Navjat Balachi Kalji In Marathi In 2022|नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी?

Navjat Balachi Kalji In Marathi:

नव्याने होणाऱ्या आई-वडिलांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या बाळाची काळजी कशी घ्यावी? नवजात शिशूचे पालकत्व कसे स्वीकारावे ? यासाठी मी तुम्हाला काही Parenting Tips सांगणार आहे. कारण सध्या कोरोना काळात आपल्याला इतर गोष्टींमध्ये सुद्धा खूप precautions घ्यावे लागतात आणि आता बहुतांश लोक संयुक्त(Nuclear) कुटुंबात रहात असल्यामुळे अशी मोठी जबाबदारी आल्यावर निश्तितच घाबरतात. कारण काही घरांमध्ये आजी-आजोबा किंवा वडीलधारी माणसे देखील नसतात. आणि नव्याने झालेल्या आई-बाबाना फारसा अनुभव नसतो.

त्यांची ही भीती कमी करण्यासाठी मी आज तुम्हाला कोरोना मध्ये बाळाची काळजी कशी घ्यावी?याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. मला खात्री आहे की याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जबाबदारी म्हणजेच पालकत्व(Parenting) निभवावे लागते.

Navjat Balachi Kalji In Marathi:
Navjat Balachi Kalji In Marathi:

बाळाची काळजी घेताना पुढील गोष्टींचा विचार करावा.

स्तनपान(Brest Feeding):

बाळ (New Born Baby) जन्माला आल्यानंतर किमान सहा महिन्यांपर्यंत त्याला आईचे दूध देणे अतिशय महत्वाचे आहे. हे बाळ आणि आई या दोघांसाठी important आहे. नवजात बाळांना(Newborns) २ ते ३ तासांनी Brest feeding करावे लागते.

आईच्या दुधामुळे बाळाला nutrition मिळते. आईच्या दुधात antibodies असतात त्या virus आणि bacteria शी लढण्यास मदत करतात.स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी हे वाचा

Feeding Bottle:

बाळाला(New Born Baby) शक्यतो bottle ने दूध पाजणे टाळावे. जर आईला पुरेसे दूध येत नसेल तर formula milk दयावे परंतु bottle ऐवजी चांदीची वाटी आणि चांदीच्या चमच्याचा वापर करावा. चांदीची वाटी आणि चमचा नसेल तर स्टीलची वापरली तरी चालेल परंतु बाटली ने शक्यतो दूध पाजू नये.

जर अगदीच एखाद्याला possible नसेल तर आणि तरच bottle वापरावी. परंतु bottle चा वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते. वेळच्यावेळी ती स्वच्छ धुवून उकळवून घ्यावी लागते. Bottle चे properly निर्जंतुकीकरण केले नाही तर त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो.

बाळाला पकडण्याची स्थिती (Position) :

बाळ जन्माला आल्यानंतर त्याला घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. परंतु बाळाला योग्य प्रकारे नाही पकडले तर त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला मान सावरता येत नसल्यामुळे अलगदरीत्या एक हात त्याच्या मानेखाली आणि दुसऱ्या पूर्ण हातावर बाळाला पकडावे. नवजात बाळाचे मानेचे स्नायू खूप कमकुवत असतात. त्यामुळे पहिल्या काही महिन्यांपर्यंत बाळाला उचलून घेताना खूप काळजी घ्यावी लागते. बाळ मान सावरेपर्यंत त्याला उचलून घेताना खूप Precaution घ्यावी लागते.

ढेकर देणे:

बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर त्याला ढेकर देणे खूप महत्वाचे आहे. जर ढेकर न देता बाळ तसेच झोपले तर त्याला उलटी होण्याचे चांसेस जास्त असतात. त्यासाठी बाळाला ५ ते १० मिनिटे खांद्यावर उभे धरावे. ढेकर दिल्यामुळे colic चा त्रास कमी व्हायला देखील मदत होते.जेव्हा बाळाला ढेकर येतो तेव्हा थोडे दूध बाहेर येऊ शकते. पण यात काळजी करण्यासाखे काही नाही. हे नैसर्गिक आहे. बाळाला ढेकर देताना त्याच्या पाठीवरून अलगद हात फिरवावा.

बाळाची मालिश व अंघोळ(Baby Massage and Bath:):

बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बाळाला मालिश करणे हे महत्वाचे आहे. डॉक्टर सुद्धा बाळाला मालिश करण्याचा सल्ला देतात. ही मालिश शक्यतो अनुभवी स्त्रीकडून करून घ्यावी. कारण नवीन व्यक्तीला पुरेशी माहिती नसेल आणि जर तिने चुकीच्या पद्धतीने मालिश केली तर त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो.तसेच बाळाला योग्य पद्धतीने मालिश करून अंघोळ घातली तर शांत झोप येते. मालिश ची एक योग्य वेळ ठरवावी लागते. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळा बाळाला मालिश करू शकतो.शक्यतो एक ठराविक वेळ असेल तर ते बाळाचे routine बनते. आणि मग ते चिडचिडेपणा करत नाही. मालिश करताना बाळाला चांगले तेल वापरावे.मालिश करून झाल्यावर बाळाला चांगल्या baby soap ने अंघोळ घालावी.

बाळाला घट्ट गुंडाळून उबेत ठेवणे (Swaddling a baby) :

आपल्या नवजात बाळाला कपड्याने घट्ट गुंडाळून(Wrapping) ठेवण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. कित्येक जणांना असे वाटते की कशाला एवढ्या लहान बाळाला बांधून ठेवायचे ? त्याने आपल्या बाळाला वेदना तर होणार नाहीत ना? पण नवजात बाळाला कपड्यामध्ये घट्ट बांधल्यामुळे त्याला गर्भाशयात मिळालेली सुरक्षितता आणि उबदारपणा जाणवतो.कॉटन च्या साडी किंवा कपड्यामध्ये बांधल्यामुळे गर्भाशयातच आपण सुरक्षित आहोत अशी भावना बाळाच्या मनात निर्माण होते.त्यामुळे बाळाला शांत झोपही येते. बाळाच्या आरोग्यासाठी देखील ते फायदेशीर असते.

हातमोजे व पायमोजे (Mittens and Booties):

तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी हिवाळ्यात सुती मोजे किंवा booties घालू शकता. परंतु जर उन्हाळा असेल आणि तुमच्या बाळाच्या हात व पायांना घाम येत असेल तर त्याला हातमोजे किंवा पायमोजे घालू नका. कारण त्याने तुमच्या बाळाचे शरीर अधिक गरम होईल. बाळाला शक्यतो सुती (cotton) व हलके कपडे घालावेत. त्यामुळे बाळाला ऊब व आराम दोन्हीही मिळते.

डायपर व डायपर रॅश क्रीम :

बाळाला डायपर वापरावे की नाही हा प्रश्न आई-वडिलांना नेहमी पडतो. बाळाला शक्यतो लंगोटच वापरावे. परंतु काही जणांना ते possible होत नाही. त्यामुळे diaper वापरायचे असेल तर खालील गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते:

 • डायपर वापरायचे असल्यास ते २-२ तासांनी बदलायला हवे.बाळ किती वेळा शु किंवा शी करतो याचा अंदाज घेऊन diaper change करावे. कारण डायपर जास्त ओले असेल तर बाळाला इन्फेकशन होण्याचे chances जास्त असतात.
 • डायपर लावण्याआधी बाळाला diaper rash cream लावावे.जेणेकरून diaper आणि बाळाची skin यामध्ये एक layer तयार होते.आणि त्यामुळे बाळाला rashes होण्याचे chances कमी होतात.
 • डायपर चांगल्या brand चे वापरावे.
 • जरी तुम्ही बाळाला डायपर वापरत असाल तरी थोडा वेळ बाळाला उघडं ठेवा. बाळाला केव्हाही diaper मध्ये continue ठेवू नये.

नखे कापणे(Nail Cutting) :

नवजात शिशूची नखे कापणे हे खूप महत्वाचे आहे. कारण बऱ्याच वेळा बाळ सारखे तोंडात बोट घालत असते. आणि नखे कापली नसतील तर त्याच्या पोटात germs जाण्याची शक्यता असते. बाळाची नखे मऊ आणि कोमल असतात. आणि त्याची वाढदेखील लवकर होते. बाळाची नखे खूप काळजीपूर्वक कापावी लागतात. बाळाची नखे कापताना बाळासाठीचे nail cutter वापरावे. नखे कापणे सोपे जावे म्हणून बाळाची हातापायाची बोटे कोमट पाण्यात बुडवून घ्या.

लसीकरण(Vaccination):

बाळाचे नियमित लसीकरण करणे हे अतिशय महत्वाचे आहे. लसीकरणामुळे बाळाचे अनेक आजारापासून रक्षण होण्यास मदत होते. बाळ जन्माला आल्यानंतर लगेच पोलिओ,BCG आणि हिपेटीटीस-बी अशा तीन लसी दिल्या जातात. आणि त्यानंतर vaccination चा एक chart बनवून देतात. तो follow करणे आवश्यक आहे.

बाळाशी संवाद साधणे(Communication With Baby) :

बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याच्याशी संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि ते खूप महत्वाचे आहे. कारण बाळाला जरी बोलता येत नसले तरी आपले हावभाव (expression) आपले बोलणे याकडे बाळाचे बारीक लक्ष असते. आणि बाळही त्यावर चांगला रिस्पॉन्स देते. त्यामुळेच बाळाला गाणी म्हणून दाखवणे त्याच्याशी खेळणे व संवाद साधणे हे त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. बाळाशी बोलत राहिले तर बाळ बोलायलाही लवकर लागते.
त्याचप्रमाणे आईने बाळाला शक्यतो आपल्या जवळ ठेवावे. बाळाला आईच्या कुशीत सर्वात जास्त सुरक्षित वाटते. कारण बाळाची नाळ ही आईशी नऊ महिन्यांपासून जोडली गेलेली असते आणि बाकी लोकांशी ओळख व्हायला त्याला थोडा वेळ लागतो. त्यामुळे बाळाचा स्पर्श हा बाळासाठी खूपच महत्वाचा असतो.या अशा छोट्या छोट्या Parenting Tips होत्या ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.


वारंवार विचारली जाणारी प्रश्नोत्तरे (Frequently Asked Questions In Marathi)

१) नवजात शिशु (New Born Baby)साधारण किती तास झोपतात?
नवजात शिशु (New Born Baby)साधारण १४ ते १६ तास झोपतात.

२) नवजात शिशु (New Born Baby)ला कोणते दूध दयावे ?
नवजात शिशु (New Born Baby)ला सहा महिने तरी पूर्णतः आईचेच दूध द्यावे.
जर आईचे दूध पुरत नसेल तर Formula Milk द्यावे पण cow milk किंवा
buffalo milk निदान एक वर्षापर्यंत तरी देऊ नये.

३) बाळाला मालिश करणे योग्य आहे का?
होय,बाळाचे शरीर मजबूत बनवण्यासाठी मालिश हे अतिशय गरजेचे आहे.

४) बाळाला बाळगुटी देणे योग्य आहे का?
बाळाला फार पूर्वीपासून बाळगुटी देण्याची पद्धत ती अतिशय योग्य आहे. परंतु
काही वेळा moisture मुळे गुटीतील काही वस्तू खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे गुटी देताना व्यवस्थित चेक करूनच द्यावी.

५) बाळाला धुरी देणे योग्य आहे का?
होय,बाळाला सर्दी खोकला किंवा अजून काही आजार होऊ नये म्हणून धुरी
दिली जाते. धुरी देताना त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या किंवा ओवा टाकतात. जर
बाळाला ओव्याची allergy होत असेल तर त्याला धुरी देऊ नये.

मी केलेली एक छोटीशी कविता

बाळ जन्माला येण्याची जेव्हा लागते चाहूल
आनंदते घर तेव्हा जेव्हा बाळाचे पडते पहिले पाऊल

जरी आई असेल कितीही हुशार आणि असेल कितीही जरी तिचे कितीही कर्तृत्व
परंतु खरे सुख समाधान तेव्हाच प्राप्त होते तिला जेव्हा मिळते तिला मातृत्व

सर्वच होतात खुश आणि होतो सर्वानाच हर्ष
जेव्हा होतो बाळाचा नाजूक आणि कोमल स्पर्श

बाळाच्या नादात विसरावे लागते स्वतःचे अस्तित्व
आणि स्वीकारावे लागते एक जबाबदार पालकत्व

बाळाची काळजी घेताना या टिप्सचा देखील जरूर विचार करावा(Baby Care Tips) :

 • शक्यतो बाहेरच्या व्यक्तीला आपल्या तान्ह्या बाळाला हात लावू देऊ नये. कारण सध्या कोरोनाच्या काळात आपल्याला माहित नसते की कोण व्यक्ती कुठून आली असेल आणि बाळाच्या बाबतीत कोणतीही risk घेऊ नये.
 • आई-बाबा ,आजी-आजोबा आणि घरातील व्यक्तींनीसुद्धा बाळाला हात लावताना सर्वप्रथम हात पाय स्वच धुवावेत आणि मगच बाळाला घ्यावे.
 • बाळाला घेण्यापूर्वी आपली नखे कापली असली पाहिजेत जेणेकरून बाळाला काही इजा होणार नाही.
 • बाळाला शक्यतो सुती आणि मुलायम कपडे वापरावे,ज्यामध्ये बाळाला comfortable वाटेल.
 • बाळाला घेताना अंगठी,बांगडी,किंवा अजून काही अलंकार घातले असतील तर ते टोचत तर नाहीत ना याची काळजी घ्यावी.कारण बाळाची skin खूप sensitive आणि नाजूक असते.
 • बाळाला खूप जोरात चिवळु नये किंवा त्याचे गाल ओढू नये. त्याने बाळाला अस्वस्थ वाटू शकते.
 • बाळाशी आई-वडिलांनी जास्तीत जास्त संवाद साधावा आणि त्याला प्रेमाने जवळ घ्यावे,कारण आई-वडिलांच्या भरवशावर त्याने या जगात प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे त्याला एकटे वाटता कामा नये.
 • बाळ ज्या घरात वावरते तेथील वातावरण प्रसन्न असावे. तेथे कोणतेही वाद नसावेत. आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ असावा.

तर मी आज तुम्हाला Navjat Balachi Kalji In Marathi याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन .

अधिक माहितीसाठी हे वाचा : नवजात बालकाची काळजी

अधिक वाचा :

◘गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत?

◘ गर्भावस्थेत गर्भसंवाद कसा साधावा?

◘निरोगी गर्भारपणासाठी काय प्रयत्न करावेत?

Leave a Comment

improve alexa rank