणतः आपल्याला डोहाळे जेवणाला केलेली सजावट आणि फुलांच्या बाणाने सजलेली महिला अथवा चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला याबाबत माहिती असते. पण नक्की हा काय विधी असतो जाणून घेऊया.

ओटी भरण्याचा कार्यक्रम:

गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची विशिष्ट प्रकारे सजावट करण्यात येते. यादिवशी ज्या महिलेचे डोहाळजेवण आहे ती गर्भवती स्त्री हिरव्या रंगाची साडी नेसते आणि या गर्भवती महिलेसाठी विशिष्ट असे फुलांचे दागिने किंवा आर्टीफिशिअल दागिने तयार केले जातात. सौभाग्यवती महिला या सदर महिलेची ओटी भरतात. हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि पाच फळे ही ओटी महिलेची सासू भरते आणि त्यानंतर अन्य जमलेल्या महिला गर्भवती महिलेची ओटी भरतात.

फोटोशूट | Baby shower in Marathi

ओटी भरून झाल्यावर सर्व महिलांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे फोटोशूट. हल्लीच्या जमान्यात वेगवेगळ्या पोझेस देऊन फोटो काढणे आणि स्टेटस ठेवणे याला जास्त महत्व आले आहे. गर्भवती महिला धनुष्य बाण हातात घेतात आणि नवऱ्याबरोबर वेगवेगळ्या पोझेस देऊन फोटो काढतात.

पेढा आणि बर्फी:(Pedha And Barfi)

डोहाळजेवणातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पेढा किंवा बर्फीची वाटी उचलणे. ही पद्धत देखील फार पूर्वीपासूनच आहे. यासाठी दोन वाट्या ठेवल्या जातात. एका वाटीमध्ये पेढा आणि दुसऱ्या वाटीमध्ये बर्फी ठेवली जाते. नंतर गर्भवती महिलेला यापैकी कोणतीही एक वाटी उचलण्याचा सल्ला दिला जातो. जर तिने पेढा उचलला तर मुलगा होणार आणि बर्फी उचलली तर मुलगी होणार असे मानण्यात येते. खरं तर एक मजा म्हणून हा कार्यक्रम करण्याची पद्धत आहे.

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे) 

ज्याप्रमाणे आपण लग्न,मुंज किंवा बारसे यासाठी जसे मुहूर्त बघतो तसे डोहाळजेवणासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता असते का?

डोहाळजेवणासाठी मुहूर्त बघण्याची फारशी आवश्यकता नसते,तुम्ही आपल्या सोयीनुसार सातवा महिना सुरु झाल्यावर आणि आठवा महिना लागण्यापूर्वी केव्हाही स्त्रीचे डोहाळजेवण करू शकता. परंतु जर तुम्हाला मुहुर्त बघण्याची इच्छा असेल तर चांगला मुहूर्त बघून डोहाळजेवण करण्यास देखील काहीच हरकत नसते.

डोहाळजेवण करण्यासाठी गुरुजी बोलावण्याची आवश्यकता असते का?

नाही,डोहाळजेवण करताना विशिष्ट असे मंत्रोपचार करून कोणतेही विधी केले जात नाहीत. त्यामुळे गुरुजींना बोलावण्याची आवश्यकता नसते. यामध्ये सर्व सवाष्ण महिला गर्भवती महिलेची ओटी भरतात.

डोहाळजेवणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

डोहाळजेवणाला इंग्रजीमध्ये Baby Shower असे म्हणतात.

डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan ukhane in marathi

लवकरच होईल बाळराजांचें आगमन
….च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

बाळराजाच्या आगमनाची लागत आहे चाहूल
…च नाव घेते लवकर पडणार आहे घरी बाळाचे पहिले पाऊल

आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी,
________ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

फुलांचा सुगंध, दरवळलाय अंगणाशी,
_____ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

आजच्या कार्यक्रमासाठी, महिलांनी केला आहे साज,
______ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज.

मी केलेली एक छोटीशी कविता | Dohale jevan Kavita in Marathi


डोहाळजेवणाचा कायक्रम म्हणजे आयुष्यातील खास क्षण
यादिवशी असे वाटते की हा तर आहे एक खूप मोठा सण ||

निवडतो आपण जेव्हा पेढा किंवा बर्फी
काहीही निवडले तरी सर्वजण होतात आनंदी ||

पुरवून घ्या तुम्ही तुमचे सर्व डोहाळे
रोज रोज थोडीच येतात असे हे खास सोहळे ||

डोहाळ जेवणाचा मेनू | Dohale jevan Menu in Marathi

डोहाळजेवणाचा मेनू तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मी इथे तुम्हाला माझ्या काही आयडियाज सांगणार आहे.

वेलकम ड्रिंक(Welcome Drink)

 • लिंबू सरबत
 • कोकम सरबत
 • कैरीचे सरबत
 • कलिंगड ज्युस
 • ऑरेंज ज्युस
 • मँगो ज्युस
 • पाईनॅपल ज्युस

यामधील तुमच्या आवडीचे वेलकम ड्रिंक तुम्ही ठेवू शकता.

जेवण्यासाठीचा असा खास बेत

 • बटाटा भाजी
 • भरले वांगे
 • भरली तोंडली
 • पोळी/पुरी/फुलका
 • कांदा-टोमॅटो-बटाटा रस्सा
 • काकडी – टॉमेटो कोशिंबीर
 • कोथिंबीर वडी
 • अळूवडी
 • पापड
 • लोणचे
 • मुगाची उसळ
 • मिक्स भजी (कांदा – बटाटा भजी)
 • वरण भात/मसालेभात/पुलाव/जिरा राईस
 • कढी/टॉमेटो सार
 • खोबऱ्याची ओली चटणी
 • असा तुमच्या आवडीप्रमाणे जेवणाचा मेनू ठरवू शकता.

Dohale jevan decoration at home

dohale jevan decoration at home
dohale jevan decoration at home

 

decoration for dohale jevan at home Marathi
decoration for dohale jevan at home Marathi

 

तर आज मी तुम्हाला Dohale jevan information in marathi (डोहाळजेवण म्हणजे काय) याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. जर तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

 • What is kegal exercise In 2022|केगल व्यायाम पद्धती

 • डोहाळे जेवण आणि त्याबद्दल माहिती

Hanuman Chalisa lyrics in Marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment