what is surrogacy in marathi In 2022|सरोगसी म्हणजे काय?

आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. परंतु काही स्त्रियांना काही कारणामुळे मूल होऊ शकत नाही,अशा स्त्रियांसाठी सरोगसी हा एक उत्तम पर्याय आहे. आता सरोगसी म्हणजे काय याबद्दल आपण सविस्तर माहिती बघुया.

what is surrogacy in marathi
surrogacy


what is surrogacy in marathi:

अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सरोगसी म्हणजे भाडेतत्वावर एखाद्या महिलेचा गर्भ घेणे. जेव्हा एखादे जोडपे मुलाला जन्म देण्यासाठी एखाद्या महिलेचा गर्भ भाडेतत्वावर घेतात तेव्हा यालाच सरोगसी असे म्हणतात. आपल्या पोटात दुसऱ्या जोडप्याचे मूल वाढवणाऱ्या महिलेला सरोगेट मदर असे म्हणतात. सरोगसीमध्ये स्त्री स्वतः किंवा डोनरच्या बीजांडाद्वारे एखाद्या दाम्पत्यासाठी गरोदर राहते. सरोगसीचे दोन प्रकार आहेत.

१)पारंपरिक सरोगसी(Traditional surrogacy):

पारंपरिक सरोगसीमध्ये वडिलांचे किंवा एखाद्या डोनरचे शुक्राणू किंवा स्पर्म सरोगेट आईच्या बीजांडाशी जुळवले जातात. मग डॉक्टर कृत्रिमरीत्या हे स्पर्म सरोगेट महिलेच्या गर्भाशयात सोडतात. यामुळे हे स्पर्म कोणत्याही अडथळ्याशिवाय गरोदर महिलेच्या गर्भाशयात पोहोचतात. त्यानंतर सरोगेट मातेच्या पोटात नऊ महिने बाळाची वाढ होत असते. सरोगेट महिला ही फक्त बाळाची बायोलॉजिकल मदर असते. जर वडिलांचे शुक्राणू न वापरता डोनरचे शुक्राणू वापरण्यात आले असतील तर ते वडीलसुद्धा अनुवंशिकरीत्या बाळाशी संबंधित राहत नाहीत. यालाच पारंपरिक सरोगसी असे म्हणतात.

२)गर्भावस्थेतील सरोगसी(Gestational surrogacy)

गर्भावस्थेतील सरोगसीमध्ये सरोगेट महिलेचा बायोलॉजिकल देखील काहीही संबंध राहत नाही. म्हणजेच सरोगेट मातेच्या एक्स चा वापर केला जात नाही. या सरोगसीमध्ये वडिलांचे स्पर्म्स आणि आईचे एक्स हे सरोगेट महिलेच्या गर्भाशयात सोडले जातात. त्यामुळे खऱ्या आई-वडिलांचेच स्पर्म्स हे वापरले जातात. फक्त ते बाळ सरोगेट मातेच्या गर्भाशयामध्ये वाढवले जाते.

गर्भधारणा सरोगसीची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे आणि यामध्ये IVF पद्धतीचा वापर केला जातो. गर्भावस्थेतील सरोगसी ही भारतातील सर्व IVF केंद्रामध्ये अधिक प्रचलित मानली जाते. यामध्ये भविष्यात सरोगेट आई आणि बाळ यांच्यातील संघर्षाचा धोकासुद्धा कमी होतो. म्हणजेच सरोगेट आई ही बाळावर हक्क दाखवू शकत नाही. बऱ्याच वेळा जी दाम्पत्य सरोगसीचा पर्याय निवडतात ते सरोगेट मदरला त्यांच्याबरोबरच ठेवतात. सरोगेट मदरचा वैद्यकीय खर्च तसेच राहण्याचा खर्च हा जोडपेच करतात.

सरोगेट महिला ही ओळखीची किंवा अनोळखीदेखील असू शकते यावर कोणतेही बंधन नाही. भारतात कमर्शिअल सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. कमर्शिअल सरोगसी म्हणजेच सरोगेट मदरला पैसे देणे.

वैद्यकीय चाचण्या(Medical tests)

सरोगसीमध्ये आपले मूल दुसऱ्या महिलेच्या पोटात वाढत असते. त्यामुळे सरोगेट मदरच्या वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणेदेखील गरजेचे असते. ज्याप्रमाणे कुठल्याही प्रेग्नन्ट महिलेच्या फिटनेस टेस्ट किंवा मेडिकल कंडिशन्स पहिल्या जातात तसेच बीपी किंवा शुगर लेव्हल पहिले जाते याच सर्व चाचण्या सरोगेट मदरच्यादेखील केल्या जातात. तसेच त्यांना थायरॉइड किंवा अजून काही त्रास आहे का तेदेखील पहिले जाते.

भारतात सरोगसीसंबंधी नियम आणि कायदे(Rules and laws related to surrogacy in India)

  • १)सरोगसीद्वारे जन्म दिलेल्या बाळावर सरोगेट मदरचा कोणताही अधिकार नसतो.
  • २)कायद्याने ज्या जोडप्याने सरोगसी हा पर्याय निवडला आहे तेच या बाळाचे आई-वडील मानले जातात.
  • ३)सरोगसीचा खूपच दुरुपयोग होत असल्यामुळे भारतात कमर्शिअल सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • ४)ज्या महिलेला सरोगेट मदर व्हायचे आज ती स्त्री विवाहित असावी.
  • ५)सरोगेट मदरचे वय २५ ते ३० वर्षे यादरम्यान असावे.६)सरोगेट मदर ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्रुढ असावी. याचे त्या स्त्रीकडे सर्टिफिकेट असायला हवे.
  • ७)सरोगेट मदरचा वैद्यकीय खर्च आणि विमा संरक्षण याशिवाय जोडप्याकडून अजून कोणताही खर्च घेतला जात नाही.
  • ८)सरोगेट मदर ही तिच्या आयुष्यात फक्त एकदाच होऊ शकते. पूर्वी हे तीन वेळा करू शकत होते परंतु आता हे कमी करून फक्त एकदाच सरोगेट मदर होता येते.
  • ९)सरोगेट मदर आणि ज्या जोडप्याला सरोगसीद्वारे मूल हवे आहे यांच्या मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट केले जाते. त्यानंतरच सरोगसीचा पर्याय उपलब्ध केला जातो.
महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

सरोगेट आई गर्भवती कशी होते(How does a surrogate mother get pregnant?)

In vitro fertilization (IVF) द्वारे गर्भधारणा साधली जाते. जी महिला सरोगेट आई होण्यास इच्छुक आहे तिच्यामध्ये गर्भधारणा सामान्यतः Intrauterine Insemination(IUI) द्वारे असलेल्या वडिलांच्या शुक्राणूंद्वारे केली जाते.या प्रक्रियेमध्ये डोनरचे शुक्राणू देखील वापरले जाऊ शकतात.

सरोगेट बाळ निरोगी असतात का(Are surrogate babies healthy?

सरोगेट्सकडे निरोगी गर्भधारणेचा एक सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्यामुळे अनेकदा सरोगसीला अपेक्षित पालकांसाठी प्रजनन उपचारांपेक्षा अधिक यशस्वी होण्याची शक्यता असते.

सरोगसीद्वारे जन्मलेले बाळ सरोगेट मदर सारखे दिसते का(Does a baby born through surrogacy look like a surrogate mother?)

नाही, सरोगसीद्वारे जन्मलेले बाळ सरोगेट मदर सारखे दिसत नाही. सरोगसी प्रक्रियेद्वारे जन्मलेल्या बाळामध्ये अंडी आणि शुक्राणू प्रदात्याच्या शारीरिक वैशिष्ट्यांचे (दिसणे) संयोजन असते. कारण बाळाचा डीएनए केवळ गर्भ तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अंडी आणि शुक्राणूंमधून येतो, सरोगेट नाही.

तर आज मी तुम्हाला what is surrogacy in marathi(सरोगसी म्हणजे काय?) जर तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

• What is kegal exercise In 2022|केगल व्यायाम पद्धती

• सरोगेसी क्या होती है ?

Leave a Comment

improve alexa rank