Naming ceremony in Marathi in 2024 | बाळाचे बारसे | Balache Barse Information in Marathi

Naming ceremony in Marathi In 2024 | बाळाचे बारसे

Naming ceremony in Marathi: घरामध्ये बाळ आले की वातावरण खूपच प्रसन्न आणि आनंदी असते. सर्वजण प्रचंड उत्साही असतात कारण एका बाळाच्या येण्यामुळे कोणी आई-बाबा तर कोणी आजी-आजोबा कोणी मावशी,मामा,मामी,आत्या,काका,काकू,ताई,दादा अशाप्रकारे सर्वांचेच प्रमोशन झालेले असते. मग सर्वजण लाडाने बाळाला चिऊ,माऊ,मनू,परी अशा बऱ्याच टोपणनावाने हाक मारायला सुरुवात करतात. त्यानंतर वेळ येते ती म्हणजे बाळाचे बारसे करण्याची. आज मी तुम्हाला या लेखातून बाळाचे बारसे म्हणजे काय?त्याचा कोणता विधी आहे? बारसे का करतात? याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल.

Naming ceremony in marathi
Naming ceremony in Marathi

बारसे | Barse Information in Marathi

हिंदू कुटुंबात जन्म झाल्यावर बाळाचे बारसे करण्याची पद्धत आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर बारसे म्हणजे बाळाचे नाव ठेवण्याचा समारंभ होय. सर्वसाधारणपणे बारसे हे बाराव्या दिवशी केले जाते , म्हणून त्याला ‘बारसे’ (संस्कृत ‘द्वादश’ वा ‘द्वादशाह’) असे म्हणतात. हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी ‘नामकरण’ या संस्कारालाच हल्ली बारसे किंवा ‘नाव ठेवणे’ असे म्हणतात. पूर्वी स्त्रीशूद्रांखेरीज इतरांचा नामकरण संस्कार वैदिक मंत्रांसह केला जाई परंतु गेल्या काही शतकांपासून बारशाच्या वेळी हे मंत्र म्हणण्याची प्रथा बंद झाली आहे. जर काही कारणामुळे बाराव्या दिवशी बारसे करणे शक्य नसेल तर इतर सोयीच्या दिवशी देखील बारसे केले जाऊ शकते.

नामकरणाचा प्रारंभ | Start of Naming Ceremony in Marathi

नामकरणाचा प्रारंभ हा भाषेच्या उत्पत्तीबरोबरच झाला आहे. व्यवहारपूर्तीसाठी नामकरणाची अपरिहार्यता आणि अपत्यजन्माचा आनंदोत्सव साजरा करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती यांमुळे नामकरणाला सामाजिक व भावनिक दृष्टींनी अत्यंत महत्त्व असते. म्हणूनच हिंदूंनी नामकरणाचा सोहळा सोळा संस्कारांत समाविष्ट करून त्याला धार्मिक अधिष्ठान दिले. ख्रिस्ती धर्मातही नामकरणाला खूप धार्मिक महत्त्व दिले आहे.

नामकरणाचा संकल्प | Namkarnacha Sakalp Marathi

नामकरणाचा संकल्प करताना अपत्याच्या पापाचा नाश, आयुष्य व तेज यांची अभिवृद्धी, व्यवहारसिद्धी व परमेश्वराची प्रसन्नता या सर्व गोष्टींसाठी नाव ठेवत आहे, असे नामकरणाच्या धार्मिक विधीत म्हटले जाते.नामकरणाच्या विधीसाठी सर्वप्रथम गुरुजींना बोलावतात व ते त्यावेळी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदीश्राद्ध करतात . त्यानंतर मंत्रोप्चार करून नावे ठेवले जाते. पण आपण बघतो,हल्ली या विधींचे महत्त्व खूपच कमी झाले आहे आणि नटणे-मुरडणे,चांगले चांगले कपडे घालून मिरवणे, दागदागिने घालणे या गोष्टींना लोक जास्त प्राधान्य देतात.

या दिवशी सुवासिनी जमतात व बाळंतिणीची ओटी भरतात. त्यानंतर बाळाला पाळण्यात ठेवून ‘पाळणे’ म्हटले जातात आणि नंतर बाळाची आत्या त्याचे नाव ठेवते. नंतर जमलेल्या लोकांनी बाळासाठी काही कपडे,खेळणी किंवा काही गिफ्ट्स आणली असतील तर ते बाळाच्या हातात देतात.

birthday wishes for mother in marathi

बाळाचा पाळणा | Baby Cradle Information in Marathi

बाळाच्या बारशाच्या दिवशी त्याचा पाळणा सुंदर अशा फुलांनी सजवला जातो. नंतर सभोवती फुगे आणि अजून डेकोरेशन केले जाते. बहुतेक लोक बारशासाठी छानसा हॉल बुक करतात. मग संपूर्ण हॉलची सजावट करतात. त्यानंतर बाळाला नवीन कपडे घालून पाळण्यात ठेवले जाते आणि बायका बरेचसे पाळणे किंवा ओव्या गातात . हे सर्व झाल्यावर बाळाच्या दोन्ही आज्या कुणी ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ असे म्हणत बाळाला एकदा पाळण्यावरून आणि एकदा पाळण्याखालून घेतात. हे सर्व झाल्यानंतर बाळाची आत्या कुर्रर्र असे म्हणून बाळाचे नाव त्याच्या कानात सांगते. अशाप्रकारे बाळाला त्याचे स्वतःचे असे एक नाव मिळते.

नाव केव्हा ठेवावे, या बाबतीत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असतात. काही जण म्हणतात की जन्मलेल्या दिवशीच बाळाचे नाव ठेवावे तर काही म्हणतात की नाव एक वर्षानंतर ठेवले तरी चालेल, या मतापर्यंत विविध मते आढळतात. बालकाचे व मातेचे आरोग्य, कौटुंबिक सोय, अमावास्या वा संक्रांतीसारखे अशुभ योग इत्यादींचा विचार करून नामकरण विधी होतो. त्यामुळेच अनेकदा प्रारंभी व्यवहारासाठी काहीतरी नाव ठेवून नंतर योग्य वेळी बारसे करण्याची पद्धत आढळते.बऱ्याच वेळी सुट्टीच्या दिवशी किंवा सर्वांचीच सोय बघून योग्य असा दिवस निवडला जातो आणि बारसे केले जाते.

पाळण्यातले नाव | Mulache Palnyatle Naav

बाळाचे संकटांपासून संरक्षण व्हावे, म्हणून बालकाचे एक गुप्त नाव ठेवण्याची पद्धतही असते. या नावाला पाळण्यातले नाव असे म्हणतात. बऱ्याच वेळा बाळाचे पाळण्यातले नाव हे त्याला आलेल्या त्याच्या राशीवरूनच्या अक्षरावरून ठेवले जाते. परंतु जर ते नाव आई-वडिलांना आवडत नसेल तर ते रोजच्या हाक मारण्यासाठी वेगळे नाव ठेवतात. हल्ली बरेचसे आई वडील त्यांच्या दोघांच्या नावाच्या कॉम्बिनेशन नुसार बाळाचे नाव ठेवतात. दोन, तीन वा चार नावेही ठेवतात. नाव कोणते ठेवावे, याविषयी विविध नियम आढळतात.

ब्राह्मणाचे मांगल्यदर्शक, क्षत्रियाचे शौर्यसूचक, वैश्याचे समृद्धीबाधक व शुद्राचे दास्यज्ञापक नाम असावे. कुलाची देवता, जन्मनक्षत्र यांचा संबंध नावाने सूचित व्हावा. स्त्रियांच्या नावाचा शेवटचा वर्ण दीर्घ, आकारान्त, ईकारान्त असावा स्त्रीचे नाव मनोहर,आशीर्वादसूचक, सुखोच्चार असावे. बारशाच्या वेळी ठेवलेले नाव हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनत असल्यामुळे, बारसे ही व्यक्तीच्या जीवनातील एका महत्त्वाच्या परिवर्तनाची घटना होय.

बाळाची ओळख | Identity Of baby

बाळाला त्याचे नाव हे त्याची ओळख देते. सर्वसाधारणपणे मरेपर्यंत माणसाचे नाव हे बदलत नाही. स्त्रियांचे लग्न झाल्यावर त्यांचे नाव बदलते,परंतु हल्ली मात्र बऱ्याचशा स्त्रिया नाव बदलायलाही तयार नसतात किंवा नाव जरी बदलले तरी आपले माहेरचे आणि सासरचे असे दोन्हीही आडनाव लावतात.


बारशाची निमंत्रणपत्रिका | Naming ceremony invitation card in Marathi 

Naming ceremony invitation card Marathi 
Naming ceremony invitation card Marathi

अशाप्रकारे तुम्ही यामध्ये थोडेसे बदल करून निमंत्रण कार्ड बनवू शकता.


मी केलेली एक छोटीशी कविता | Naming ceremony songs in Marathi

बाळाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे त्याचे बारसे
सर्वजण येतातच मग बोलावल्यावर घरचे आणि दारचे
हा आहे एक आनंदाचा सोहळा
बाळ घाली रुणझुण पैंजण वाळा
बाळाला मिळते एक छानसे नाव
वाढतो त्याचा कार्यक्रमातही भाव
बायका होतात सर्व व्यस्त फोटो काढण्यात
याच त्या आठवणी राहतील सर्वांच्या मनात


Naming Ceremony Invitition in Marathi | बारशाचे आमंत्रण

Naming Ceremony Invitition in Marathi
Naming Ceremony Invitition in Marathi

इटुकले पिटुकल माझे हात
इवले इवले माझे गाल
गोड गोड किती छान
सर्वांची मी छकुली लहान
पण माझे नाव काय
अहो … तेच तर ठरवायचे आहे
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
माझ्या बारशाला यायचं हं…

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

अहो आजी, आजोबा, काका, काकू, मामा,
मामी,आत्या, मावशी, दादा, ताई
मी तीन महिन्याचा झालो..
पण तुम्ही अजून मला माझं
नाव दिलं नाही….
म्हणूनच माझ्या मम्मी पप्पांनी
तुम्हाला माझ्या बारश्याला बोलावलं आहे.
चला तर मग लागा तयारीला…
या द्यायला मला छान छान नाव
आणि खूप खूप आर्शीवाद

मी आणि आमच्या कुटुंबाकडून
तुम्हाला आाग्रहाचे आमंत्रण…
आमच्या घरी एक छानशी
परी अवतरली आहे.
तिला नाव देण्यासाठी आणि तिला
आर्शिवाद देण्यासाठी सर्वांनी यायचं हं

आमच्या आयुष्यातील खास दिवस…
आमच्या छकुल्याचा नामकरण दिवस…
या शुभ दिवशी आपणां सर्वांचे आर्शिवाद
आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत…
मग येताय ना बाळाच्या बारशाला…

इवल्याशा पणतीने घर होते प्रकाशित
आमच्या बाळाच्या येण्याने
आमचे जीवन झाले उल्हासित


Naming Ceremony Message in Marathi | नामकरण सोहळा साजरा करण्यासाठी मसेज

देवरायाकडा अमुल्य ठेवा
त्याने दिला आम्हाला आयुष्यभराचा दुवा
गोंडस बाळाच्या आगमनाने प्रसन्न झाले घर
त्याला आर्शीवाद द्यायला यावे मात्र तत्पर

कोण म्हणतं छकुली कोण म्हणतं गोंडोली
पुरे झाली टोपण नावं मी आता मोठी झाली
आई बाबांना मी सांगितलं आहे मला माझं नाव हवं
पण त्यासाठी माझ्या बारश्याला तुम्ही सर्वांनी यायला हवं


Naming Ceremony Wishes in Marathi | नामकरण सोहळ्यासाठी शुभेच्छा

Naming Ceremony Wishes in Marathi
Naming Ceremony Wishes in Marathi

आज आपल्या आयुष्यातील
एक खास क्षण,
तुमच्या छकुल्याच्या नामकरण
विधीसाठी हार्दिक अभिनंदन

कृष्णाचा यशोदेला जसा ध्यास,
तसाच तुमच्या आयुष्यातील हा क्षण आहे खास,
आईबाबा झाल्याबद्दल आणि
बाळाच्या नामकरण विधीनिमित्त
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

आजवर हे घर फक्त माझ्या मित्राचं घर होतं
आता मात्र त्याचं नंदनवन झालं आहे…
नवजात बालकास आर्शिवाद आणि
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

नवजात बाळाची काळजी
परमेश्वर त्याच्या अ्द्भूत प्रेमाद्वारे
घेत असतो हाच तुम्हाला
आर्शिवाद आणि बाळाला खूप खूप प्रेम


FAQ(महत्वाची प्रश्नोत्तरे)

बाळाच्या बारशासाठी मुहूर्त बघावा लागतो का?

शास्त्रानुसार जर बाळाचे बारसे दहाव्या,बाराव्या किंवा सोळाव्या दिवशी केले तर मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. पण काही कारणामुळे त्यावेळी बारसे करणे शक्य झाले नाही तर नंतर पंचांग पाहून शुभमुहूर्तावर नामकरण विधी म्हणजेच बारसे केले जाते.

नामकरण विधी केव्हा करू नये?

पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या दिवशी अजिबात नामकरण विधी करू नये.

नामकरण विधीसाठी कोणते मुहूर्त योग्य मानले जातात?

नामकरण विधीसाठी अनुराधा,पुनर्वसू,माघ,उत्तराषाढा,उत्तरभाद्रपदा,स्वाती,धनिष्ठा,श्रवण,रोहिणी,अश्विनी,मृगशीर,रोहिणी,हस्त,पुष्य इ. नक्षत्र उत्तम मानले जातात.

अधिक वाचा:

Marathi Suvichar for Students

Marathi Ukhane For Naming Ceremony | Barsa | बारश्या साठीचे नवीन उखाणे

Lahan mulanchi khelni In 2022 | लहान मुलांची खेळणी

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

3 thoughts on “Naming ceremony in Marathi in 2024 | बाळाचे बारसे | Balache Barse Information in Marathi”

Leave a Comment