डिलिव्हरी कशी करतात | Dilevari kashi kartat? | Baby Delivery Information In Marathi In 2024

Delivery kashi hote, delivery kashi kartat, normal delivery kashi kartat?

सर्वसाधारणपणे नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. कारण जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर भविष्यातील अनेक धोके होण्यापासून बचाव होऊ शकतो. तर आज मी या लेखामधून dilevari kashi kartat? याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे यामुळे तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Dilevari kashi kartat?
Dilevari kashi kartat?

Dilevari kashi kartat?

सर्वसाधारणपणे गर्भवती स्त्रीचे नऊ महिने नऊ दिवस झाल्यावर डिलिव्हरी होते. परंतु हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगळे असते. आपल्या सर्वानाच माहित आहे की गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते तिला गर्भपिशवी असे म्हणतात या गर्भपिशवीमध्ये बाळ असते हे बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते.म्हणूनच बाळ पोटात असल्यापासुनच बाळाचे आणि आईचे एक घट्ट असे नाते तयार झालेले असते.ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.म्हणून तिला नाळवार असे म्हणतात.

बाळंतपणाच्या कळा(Childbirth Pain):

जेव्हा एका गर्भवती स्त्रीला बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. यामध्ये आधी पाण्याच्या पिशवीचा फुगा  बाहेर डोकावतो.कळा वाढल्यावर हा पाण्याच्या पिशवीचा फुगा फुटतो व मग बाळाच्या डोक्याचा प्रत्यक्ष दाब गर्भाशयाच्या तोंडावर येतो. गर्भाशयाचे तोंड संपूर्ण उघडायला दोन तासांपासून ते 24 तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो.हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे होत असते. जर  कळा तीव्र असतील तर काही वेळातच  गर्भाशयाचे तोंड उघडते,परंतु जर  कळा बारीक बारीक  असतील तर जास्त वेळ लागतो. सर्वसाधारणपणे जर स्त्री पहिल्यांदाच गर्भवती असेल तर  याला 16 ते 24 तास लागतात आणि जर एक किंवा एकपेक्षा जास्त वेळा  डिलिव्हरी झाली असेल तर सहा ते दहा तास लागतात.यामध्ये गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होतो.

बाळ बाहेर येण्याची क्रिया(Baby Coming Out):

यानंतर गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे  उघडते आणि  बाळ बाहेर येते.बाळ बाहेर येताना एकतर डोक्याकडून किंवा पायाकडून बाहेर येत असते. सोनोग्राफी मध्ये बाळाची पोझिशन काय आहे ते आधीच समजते. जर बाळ डोक्याकडून बाहेर आले असेल तर त्याला डोक्याळू आणि जर पायाकडून आले असेल तर त्याला पायाळू असे म्हणतात. जर गर्भवती स्त्रीची डिलिव्हरी ची पहिली वेळ असेल तर या प्रोसेसला सुमारे एक ते दोन तास लागतातआणि जर एकपेक्षा जास्त वेळा   डिलिव्हरी झाली असेल तर खूप कमी वेळ लागतो. यानंतर पाण्याची पिशवी रिकामी होते. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते ताबडतोब रडते या रडण्याचा अर्थ असा होतो की बाळाचा श्वासोच्छ्वास ठीक आहे.

वार पडण्याची क्रिया:

बाळ बाहेर आल्यानंतर लगेचच ५ ते २० मिनिटांपर्यंत वार पडणे गरजेचे असते. यासाठी आवश्यक पडल्यास नाळेवर थोडा ताणही द्यावा लागतो. कारण जर वार बाहेर पडली नाही तर जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. अशा वेळी भूल देऊन हातानेच वार गर्भाशयापासून वेगळी करून काढावी लागते. यामध्ये जर अनुभवी व्यक्ती असेल तर भूल देण्याची देखील आवश्यकता नसते. परंतु जर अनुभव नसेल तर डॉक्टरकडे नेणे आवश्यक असते. कारण जर वारेवर जास्त जोर दिला गेला तर नाळ तुटण्याची किंवा गर्भाशय उलटे  बाहेर येण्याची शक्यता असते. यामध्ये रक्तस्त्रावाचा आणि  जंतुदोषाचा धोकादेखील  असतो.

बाळंतपणानंतरची देखभाल | Care After Delivery Tips in Marathi

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतपणानंतरचा एक तास हादेखील खूप महत्वाचा असतो.या एका तासात बाळ आणि  बाळंतिणीला त्रास किंवा धोका होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांना Under Observation  ठेवावे लागते. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. बाळाच्या सर्व गोष्टी सुरळीत होणे या एका महत्त्वाच्या तासावर अवलंबून असते. या काळात श्वसन, ऊब, स्तनपान, जन्मजात दोषांची तपासणी इ. सर्व गोष्टींकडे लक्ष देता येते.  बाळंतीणीची तब्येत स्थिर होते. रक्तदाब, नाडी स्थिरावतात.रक्तस्रावअसला तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न देखील करता येतात. गर्भाशय आकुंचन पावते. जखमांची देखभाल देखील करता येते.

या आणि अशा अनेक घटना बाळ बाळंतिणीसाठी खूप  महत्त्वाच्या असतात. या तासाभरात बाळ बाळंतीण बाळंतपणाच्या खोलीतच ठेवावेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक दाई किंवा नर्सताई त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे.तसे पाहायला गेले तर आताच्या काळाप्रमाणे डिलीव्हरी हॉस्पिटल मध्येच होते. खूपच कमी केसेस मध्ये ती घरी केली जाते. परंतु घरी डिलिव्हरी होत असेल तर खूप काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी माहितगार व्यक्तींची आवश्यकता असते.

अशा प्रकारे काळजी घेतल्यानंतर बाळंतपण करणे सोपे जाते. अशाप्रकारे डिलिव्हरी केली जाते.

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

घरी डिलिव्हरी करणे योग्य आहे का?Is Home Delivery Is Safe?

डिलिव्हरी सुखरूप व्हावी यासाठी ती हॉस्पिटलमध्येच करणे योग्य आहे. पूर्वीच्या काळात पुरेशा सोयीसुविधा आणि प्रगत तंत्रज्ञान नसल्यामुळे डिलिव्हरी घरीच केली जात होती. परंतु आताच्या काळाप्रमाणे हॉस्पिटलमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि पुरेशा सोयीसुविधा असल्यामुळे डिलिव्हरी हॉस्पिटल मध्ये करणेच चांगले आहे.

बाळंतपण सुरु झाल्याची कोणती लक्षणे आहेत(What Are the Symptoms Of Labor Pain?)

बाळंतपण सुरु होताना पुढील लक्षणे दिसून येतात.
१)पोटात नियमित कळा येणे(Regular stomach cramps)
२)अंगावरून पांढरा द्राव (चिकट पदार्थ ) जाणे(White Discharge)
३)गर्भाशयाचे तोंड उघडणे(Opening of the cervix)

तर आज मी तुम्हाला Dilevari kashi kartat या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

• Brest Pump Information In Marathi In 2022|ब्रेस्ट पंप म्हणजे काय?ब्रेस्टपम्पचे फायदे आणि तोटे काय आहेत?

• नॉर्मल डिलीवरी कैसे होती है Pregnancy tips by Tandurust India

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “डिलिव्हरी कशी करतात | Dilevari kashi kartat? | Baby Delivery Information In Marathi In 2024”

Leave a Comment