सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 2024 | Surya Ugavla Nahi Tar Marathi Essay

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 2024 | Surya Ugavla Nahi Tar Latest beautiful Marathi Essay

रमेश चा दहावीचा गणिताचा शेवटचा पेपर राहिला होता. पण लहानपणापासूनच रमेशचा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा. जेव्हा जेव्हा त्याचा गणिताचा पेपर असायचा तो विचार करायचा की एकतर पेपर तरी कॅन्सल होऊ दे नाहीतर मी तरी आजारी पडू दे. पण यावेळेस तर त्याचा दहावीचा पेपर होता आणि कोरोना देखील आता संपल्यामुळे त्याला यातील काही शक्यता दिसत नव्हती मग त्याच्या मनात पटकन विचार आला जर सूर्य उगवला नाही तर….. ?हा विचार करून क्षणभर त्याला खूप छान वाटले. जर सूर्य उगवलाच नाही तर किती छान होईल गणिताचा पेपर द्यायला नको की उठायला नको मस्त आपले लोळत पडायचे.सकाळ झाली म्हणून कोणी उठवणार देखील नाही. अहाहा! किती छान असे वाटून तो विचारात गढून गेला.

सूर्य उगवला नाही तर….. ?(Surya Ugavla Nahi Tar)
Surya Ugavla Nahi Tar

सूर्य उगवला नाही तर मी बाबांबरोबर खूप वेळ मोबाइल वर तर गेम खेळू शकतो. कारण बाबांना ऑफिस लाच नाही जावं लागणार. म्हणजे बाबा कायम घरीच राहतील. पण मग लगेच विचार आला असा किती वेळ मी गेम खेळेन शेवटी कंटाळा तर येईलच ना मला सूर्य उगवला नाही तर कधीच उजाडणार नाही. म्हणजे सर्वत्र काळोखच. म्हणजे कायम रात्रच. झोपून झोपून असा किती झोपेन मी शेवटी मला झोपायचाही कंटाळा येईलच ना! आणि मुख्य म्हणजे मी घराच्या बाहेर पडणार कधी?एरव्ही थोडासा जरी काळोख झाला तरी मला बाहेर जायला भीती वाटते आणि इथे मी विचार केला की सूर्य उगवला नाही तर? मग त्याला पुढील गोष्टींची जाणीव झाली:

  • जीवनाचा स्रोत– जर सूर्य उगवलाच नाही तर सर्व सजीव प्राणी जगूच शकणार नाहीत. सूर्यच नसेल तर अन्न-धान्य पिकू शकणार नाही. कारण झाडांना जगण्यासाठी सूर्य किरणांची आवश्यकता असते. कारण वनस्पती प्रकाशाच्या मदतीने आपले अन्न तयार करतात. जर सूर्यच नसेल तर प्रकाश-संश्लेषणाची क्रिया होणार नाही. वनस्पती आपले अन्न तयार करू शकणार नाहीत. आणि जर काही पिकलेच नाही तर मग आपण खाणार काय?आणि झाडेच नसतील तर मग ऑक्सिजन देखील मिळणार नाही. सूर्य हा एक प्रकारे आपला जीवनदाताच आहे.
  • पाणी – जर सूर्यच नसता तर आपल्याला पाणी देखील उपलब्ध झाले नसते. कारण सूर्याच्या प्रकाशाने नदी मधील पाण्याचं बाष्पीभवन होत आणि त्याचे ढग तयार होतात आणि ढगातून पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला पाणी मिळते. म्हणून सूर्य हा अतिशय महत्वाचा आहे. जर सूर्य नसता तर आपल्या नदीतील पाण्याचं बाष्पीभवन झालं नसत आणि पृथ्वी वर पाऊस देखील पडला नसता आणि जर पृथ्वी वर पाऊस पडला नाही तर पृथ्वी वरील मानवी जीवनच नाही तर सर्वच नष्ट होईल.
  • ड जीवनसत्व(D-व्हिटॅमिन)– आपल्या सर्वांनाच माहित आहे की,सूर्यापासून आपल्याला D-व्हिटॅमिन मिळते. सूर्यप्रकाश हा नेत्ररोग देखील दूर करण्यास मदत करतो. सूर्यप्रकाशामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. त्यामुळेच अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा सूर्यप्रकाशात ठेवले जाते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सूर्यप्रकाशाचे खूप फायदे आहेत. जर आपल्याला निरोगी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर सूर्यप्रकाश अतिशय उपयोगी आहे. सूर्याअभावी आपल्याला यातील कोणताच आनंद मिळणार नाही.
  • सूर्योदय आणि सूर्यास्त– सकाळ झाली की सूर्योदय होतो.आणि संध्याकाळ झाली की सूर्यास्त होतो. यामध्ये देखील एक वेगळीच गंमत आहे. बरेच लोक सनसेट किंवा sunrise बघण्यासाठी निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. जर सूर्य उगवलाच नाही तर यातली कोणतीच मजा अनुभवता येणार नाही.
  • ऋतू – सूर्य उगवलाच नाही तर उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा आणि पावसाळ्यानंतर येणारा हिवाळा यातलं काहीच अनुभवता येणार नाही. सर्वच गोष्टी या एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळे सूर्याचे महत्व प्रचंड आहे.

चैतन्याचे वातावरण

सूर्यामुळे वातावरणात चैतन्य असते. पहाटे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटते. काल ज्या चूका का झाल्या त्या उद्या करणार नाही असे आपण ठरवतो. जर सूर्य उगवला नाही तर आपल्याला यातले काहीच अनुभवता येणार नाही. दिवस असेल तर रात्रीची मजा असते. आणि रात्र असेल तर दिवसाची मजा पण यातले काहीच होणार नाही.

सुंदर जग कसं पाहणार?

आणि हे सगळे विचार चालू असतानाच त्याच्या मनात अजून एक विचार आला जर सूर्यच नसेल तर प्रकाशच पडणार नाही आणि मग आपण हे सुंदर जग कसं पाहणार?आपल्याला काहीच दिसणार नाही बापरे विचारांनीच त्याच्या मनात थरकाप उडाला आणि मग तो भानावर आला. सूर्य उगवला नाही हा विचार करणेच चुकीचे आहे या गोष्टीची त्याला जाणीव झाली आणि मग तो लगेच अभ्यासाला बसून गणिताच्या परीक्षेची तयारी करू लागला.

मी केलेली एक छोटीशी कविता

जर सूर्य उगवला नाही तर

नष्ट होईल संपूर्ण पृथ्वी

नाही राहणार येथे कोणीही

सूर्य उगवणे गरजेचे आहे

त्यामुळेच सर्वांच्या जीवनात आनंद आहे

सूर्य उगवला नाही तर यावर अजून दुसरा निबंध लिहायचा असेल तर हे पहा:

अधिक वाचा:

GudiPadva Essay In Marathi In 2022|Gudi Padva Marathi Nibandh|गुढीपाडवा वर मराठी निबंध

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

1 thought on “सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 2024 | Surya Ugavla Nahi Tar Marathi Essay”

Leave a Comment