3 Month Pregnancy in Marathi | गरोदरपणाची लक्षणे | 2 month Pregnancy symptoms in Marathi

3 month pregnancy in marathi

प्रेग्नंसी म्हटलं की पहिल्या तीन महिन्यांत आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भधारणा हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. कारण या काळात निर्माण होणाऱ्या छोट्या जीवाची काळजी घेणे, त्याची जबाबदारी घेणे गरजेचे असते. स्वतःला आणि तुमच्या होणाऱ्या बाळाला निरोगी ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक आई आणि वडिलांची असते. आज मी तुम्हाला या लेखातून प्रेग्नन्सीच्या पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात कशी काळजी घ्यावी?याकाळात काय खावे आणि काय खाऊ नये ? या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

3 month pregnancy in marathi

आपण गरोदर आहे की नाही हे जाणून घेण्याची तर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते ,यासंबंधी पहिल्या महिन्याची लक्षणे कशी ओळखायची ते पाहूया:

1 month pregnancy symptoms in marathi | 2 month pregnancy symptoms in marathi

  • १)मॉर्निंग सिकनेस: हे अगदी गरोदरपणाचे सुरुवातीचे लक्षण आहे. अगदी प्रत्येक गरोदर महिलेला मॉर्निंग सिकनेस येतोच असे नाही परंतु बऱ्याचशा महिलांना सकाळी किंवा काही स्त्रियांना दुपारी किंवा संध्याकाळी मॉर्निंग सिकनेस येऊ शकतो. यामध्ये उलट्या होणे,मळमळ होणे किंवा पोळ्या करत असताना,भाजी करत असताना वास सहन न होणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • २)अशक्तपणा जाणवणे: अनेक महिलांना प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या काळात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो . गर्भधारणेनंतर, महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे थकवा येतो. यामध्ये थोडा वेळ जरी काम केले तरी आराम करावासा वाटतो आणि महिलांना जास्त वेळ उभे राहणेही कठीण होऊन जाते.
  • ३)​स्तनांमध्ये बदल होणे: जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्या स्तनामध्येही अनेक बदल जाणवतात. स्तनामध्ये थोडासा जडपणा येणे , मुंग्या येणे किंवा स्पर्श केल्यावर वेदना होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशावेळी घाबरून न जाता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.कधीकधी निप्पल चा रंग देखील बदलू शकतो.हार्मोन मधील बदलामुळे मेलानोसाइट्स प्रभावित होते. यामध्ये त्वचेचा रंग प्रभावित करणाऱ्या मेलेनिन चे उत्पादन होते. यामुळे त्वचेचा रंग डार्क गडद दिसू लागतो. निप्पल चा रंगही आधीपेक्षा गडद होतो.
  • ४)पुन्हा पुन्हा लघवी लागणे: गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टोरेन हार्मोन चा स्तर वाढतो. त्यामुळे गर्भवती स्त्री ला पहिल्या महिन्यात पुन्हा पुन्हा लघवी लागण्याची समस्या होऊ लागते.
  • तसेच याशिवाय गर्भधारणा झाल्यावर मासिक पाळी थांबणे, रक्तस्त्राव आणि शरीरात जडपणा , स्तन दुखणे, थकवा जाणवणे, पुन्हा पुन्हा लघवी लागणे, चिडचिडेपण (मूड स्विंग), छातीत जळजळ इत्यादि लक्षणे जाणवू लागतात. ही सर्व लक्षणे शरीरात जाणवू लागली की गर्भधारणा झाली आहे असे आपण ओळखू शकतो.
  • ५)रक्तस्त्राव आणि शरीरात जकडण: ज्यावेळी गर्भाशयात गर्भ तयार होतो तेव्हा महिलेला हलकेसे ब्लीडींग होऊ शकते. याबरोबरच शरीरात जकडन होते. हे लक्षण गर्भधारणेच्या एक आठवड्यानंतर दिसू लागतात. परंतु जर अधिक ब्लीडींग होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण अधिक रक्तस्त्राव मुळे गर्भपात होण्याची देखील शक्यता असते. म्हणूनच गरोदरपणाच्या काळात कोणताही हलगर्जीपणा न करता काही गोष्टींबाबत समजत नसेल तर वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • ६)मूड स्विंग होणे: गरोदरपणातील पहिल्या महिन्यात बऱ्याचशा महिलांना मूड स्विंग होणे हे लक्षण दिसून येते. हॉर्मोनल बदलांमुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे,राग येणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • ७)जास्त भूक लागणे: काही काही गरोदर स्त्रीयांची भूक अचानकपाणे वाढते. हार्मोन्स मधील बदलामुळे तिला परत परत भूक लागते. याशिवाय त्या स्त्रीयांची खाण्यापिण्यामधील आवड वाढू लागते. जी गोष्ट तिला आधी खायला आवडत नसे तो पदार्थ ती खाऊ लागते.

Pregnancy in Marathi

Frequently Asked Questions(महत्वाची प्रश्नोत्तरे)

गर्भधारणा झाली आहे हे कसे ओळखावे ?

जर तुम्हाला दिलेल्या लक्षणांमधील थोडी जरी लक्षणे दिसत असतील आणि तुम्हाला तुम्ही खरंच गरोदर आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट किट च्या मदतीने खात्री करू शकता.प्रेग्नंसी टेस्ट करण्यासाठी सकाळच्या लघवीतील काही थेंब टेस्ट किट मध्ये टाकून तपासणी करता येते.

गरोदरपणात दुपारी झोपावे का?

गरोदरपणात रात्रीची जागरण करणे किंवा दुपारी झोपणे टाळावे. कारण यामुळे वात, पित्त आणि कफदोष असंतुलित होतो. दुपारी थोडीशी विश्रांती घ्यावी पण गाढ झोपणे टाळावे.

3 month pregnancy diet chart in marathi

ज्यावेळी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्या आहाराद्वारे गर्भाचे पोषण होते. म्हणूनच आईने पोषक आहार घ्यायला हवा. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महित्यात तर तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागते.याकाळात अनेक स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसमुळे जेवण जात नाही. परंतु असे न करता तुम्हाला खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता काम नये.पहिल्या तीन महिन्यात गरोदर महिलांना हा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो. त्यानंतर हळूहळू हा त्रास कमी होतो.

गरोदरपणातील सुरुवातीच्या तीन महिन्यातील आहार:

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात कोणत्या गोष्टी खाव्या आणि कोणत्या टाळाव्या याची यादी पाहू या.

1) गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात आहारात ताज्या फळांचा समावेश करावा.

गरोदरपणात फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक आहे. फळांमध्ये भरपूर पोषक अशी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट असतात. तसेच त्यात पाणीही असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. सर्व रंगांमध्ये तुमची आवडती फळे निवडल्याची खात्री करा. तसेच तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहार चार्टमध्ये पेरू, केळी यांसारख्या फळांचा समावेश करा जे वजन वाढण्यास प्रोत्साहन देतात.

२) गरोदरपणाच्या तिसर्‍या महिन्यात व्हिटॅमिन बी६/डी युक्त पदार्थ खावेत.

३)पाणी: गरोदर स्त्रियांनी शक्यतो पाणी उकळून प्यायला हवे. कारण पाण्यातून जर चुकूनही जंतूंचा प्रादुर्भाव झाला तर शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि लोह शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे वजन कमी होणे,अपचन होणे यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच प्रेग्नेंसीमध्ये पिण्याचे पाणी १५ ते २० मिनिटे उकळून निर्जंतुक केलेले असावे. गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी सुवर्णभरित जलाचा उत्तम उपयोग होतो. सुवर्णभरित जल म्हणजेच पाणी उकळत असताना चोवीस कॅरेट सोन्याचा चांदीच्या साखळीत गुंफलेला पातळ पत्रा त्यात टाकून ठेवावा. सुवर्णभरित जल करण्यासाठी अंगठी किंवा अन्य एखादा दागिना वापरू नये.

४)दूध: दुधामध्ये नैसर्गिक रूपात प्रोटिन्स व कॅल्शिअम असते. त्यामुळे गरोदरपणात दूध पिणे हे सर्वोत्तम आहे. बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी दूध पिणे अतिशय आवश्यक असते. तसेच बऱ्याच वेळा बाळंतपणानंतर स्त्रीची हाडे कमकुवत होतात. तिला कंबरदुखी,सांदेदुखी यासारखे त्रास दिसतात. यामुळेच गर्भवतीने सकाळ-संध्याकाळ कपभर दूध पिणे अतिशय आवश्यक आहे.

दूध पिणे हे सर्वोत्तम आहे. बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी दूध पिणे अतिशय आवश्यक असते. तसेच बऱ्याच वेळा बाळंतपणानंतर स्त्रीची हाडे कमकुवत होतात. तिला कंबरदुखी,सांदेदुखी यासारखे त्रास दिसतात. यामुळेच गर्भवतीने सकाळ-संध्याकाळ कपभर दूध पिणे अतिशय आवश्यक आहे. ३)४)

तर आज मी तुम्हाला याविषयी थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

• Naming ceremony in marathi In 2022|बाळाचे बारसे

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment