Angai geet in marathi In 2022|मराठी अंगाई गीत

angai geet in marathi,angai in marathi,angai geet marathi madhe,मराठी अंगाई गीत,अंगाई गीत मराठी,लहान मुलांचे अंगाई गीत,अंगाई गीत मराठी,marathi angai geet

फार पूर्वी लहान बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत गायले जात होते. आता जसजसा काळ बदलत आहे तसतसे बाळाला झोपवण्यासाठी मोबाइल वर अंगाई गीत लावले जाते. परंतु असे म्हणतात की बाळाला छान झोप येण्यासाठी त्याला प्रेमाने मांडीवर घ्यावे. आणि डोक्यावर थोपटून अंगाई गीत गावे. त्यामुळे बाळाला शांत झोपही येते. आणि बाळाला देखील ते हळू हळू आवडू लागते.मी आज तुम्हाला मराठी अंगाई गीतांची नावे सांगणार आहे जी मी माझी मुलगी लहान असताना तिला झोपवण्यासाठी गात होती.तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला झोपवण्यासाठी या अंगाई गीतांचा उपयोग करा. तुम्हालाही गायला आवडेल आणि बाळालाही छान झोप येईल.

अंगाई गीत मराठी(angai geet marathi madhe)

Angai geet in marathi
Angai geet in marathi

मराठी अंगाई गीत

१)बाळा जो जो रे

बाळा जो जो रे
रे छकुल्या राघू मैना निजल्या अपुल्या पिंजऱ्यात
यावेळी निजली झाडे वेळी निजला चांदोबा
बाळा जो जो रे

लडिवाळा रुणझुण घुंगुर वाळा पायी वाजविशी
हम्मा ही दुदु देऊन बाई निजली गोठ्यात
रात्र किती चढली काळी भवती आला बागुलबुवा
कशी बाळा झोप शिवेना डोळा बाळा जो जो रे
जो जो जो जो रे
बाळा जो जो रे

२)निंबोणीच्या झाडामागे

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नात
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

३)देवकी picture मधील देवकी गाते अंगाई

स्वप्नांचा झुला
तान्हा झोपला
जा जा रे वाऱ्या झोका दे त्याला
चांदण्याची शान
करू निघाल्या
घाल पाखरा मंजुळ शिळा
आशेची दोरी
धरुनी हात
जोजविते ही आई
देवकी गाते अंगाई
देवकी गाते अंगाई

४)ये ग तू ग गाई

गाई ग गाई गाई अंगाई
चिमण्याही परतल्या साऱ्या आपुल्या घरी
पिउनिया दूध सारे मनीमाऊ अंग चाटी
सरसर झाडावर चढे बघ खारुताई
गाई ग गाई गाई अंगाई
गाई ग गाई गाई अंगाई

आकाशाच्या अंगणात दिसे ताऱ्यांची रांगोळी
चांदोमामा डोकावतो हळू रात्रीच्या वेळी
रातराणीखाली पिंगा सवे जाई आणि जुई
गाई ग गाई गाई अंगाई
गाई ग गाई गाई अंगाई

झोके घेई लाटांवर वारा हळूच निवांत
मिटुनीया डोळे घेती फुले लपती पानात
निवूनिया बघ गेली देवापुढची समई
गाई ग गाई गाई अंगाई
गाई ग गाई गाई अंगाई
गाई ग गाई गाई अंगाई

५)ये ग तू ग गाई

अंगाई गाई
ये ग तू ग गाई माऊ बाळाच्या डोळ्या
घालू पाळनिया अंथरूण
अंथरूण केले पांघरून शेला
निजविते तुला माऊ बाळा
अंगाई

FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

१)लहान बाळाला झोपवताना अंगाई गायली तर त्याचा काय फायदा होतो?

जर बाळाला गीत गाऊन झोपवत असेल तर बाळाला ते नक्कीच आवडते. आणि रोज रोज झोपवताना अंगाई गीत गायल्यामुळे जेव्हा तुम्ही अंगाई गीत गायला सुरु करता तेव्हा बाळाला समजते की आता आपल्याला झोपायचे आहे. आणि तसेच बाळाला प्रेमाने मांडीवर घेऊन,प्रेमाने थोपटून,त्याला प्रेमाने कुरवाळून झोपवले तर बाळाशी आपले नाते अधिक घट्ट बनण्यास मदत होते.

२)लहान बाळाला शांत झोप येण्यासाठी अजून काय काय प्रयत्न केले पाहिजेत.

बाळाला शांत झोप येण्यासाठी त्याला शांततेच्या ठिकाणी झोपवावे. बाळ झोपला असेल तिथे गोंगाट करू नये. त्या ठिकाणी टीव्ही बघणे,मोठ्या आवाजात गाणी ऐकणे टाळावे. तसेच उजेड येत असेल तर पडदा लावावा.

तर मी आज तुम्हाला Angai geet in marathi या विषयावर थोडक्यात माहिती सांगितली ही अंगाई गीते मी माझी मुलगी बाळ असतांना आणि कधीकधी अजूनही ती जेव्हा सांगते तेव्हा तिला झोपवण्यासाठी गात असते. मला खात्री आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला झोपवण्यासाठी या अंगाई गीतांचा नक्की उपयोग कराल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

जर तुम्हाला अजून काही अंगाई गीतांची माहिती हवी असेल तर हे वाचा:

अधिक वाचा :

• 9 Must Have Best Medicine Names For A Baby In Marathi |बाळासाठी आवश्यक असणारी औषधे

Leave a comment

improve alexa rank