Panchamrut in pregnancy In 2023|पंचामृत

Panchamrut in pregnancy:

गरोदरपणात पंचामृताचे सेवन करणे हे गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. आज मी तुम्हाला या लेखातून माननीय डॉ.श्री बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील पंचामृतची रेसिपी आणि माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे पुस्तक नाही आहे अशा गर्भवती स्त्रिया ही माहिती वाचू शकतील. ज्याप्रमाणे मला या माहितीचा उपयोग झाला तसाच तुम्हालाही तो व्हावा यासाठी ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे.

Panchamrut in pregnancy


पंचामृत या नावातच ‘अमृत’ असून ते रोग व वार्धक्याचा नाश करणारे,आयुष्य व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे,स्फूर्ती व स्मृतिवर्धक असे एक उत्तम ‘रसायन’ आहे. रोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर पंचामृताचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे.

गर्भधारणेपूर्वी स्त्री व पुरुष या दोघांनीही किमान दोन महिने पंचामृत घेतलेले चांगले असते. गर्भवती स्त्रीने पूर्ण नऊ महिने घेण्याने गर्भालाही हे सर्व फायदे मिळतात,बाळंतपणानंतर पंचामृताचे सेवन नियमित केल्याने पुरेसे दूध यायला मदत मिळते,बाळाच्या विकासाला मोलाचा हातभार लागतो व स्त्रीची स्वतःची शक्ती टिकून राहते. बाळालाही बाहेरचे अन्न द्यायला सुरुवात केली की आईच्या पंचामृतातले एक चमचा पंचामृत द्यावे. साधारणपणे अडीच-तीन वर्षाचे मूल स्वतंत्रपणे पंचामृताचे सेवन आवडीने करते.

यातील घटक,त्यांचे प्रमाण,प्रत्येक घटकाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.

  • एक चमचा साखर – शक्तिवर्धक,मेंदू व हृदयाला बलदायक
  • एक चमचा मध – हृदयाला बलदायक,डोळ्यांची शक्ती वाढवणारे व त्रिदोषशामक
  • एक चमचा दही – वातशामक व शुक्रधातूस हितकर
  • दोन चमचे साजूक तूप – बुद्धिवर्धक,अग्निवर्धक,वात-पित्तशामक आणि कफाला बलदायक
  • सहा-सात चमचे कोमट दूध – मन व शरीराला बलवर्धक,ओजवर्धक,सर्व धातूंना पोषक.

हे प्रमाण एका व्यक्तीसाठी असून हे करतांना ही घटकद्रव्ये क्रमाने मिसळावीत. साखरेऐवजी शतावरी,केशर,सोने असलेले ‘अमृतशर्करा‘ वापरल्यास त्याचे गुण शतपटीने वाढतात. शक्य असल्यास पंचामृतासाठी चांदीची वाटी वापरणे अधिक चांगले असते.

ही सर्व माहिती मी डॉ.बालाजी तांबे यांच्या पुस्तकातून दिली आहे. मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की कमेंट करून सांगा.

अधिक वाचा :

 •  Balguti Ingredients In marathi In 2022|बाळगुटी कशी द्यावी?

Leave a Comment

improve alexa rank