Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi in 2024 | लहान मुलांना ताप किती असावा

Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi in 2024 | लहान मुलांना ताप किती असावा

Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi: घरात लहान बाळ असले लहान मुले असली की त्यांची खूपच काळजी घ्यावी लागते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते त्यामुळे त्यांना जपणे खूप आवश्यक असते. आज मी तुम्हाला या लेखातून लहान मुलांना ताप आला तर काय घरगुती उपाय करावेत,लहान मुलांचा ताप किती असावा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi
Lahan mulanchya tapavar gharguti upay In Marathi

लहान मुलांना ताप येणे हे अगदी सामान्य आहे कारण लहान मुलांची इम्युनिटी खूप कमी असते. पण मुलांना ताप आला की आई-वडील अगदी घाबरून जातात. घरात आजी आजोबा किंवा वडीलधारी माणसे असतील तर ते काही घरगुती उपाय सांगतात परंतु ज्यांच्या घरी कोणी मोठे नसेल ते मात्र घाबरतात. म्हणूनच मी आज तुम्हाला मुलांना ताप आल्यावर पॅनिक न होता काय केले पाहिजे,डॉक्टरांकडे जावे का मुलांना टॅप येण्यामागे काय करणे असू शकतात याबद्दल माहिती सांगणार आहे.

लहान मुलांना ताप येण्यामागची महत्वाची कारणे| Important causes of fever in children 

१ज्यावेळी लहान बाळांना दात येत असतात तेव्हा त्यांना ताप येतो(Babies get fever when they are teething) –
लहान बाळांना ताप येण्यामागचे हे एक महत्वाचे कारण आहे. ज्यावेळी बाळांना दात येत असतात तेव्हा त्यांना कोणतीही खाली पडली वस्तू किंवा काहीही खायची इच्छा होते त्यामुळे त्यांच्या पोटात जर्म्स जाण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना जुलाब होणे किंवा ताप येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

२) बाळाला सर्दी झाली असेल तर त्यामुळे देखील बाळाला ताप येऊ शकतो(If a baby has a cold, it can also cause a fever)

लहान बाळांना जर सर्दी झाली असेल तर त्यांना सर्दीमुळे सर्दीचा तापदेखील येऊ शकतो.

३) लहान मुलांना व्हॅक्सिनेशन केल्यानंतर देखील ताप येऊ शकतो(Children may also get fever after vaccination)

ज्यावेळी लहान बाळांचे किंवा लहान मुलांचे व्हॅक्सिनेशन केले जाते तेव्हा त्यांना व्हॅक्सिनेशनचा ताप येऊ शकतो.

मुलांना ताप आला असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता आला होता तसेच किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गोष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. यामुळे डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. बऱ्याच वेळा तापामध्ये आराम करणेही पुरेसे असते. जर बाळ तापातसुद्धा हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल तसेच ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. तापात बाळ उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.

लहान मुलांना ताप आल्यास घरगुती उपाय | Lahan Mulanchya tapavar upay Marathi

Lahan Mulanchya tapavar upay Marathi
Lahan Mulanchya tapavar upay Marathi

 

1) हिंग(Asafoetida)

हिंग ही प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू आहे आणि हिंगामध्ये असे पाहू गुणधर्म आहेत ज्यामुळे बाळाचा ताप बरा होऊ शकतो.

लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी एक हिंगाची पट्टी घ्यावी. यासाठी तुम्हाला फक्त चिमूटभर हिंगाची आवश्यकता आहे.हिंग पट्टी लावण्यासाठी हिंगाबरोबर कागदाचा एक छोटा तुकडा आणि चमचाभर पाणी घ्यावे. एका छोट्या चमच्यात चिमूटभर हिंग टाकून थोडे पाणी टाकून घ्या. हिंग व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर एक कागदाचा तुकडा सिक्याच्या आकारात कापून घ्या. आता त्याला हिंगाच्या पाण्यात भिजवून मुलाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला लावून घ्या.यानंतर उरलेले पाणी गळ्याजवळ लावावे. थोड्या वेळाने तुम्हाला बाळाच्या किंवा तुमच्या मुलाच्या शरीराचे तापमान कमी झालेले दिसेल. जर तरीदेखील ताप बरा होत नसेल तर डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. डॉक्टर वेळीच तुमच्या मुलावर योग्य तो उपचार करतील.हा उपाय तुम्ही एक महिन्याच्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत करू शकता.

2) मिठाच्या पाण्याच्या घड्या (Salt – Water Patti)

मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवणे हा उपाय फार पूर्वीपासूनच लोक करत आहे . तसेच हा उपाय लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांसाठीसुद्धा करता येतो. हा उपाय करताना एका बाऊलमध्ये थोडे थंड पाणी घ्या. त्यानंतर त्यात चिमूटभर मीठ घाला. नंतर त्यात एक कोटटोनचा रुमाल किंवा कापड बुडवून तो पिळून घ्या आणि बाळाच्या कपाळावर ठेवा. एक मिनिटांपर्यंत ही घडी ठेवा नंतर हीच कृती पुन्हा करा,अशाप्रकारे यामुळे लहान मुलांचा ताप कमी होण्यास किंवा उतरण्यास मदत होते. अगदी डॉक्टरही हा उपाय सांगतात. परंतु याने जर मुलांचा ताप उतरत नसेल तर मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जा.

3) कांदा (Onion)

ताप उतरवण्यासाठी कांद्याचा वापरसुद्धा फार पूर्वीपासूनच केला जातो. कांद्याचा उपयोग शरीरातील हिट किंवा तापमान कमी करण्यासाठी केला जातो.
कांदा हा शरीराचे उष्ण तापमान कमी करण्यास उपयोगी ठरतो, तसेच कांद्यामुळे ताप आल्यावर आपल्याला ज्या वेदना होतात त्या कमी व्ह्ययलादेखील मदत होते. हा उपाय करताना कांद्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत आणि मुलांच्या पायांवर 2-3 तुकडे काही वेळापर्यंत ठेवावे. ताप कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकता. मोठ्या माणसांना ताप आला तरीदेखील हा उपाय करता येतो परंतु जर तरीदेखील ताप उतरत नसेल तर मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.

4) हातापायांची मालिश(Hand and foot massage)

लहान मुलांना ताप आला असेल तर त्यांच्या हातापायांची चांगली मालिश करावी,त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते. मुख्यतः पाय व तळपायाची तेलाने मालिश केल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच तापामध्ये झोप येणेसुद्धा फार कठीण होते. हात-पाय दुखत असल्यामुळे मालिश केल्यावर थोडे बरे वाटते आणि मुलांना छान झोपदेखील लागते.

5) स्पंज बाथ (Sponge Bath)

जर तुमचे बाळ लहान असेल आणि त्याला ताप आला असेल तर त्यासाठी तुम्ही स्पंज बाथचा उपयोग करून घेऊ शकता. तर थोड्या मोठ्या मुलांसाठी टबमध्ये थोडे कोमट पाणी घेऊन त्यांना स्पंजने पुसून घ्यावे किंवा त्याला पटकन अंघोळ घालावी. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

6) पंख्याचा योग्य वापर (Proper use of fan)

बऱ्याच वेळा आपण मुलाला ताप आल्यानंतर पंखा बंद करतो . अगदी जुन्या काळातील लोकसुद्धा आपल्याला पंखा बंद करण्याचा सल्ला देतात,पण असं न करता मुलांना अशा खोलीमध्ये ठेवा जी हवेशीर आणि उबदार आहे . तसेच ताप आला असेल तर पंखा अजिबात बंद करू नका. जर खूप थंडी वाजत असेल तर पंख्यांची गती थोडी कमी करा. यामुळे मुलाच्या अंगातील तापमान योग्य राहण्यास मदत होते.

Frequently Asked Questions

ताप येणे म्हणजे काय?(What is a fever?)

ताप येणे म्हणजे शरीरामध्ये बाहेरील कोणताही जिवाणू,विषाणू प्रवेश करतो. त्यावेळी आपले शरीर प्रतिकारशक्तीने त्याच्याबरोबर लढण्यासाठी तयार होते. परंतु ठराविक तापमानाच्या पुढे जर ताप असेल तर त्यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. कारण असा ताप म्हणजे कोणत्याही मोठ्या आजाराचेही लक्षण असू शकते आणि वेळीच उपचार केले नाही तर बाळाला हानीदेखील पोहोचू शकते.

लहान मुलांना वारंवार ताप का येतो?(Why do children often have fever?)

काही मुले ही जन्मतःच खूप नाजूक असतात त्यामुळे वातावरणातील थोड्याशा बदलानेही अनेकदा त्यांना ताप येतो. तसेच लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती ही कमी असते.त्यामुळे हवामानातील बदल किंवा अगदी छोटासा बदल देखील त्यांना सहन होत नाही आणि मुलांना ताप येण्याची शक्यता असते.

तर आज मी तुम्हाला लहान मुलांना ताप किती असावा(lahan mulanchya tapavar gharguti upay In marathi) याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

• oats recipes in marathi In 2022|ओट्स रेसिपी

• मुलांचा ताप व त्यावरील उपाय | How To Prevent Fever In children

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment