What is Ovulation Period in Marathi। गर्भधारणा काळ मराठी माहिती

What is Ovulation Period in Marathi। ओव्हुलेशन काळ मराठी माहिती

What is Ovulation Period in Marathi: आई होण्याआधी नक्की जाणून घ्या किती गरजेचा आहे Ovulation Period for pregnancy! कारण योग्य माहितीनेच गर्भधारणा हि निरोगी आणि सुरक्षित होऊ शकते.

जर तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या Ovulation Period म्हणजेच ओव्हुलेशन कालावधी विषयी देखील जाणून घ्यायला हवे(Information about Ovulation Period in Marathi). महिलांमध्ये येणाऱ्या मासिक पाळीचाच एक भाग म्हणजे ओव्ह्युलेशन होय. ओवरी मधून अंडे बाहेर येण्याचा प्रक्रियेला Ovulation असे म्हणतात. ओवरी मध्ये अंडे हे 12 ते 24 तास फर्टीलायझेशन साठी थांबते. जर ते शुक्राणू द्वारे फर्टीलाईज झाले नाही तर मग ते बाहेर येते.

तर दुसरीकडे शुक्राणू म्हणजेच स्पर्म हे 5 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे या कालावधीमध्ये संभोग करणे देखील गरजेचे असते, कारण त्यामुळेच शुक्राणू हे अंड्यांना फलन होण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे आता हे शुक्राणू फलित होण्यासाठी वातावरण निर्माण करते.

सर्वाधिक शक्यता असलेले Fertile Days | Most Fertility Days after Monthly Periods In Marathi

fertility days in woman in marathi
fertility days in woman in marathi

साधारणतः सर्वाधिक Fertile शक्यता असलेले दिवस हे मासिक पाळीचा म्हणजेच Menstrual Cycle च्या आठव्या दिवशी आणि त्याच पाळीच्या 19 व्या दिवसांच्या दरम्यान असतात. यामध्ये तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस हा या चक्राचा पहिला दिवस म्हणून पकडला जातो. तसे तर हे सर्व महिलांमध्ये वेगवेगळे आहे. मासिक पाळी सुरू होण्याच्या 10 ते 16 दिवस आधी पासूनच ओव्युलेशन प्रक्रिया सुरू झालेली असते. जर तुमची मासिक पाळी ही 28 दिवसांची असेल तर त्यानुसार हे सर्व गणित करणे अगदी सोपे होऊन जाते. जेव्हा तुमच्याकडे ओव्ह्युलेशन विषयी योग्य माहिती असेल तेव्हा तुम्हाला जोडीदारासोबत शारिरीक संबंध ठेवून गर्भधारणा नियोजनबद्ध करता येते. यातून गर्भधारणा होण्याची शक्यता देखील वाढतात.

ओव्युलेशन ची लक्षणे । symptoms of ovulation period in marathi

Ovulation चे अनेक लक्षणे असतात जसे की योनिद्वारे रक्तस्राव, शरीराचे तापमान वाढणे, टेंडर ब्रेस्ट, पोटात दुखणे इत्यादी. यामध्ये एक खूप महत्वाचे आणि सर्व स्त्रियांमध्ये दिसणारे लक्षण म्हणजे जेवणाच्या आवडीत होणारे बदल. मुख्यतः या काळात स्त्रियांना जास्त आंबट गोड आणि जास्त मीठ असलेले अन्न खायला आवडते.

विज्ञान आणि संशोधन काय सांगते?

इंडीयन जर्नल ऑफ फिजिओलोजी अँड फार्मकोलोजी द्वारे प्रदर्शित केलेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळी दरम्यान महिलांमध्ये हर्मोनाल बदल हे होतात मात्र त्यासोबत महिलांमध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते. ही इच्छा ovulation नंतर अधिक मोठ्या प्रमाणत वाढत असते.

निष्कर्ष काय सांगतो?  

55 महिलांमध्ये खाण्यापिण्याच्या इच्छांमध्ये होणारे बदल आणि त्याविषयी केलेला अभ्यास हे सांगतो की, ल्युटल फेज ( म्हणजेच असा काळ जो ovulation नंतर लगेच सुरू होतो आणि मासिक पाळी सुरू होताच संपते.) नंतर महिलांना मीठ अधिक खायला आवडते. अभ्यासाअंतर्गत असे लक्षात आले की मासिक पाळीच्या फोलिक्युलार (follicular) आणि ल्यूटल फेज (Periovulatory phase) काळात महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरोन प्रवाह होतो. हेच हार्मोन शरीरात मीठ जास्त घेण्यासाठी कारणीभूत ठरतात.

अभ्यासदरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार असे लक्षात आले आहे की लयुटल फेज मध्ये महिलांमध्ये मीठ जास्त खाण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण होते कारण तेव्हा एंडोजेन्स या हार्मोन चा स्तर मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यानंतर हे प्रमाण मेंस्ट्रुअल फेज (Menstrual Phase) मध्ये कमी होते कारण तेव्हा हार्मोन्स कमी झालेले असतात.

गर्भधारणा होण्याची योग्य काळ | Ovulation Period of Woman In Marathi

याचाच अर्थ असा होतो की जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी जास्त मीठ असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते तेव्हा समजून घ्यायचे की आताच तुमच्या ओवरीमधून अंडे बाहेर पडले आहेत. म्हणजेच ovulation ला सुरुवात झाली आहे. अशात असू द्या जर तुम्ही आई होण्याची तयारी करत असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक रात्र चांगल्या पद्धतीने घालविण्याचा विचार करू शकता.

यामुळे शुक्राणू म्हणजेच स्पर्म ला अंड्यांसोबत चा मिलाप सोपे जाईल. आणि याचाच परिमाण म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक वाढेल.

त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही आई बनण्याचे नियोजन करत असाल तेव्हा तुमच्यामध्ये होणाऱ्या मिठाविषयी इच्छाशक्तीकडे लक्ष असू द्या. खासकरून हे लक्ष तुमच्या मासिक पाळीच्या काळात असू द्या.

pregnancy period in marathi
pregnancy period in marathi

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की ovulation ला समजून घेण्यासाठी फक्त मिठाच्या इच्छाशक्ती वर अवलंबून राहणे चुकीचे आहे. इतर लक्षणांवर देखील लक्ष असू द्या. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा

Garbh sanskar in marathi

Books to read in pregnancy marathi

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment